अभिमानास्पद – अमेरिकेतील या पर्वताला दिलं गेलंय भारतीय शास्त्रज्ञाचं नाव!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एखाद्या व्यक्तीचे एखाद्या गोष्टीला नाव मिळणे म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनातील ती सर्वात मोठी गोष्ट ठरते. ज्या गोष्टीवर आपण जीवापाड मेहनत घेतो त्याच गोष्टीला आपले नाव देऊन जर आपला गौरव झाला तर किती बरे आनंद होईल आपल्याला? प्रत्येक वैज्ञानिकाच्या मनात देखील हाच विचार असतो की ज्या गोष्टीवर आपण संशोधन करतोय त्या गोष्टीला आपले नाव मिळावे. त्यासाठी मेहनतही तेवढीच घ्यावी लागते आणि काहीतरी भन्नाट जगासमोर आणावं लागतं, तेव्हा कुठे एखाद्या वैज्ञानिकाच्या नशिबी हा मान येतो. हाच अभिमानास्पद क्षण काही वर्षांपूर्वी आला होता, अमेरिकेतील भारतीय वंशाचे वैज्ञानिक अखौरी सिन्हा यांच्या नशिबी कारण अमेरिकेतील एका पर्वताला त्यांचे नाव दिले होते. त्यांच्या या गौरवामुळे भारताची मान देखील अभिमानाने उंचावली होती. आजही हा पर्वत माऊंट सिन्हा म्हणून ओळखला जातो. विश्वास बसत नसेल तर माऊंट सिन्हा असे गुगल करून पहा.
अमेरिकेतील अंटार्क्टिका येथील एका पर्वताला भारतीय- अमेरिकन वंशाचे वैज्ञानिक अखौरी सिन्हा यांचे नाव दिले आहे. सिन्हा यांच्या सन्मानार्थ या पर्वताचे नाव माऊंट सिन्हा असे ठेवण्यात आले आहे.
मिनेसोटा विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक्स आणि सेल बायोलॉजी अँड डेव्हलपमेंट मध्ये प्राध्यापक असताना सिन्हा यांनी प्राण्यांच्या जैविक संशोधनात मोलाचे योगदान दिले. १९७२ आणि ७४ मध्ये अमुंडसेन आणि बेलिंगशॉसेन या सागरी भागात ग्लेशियर्स, व्हेल मासे आणि पक्षी यांची गणना करणा-या पथकात सिन्हा कार्यरत होते.
सिन्हा यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत अमेरिकेतील अंटार्क्टिका नाव सल्लागार समिती आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग यांनी अंटार्क्टिकातील एका पर्वताला सिन्हांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
समुद्र सपाटीपासून ९९० मीटर उंचीवर असलेले हे माऊंट सिन्हा पर्वत हे एरिक्सन ब्लफ्सच्या आग्नेय आणि मॅकडोनाल्ड हाईट्सच्या दक्षिण भागात आहे. सिन्हा यांनी या पर्वतीय भागात १९७२ आणि १९७४ मध्ये २२ आठवडे विविध जैविक संशोधनाचे कार्य केले. या संशोधनाची त्यांची १०० पत्रकेही प्रकाशित करण्यात आली. सुमारे २५ वर्षे त्यांनी प्राध्यापकपदी काम केले. अंटार्क्टिकाच्या या पर्वतावर त्यांच्या पथकाने प्राणी आणि जैविक संशोधनावर सुमारे चार महिने संशोधन केले.
कोणतीही पूर्वकल्पना नसताना, या परिसराची माहिती नसताना येथे त्यांना हेलिकॉप्टरने आणून सोडले होते. त्यावेळी संशोधन करत असताना पाल्मेर स्थानकाजवळ त्यांच्यावर स्कुआ नावाच्या पक्षांनी हल्ला केला. त्यातून ते थोडक्यात बचावले.
काम करण्याची धमक आपल्यात असायला हवी. तुम्ही कर्तुत्त्ववान आहात हे जगाला दाखवून द्या, घाबरु नका आणि प्रत्येक संधीचे सोने करा असाच संदेश सिन्हा यांची ही कामगिरी आपल्याला देते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.