' बजेट २०२० : वाचा सामान्य भारतीयासाठी महत्वाच्या असणाऱ्या ८ सर्वात महत्वाच्या गोष्टी – InMarathi

बजेट २०२० : वाचा सामान्य भारतीयासाठी महत्वाच्या असणाऱ्या ८ सर्वात महत्वाच्या गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

बजेट म्हंटल की कित्येक लोकांच्या भुवया उंचावतात, काही लोकांना यामध्ये खूप उत्सुकता असते तर काही लोकं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, तर आपण जाणून घेऊया हे बजेट म्हणजे नेमकं काय आहे?? आणि ते कशासाठी लोकांसमोर मांडलं जातं??

बजेट म्हणजे एक अहवाल असतो जो आपल्या लोकांसमोर सादर केला जातो! जेंव्हा केंद्रातले सरकार निवडून येते त्यानंतर साधारण याच महिन्याच्या आसपास ते सरकार एक बजेट संपूर्ण देशापुढे मांडते, ज्यामध्ये सरकारच्या भविष्यातल्या योजना, आर्थिक कारभार, सोयी-सुविधा, अशा बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत विस्तृत मांडणी केली जाते!

 

Nirmala Sitharaman Budget 2020 inmarathi

 

या बजेट मध्ये सरकारची पुढची वाटचाल आणि देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार याचा एक आढावा मंत्रिमंडळातली एक्स्पर्ट मंडळी लोकांपुढे मांडतात!

पहिले आपल्या संसदेत दोन बजेट सादर केली जायची, पहिले म्हणजे युनियन बजेट आणि दुसरे म्हणजे रेल्वे बजेट! पण २०१७ सालापासून रेल्वे बजेट हे युनियन बजेट च्या बरोबरीनेच सादर केले जाते. रेल्वे मंत्री स्वतः संसदेत रेल्वे बजेट सादर करतात!

२६ नोव्हेंबर १९४७ या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले बजेट सादर केले गेले, त्या वेळचे वित्तमंत्री होते आर. के. शणमुखम चेतटी, पहिल्यांदा हे बजेट फक्त इंग्रजी मध्ये प्रिंट होत असे, पण १९५५-५६ सालापासून ते हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये छापून यायला लागले!

बजेट सगळ्यांच्या उपस्थितीत लाईव्ह का दाखवले जाते?

बजेट मधल सगळंच प्रत्येकाला समजतं अशातला भाग नाही, पण सामान्य जनतेला त्यांनी दिलेल्या टॅक्सच नियोजन सरकार कशा प्रकारे करणार आहे यांची माहिती होण्यासाठी बजेट लाईव्ह दाखवले जाते, आणि एक सामान्य नागरीक या नात्याने ही सरकार समजतल्या प्रत्येक वर्गाशी कशाप्रकारे योजना मांडते ही माहिती मिळते!

बजेट बघताना आपल्याला सगळंच समजत असा आव न आणता ते जे काय बोलत आहेत ते नीट ऐकलं तर आपल्याला सगळं काही थेट समजू शकतं!

तर या वर्षीच्या बजेट २०२० च्या काही ठळक घडामोडी आणि मुख्य बदल याविषयी जाणून घेऊया!

गेल्या वर्षीप्रमाणेचआपल्या देशाच्या केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यावर्षी देखील बजेट २०२० ची कागदपत्रे आणि महत्वाची डॉक्युमेंट्स प्रथेप्रमाणे एका लाल सिल्क च्या बॅगेमध्ये गुंडाळून आणली, ज्यावर आपल्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह सुद्धा होते, या लाल बॅगेला ‘बही-खाता’ असे म्हंटले जाते!

जेंव्हा निर्मला जी बजेट सादर करायला सदनात उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली तेंव्हा त्यांनी पूर्व वित्त मंत्री अरुण जेटली यांचे GSTच्या यशस्वी मांडणीसाठी अभिनंदन केले!

jaitley-budget-inmarathi
businesstoday.in

तर चला जाणून घेऊया बजेट च्या या काही ठळक घडामोडींविषयी सविस्तरपणे!

१) शेतकऱ्यांना दिलासा:

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांच उत्पन्न दुपटीने वाढवल जाईल असे सीतारामन म्हणाल्या, शिवाय त्यांना जोडव्यवसाय आणि सेंद्रिय खतांचा वापर करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जाईल असेही त्या पुढे म्हणाल्या!

 

farmers-reuters Inmarathi
The Financial Express

साधारणपणे २.९३ लाख कोटी रुपयांची शेती आणि शेतीविषयक कामांसाठी तरतूद केल्याच आश्वासन या बजेट मधून दिल गेल!

