बिहारमधील या शाळेत आहे केवळ एक विद्यार्थिनी आणि दोन शिक्षक…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
शाळा…प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला अविस्मरणीय काळ.
शाळेत जाणं ही खूप आनंदाची गोष्ट. प्रत्येक मुलासाठी शाळा केंद्रस्थानी असते. शाळेत जाऊन केलेली मजा ही पुढील खूप वर्षांचा ठेवा असतो.
आज भारतातील ९०% पेक्षा जास्त मुलं शाळेत जातात.
मात्र पूर्वीच्या काळी ही गोष्ट जवळजवळ अशक्य होती. त्या काळी मुलींनी शिकणे ही गोष्ट दुरापास्त होती तसेच मुलेही गरजेपुरते शिक्षण घेत.
मात्र येणाऱ्या काळाची पावले ओळखून देशात सर्वच स्तरांवर शिक्षणाची गरज निर्माण झाली. आपल्या देशाच्या संविधानात सुद्धा सुधारणा करून कलम २१- A नुसार प्रत्येक ६-१४ वर्षातील मुलांना चांगले शिक्षण मिळणे अनिवार्य झालं.
हे ही वाचा –
===
याचंच पुढचं पाऊल म्हणजे शासनाचे सर्व शिक्षा अभियान.या अभियानांतर्गत सरकारी शाळेत जाणाऱ्या सर्व मुलांसाठी मोफत शिक्षण आणि मध्यान्ह भोजन देण्यात आले.
तेव्हाच्या काळी शाळा म्हटलं की फक्त सरकारी शाळा असायच्या मात्र त्यानंतर अनेक खासगी शाळा उभ्या राहिल्या आणि शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा वाढू लागली.
याचा परिणाम असा झाला की सरकारी शाळांकडून खासगी शाळांकडे मुलांचा ओढा वाढू लागला आणि सरकारी शाळांमधील पटसंख्या कमी होऊ लागली आणि आता तो चिंतेचा विषय बनला आहे.
मात्र आज आपण एका अशा शाळेची गोष्ट पाहू की जी शाळा फक्त एका विद्यार्थिनीसाठी चालू आहे.
ही शाळा बिहार राज्यातील गया येथे चालू आहे.केवळ एक विद्यार्थिनी, दोन शिक्षिका आणि एक जेवण करणारी महिला यांच्या आधारावर या शाळेचे काम चालू आहे.
५० वर्षे जुनी असलेली ही शाळा फक्त एका मुलीसाठी सुरू आहे आणि ही मुलगी आत्ता पहिली इयत्तेत आहे.
या मुलीचे नाव जान्हवी कुमारी असून तिच्या अभ्यासातील विशेष प्रगतीमुळे ही शाळा फक्त तिच्या एकटीसाठी सुरू आहे,यासाठी त्या शासनाचे आणि शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडं आहे.
खरं तर या शाळेत एकूण ९ मुलांनी प्रवेश घेतला होता मात्र त्यातील जान्हवी ही एकमेव अशी विद्यार्थिनी आहे की जी रोज न चुकता शाळेत येते. तिच्या शिक्षिका अश्विनी कुमारी जान्हवीचं कौतुक करताना सांगतात,
जान्हवी च्या शिक्षणाच्या ओढीने आणि तिच्या जिद्दीने आम्ही भाळलो आहोत. तिचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे आणि म्हणून आम्ही तिच्या साठी हवे तितके प्रयत्न करू.
एकाच विद्यार्थिनीला शिकवणं हे खरं तर फार कंटाळवाणे काम असू शकते तरीही ते शिक्षक प्रेमापोटी हे सर्व करत आहेत याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं.याबाबत तेथील शिक्षिका अश्विनी कुमारी म्हणतात की,
रोज सात सात तास एकाच मुलीला शिकवणे हे कठीण आहे ,तरी सुद्धा फक्त जान्हवी साठी आणि तिची शिक्षणाची धग कायम ठेवण्यासाठी आम्ही हे काम आनंदाने करतो.
या एका मुलीसाठी शासन दर महिन्याला ५९००० रुपये एवढा खर्च करत आहे.
हे ही वाचा –
====
आपल्याला प्रश्न पडतो एका मुलीसाठी शाळा,असून असणार केवढी? तर ही शाळा चार वर्गखोल्या आणि एक स्वच्छतागृह एवढी मोठी आहे.तसेच रोजचे जेवण करण्यासाठी एक महिला सुद्धा आहे.
जेव्हा शाळेत जेवण केलं जात नाही त्या दिवशी बाहेर हॉटेल मधून जेवण मागवले जाते. मात्र तिचे शिक्षण कायम चालू ठेवले जाते.
या शाळेचे प्रमुख सत्येंद्र प्रसाद म्हणतात, आज वाढलेल्या स्पर्धेचा परिणाम म्हणून बरेचसे ग्रामस्थ आपल्या मुलांना खासगी शाळेत घालतात आणि त्यामुळेच सरकारी शाळा ओस पडत चालल्या आहेत.
त्या विद्यार्थिनी आणि शिक्षक यांच्यासाठी ही गोष्ट अभिमानास्पद असली तरीही हे एक विदारक सत्य आहे.
फक्त बिहार नाही तर आज बऱ्याच राज्यांमध्ये सरकारी शाळा बंद पडत चालल्या आहेत किंवा त्यांची पटसंख्या कमी होत चालली आहे.मात्र तरीही तेथे असलेले शिक्षक आपल विद्यादान अतिशय चोखपणे करत आहेत.
आज कितीतरी शाळा अतिशय दुर्गम भागात आहेत की जेथे रस्ते सुद्धा नाहीत तरीही तेथे कमी विद्यार्थ्यांसाठी का होईना विद्यादान सुरू आहे..देशाची पुढची पिढी आकार घेत आहे. सरकार सुद्धा सरकारी शाळा आणखी अद्ययावत करण्यासाठी पावले उचलत आहे. मात्र यासाठी सरकारी शाळा चांगल्या होणे तसेच
पालकांची खासगी शाळामधील प्रवेशाची मानसिकता कमी होणे या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत.
मध्ये एक बातमी आली होती की, जपान मध्ये एका मुलीच्या शिक्षणसाठी तिच्या स्टेशन पर्यंत फक्त एकटीसाठी रेल्वे सेवा सुरू होती.अशाच प्रकारे आपल्या देशातही अनेक शाळा अशाप्रकारे चालू आहेत.यातूनच त्या शिक्षकांची शिक्षणाबद्दलची अस्था आणि चिकाटी दिसून येते.
खरं तर त्या एका विद्यार्थिनीला इतर कोणत्याही शाळेत भरती करून ती शाळा बंद करता येऊ शकली असती मात्र अस न करता त्या विद्यार्थिनीची अभ्यासप्रतीची तळमळ पाहून ती शाळा सुरू ठेवण्यात आली आहे आणि यात मोठा वाटा आहे तो त्या शाळेच्या शिक्षकांचा.
मात्र या विषयावर खरंच विचार करण्याची गरज आहे. कारण एका विद्यार्थिनीसाठी शाळा सुरु ठेवणं हे खरं तर आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे.आणि यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे. किंवा त्या शाळेची पटसंख्या वाढवणे आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणे खूप गरजेचं आहे
ज्ञानाचा दिवा तेवत ठेवण्यासाठी अखंड काम करत असलेल्या त्या शाळेतील शिक्षकांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.
हे ही वाचा –
===
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.