२) पाण्याचा प्रश्न निकालात :

देशातील पाणी टंचाई आणि सिंचनाची समस्या सोडवण्यासाठी या सरकारने ३.६० लाख कोटींची तरतूद केल्याची घोषणा या बजेट द्वारे केली!

३) शिक्षण आणि रोजगार यबाबतीत महत्वाचे धोरण :

शैक्षणिक धोरणात लवकरच बदल करून, वंचित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करू तसेच वेगळी नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी ची स्थापना करून सरकारी बँकांमधील नियुक्ती प्रक्रियेत देखील बदल करू असं सीतारामन यांनी घोषित केलं आहे.

education-inmarathi
creativededuction.com

४) औद्योगिक धोरण :

गुंतवणुकीत वाढ व्हावी यासाठी ‘इन्व्हेस्टमेंट क्लियरन्स सेल’ ची स्थापना केली जेल आणि वेबसाईटच्या माध्यमातून कामे पार पडतील! तसेच मेक इन इंडिया बरोबरच असेंबल इन इंडिया यावर सुद्धा जास्त लक्ष दिले जाणार असून,टेक्स्टाइल मिशनसाठी १४८० कोटी दिले गेल्याच वित्त मंत्री यांनी सांगितले!

५) रेल्वे संबंधी योजना :

रेल्वेच्या अधिकृत जमिनीवर सोलार पॉवर प्लांट उभारले जाणार असून, रखडलेल्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला चालना देण्याचे आश्वासन यात दिले गेले! तसेच देशातील महत्वाच्या पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी तेजस सारख्या नवीन धावणार असेही पुढे सीतारमन यांनी नमूद केले!

आणि याबरोबरच पर्यटन आणखीन वाढावे यासाठी  २०२४ पर्यंत आणखीन १०० नवीन विमानतळे बांधण्यात येतील! आणि पर्यटन क्षेत्रासाठी २५०० कोटी दिले जातील!

६) कर देणाऱ्यांना दिलासा :

नियमित कर भरणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये यासाठी वेगळी नियमावली बनवण्यात येणार आहे शिवाय टॅक्स पेयर चार्टर च्या माध्यमातून ते अजूनच सोयीचे होईल! याबरोबरच कंपनी अॅक्ट मध्ये सुद्धा बदल केले जाणार आहेत!

७) बँकेबाबतची धोरणं :

Deposit Insurance ची किंमत १ लाख होती टी वाढवून आता ५ लाख करण्यात आली असून, यापुढे बँक बुडल्यास अकाऊंट धारकाला ५ लाख रुपये रोख मिळणार हा खूप महत्वाचा बदल या बजेट मध्ये पाहायला मिळाला!

bank-inmarathi
Livemint.com

शिवाय आयडीबीआय बँकेतला सरकारचा उर्वरित हिस्सा काढून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, एलयायसी मधल्या सरकारी हिस्सा आयपीओ द्वारे विकला जाणार आहे!

८) नवी करमर्यादा (Tax slabs as per new tax reform)

हा या बजेट मधला सर्वात महत्वाचा मुद्दा असून यामुळे देशातल्या सर्व कर भरणाऱ्या सामान्य माणसाला यातून थोडासा दिलासा मिळाला आहे ही समजून येतं! इन्कम टॅक्स मध्ये इतकी घट बहुदा बरेच वर्षानी बघायला मिळत आहे!

 

tax slabs 2
YouTube

 

२.५ लांखापर्यंत कोणताही टॅक्स भरायचा नसून पुढच्या फोटोमध्ये तुम्हाला जून दर आयन नवीन दर यातला फरक दिसून येईल, नोकरदार वर्गाला यातून बराच दिलासा मिळणार असून ही बजेट म्हणजे सामान्य लोकांचे बजेट म्हणून ओळखले जात आहे!

तर हे होते यावेळच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेट २०२० मधले काही ठळक मुद्दे! एक सुजाण किंवा जाणकार नागरीक म्हणून आपण हे बजेट फॉलो केलेच पाहिजे!

कारण जर आपण यात सहभागी होणार नाही तर मग आपल्याला या देशाच्या धोरणांना विरोध करायचा देखील अधिकार नाही! आपल्या दैनंदिन जीवनात या गोष्टी मुळे फरक पडतोच, फक्त तो आपल्याला असा लगेच एक दोन दिवसांत दिसत नाही, या बजेट मुळे होणारे बदल २ ते ३ वर्षांनी दिसायला लागतात!

त्यामुळे निदान आपण तरी हे बजेट नीट लक्षपूर्वक ऐकून समजून घेऊन चांगली निर्णय घेतले असल्यास त्याचे स्वागत करावे आणि चुकीचे निर्णय घेतले असल्यास सांविधानिक पद्धतीनेच त्याला विरोध करावा, कारण ही गोष्ट आपल्याशीच निगडीत असते त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे नक्की!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?