राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांचं पहिलंवहिलं भाषण!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
आज जानेवारी २०, २०१७ रोजी डोनाल्ड ट्रम्प ह्यांचा अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला. बराक ओबामा ह्यांच्याकडून त्यांनी आज पदाची जबाबदारी घेतली. बराक ओबामा आणि मिशेल ओबामा ह्यांचे आभार मानत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळायला ही ट्रम्प मागे राहिले नाहीत.
जनतेला संबोधुन केलेल्या ट्रम्प ह्यांच्या भाषणाचे काही ठळक मुद्दे
लोकसहभागाने कारभार बघणार!
आज नुसतंच एका राष्ट्राध्यक्षाकडून दुसर्याकडे किंवा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे सत्ता हस्तांतरित होत नाहीये, तर ती washington DC कडून सर्वसामान्य जनतेकडे होत आहे
प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी अमेरिकेचा कामगार वर्ग!
आजपासून प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी अमेरिकन नागरिक असणार व नोकरीसंदर्भात प्राधान्य असणार.
सरकारवर अंकुश कुणाचा असेल हे महत्वाचं!
सरकारवर कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे ते तितकसं महत्वाचं नाहीये. सरकारवर जनतेचा अंकुश आहे हे महत्वाचं आहे.
राहून गेलेली स्वप्ने पूर्ण करू!
आजपर्यंत अमेरिकेची राजधानी विकासाची धनी होती, बाकीच्या देशाच्या विकासाला मिळणारी चालना कमी होती. नेतेमंडळी श्रीमंत झाली पण नोकऱ्या घातल्या. आपण मिळून त्या परत आणू. ती संपत्ती आणि भरभराट परत आणू, ती स्वप्ने पूर्ण करू.
इथून पुढे कुणीही विस्मरणात जाणार नाही.
ज्या अमेरिकन हिरोंच्या स्मृती, ज्यांना जगासमोर आणलं गेल नाही, त्या स्मृती परत जागवल्या जाणार. आणि इथून पुढे कुणालाच विस्मृतीत जाऊ देणार नाही.
जिहादी आतंकवादाला मुळासकट संपवणार!
सर्व आतंकवाद विरोधी देशांना सोबत घेऊन एक नवीन आघाडी उघडून पृथ्वीवरून आतंकवाद संपूर्णपणे संपवणार.
नेहमी देत गेलो आता बास!
आजपर्यंत अमेरिकेने जगभरातल्या खूप देशांना श्रीमंत बनवले पण त्यात आपल्या देशाचा पैसा, संसाधने आणि आत्मविश्वास कुठेतरी हरून गेलाय. पण आता बास! आता आधी अमेरिका!
अमेरिकन जीवनपद्धती लोकांनी अंगीकारण्यासारखी आहे!
आपल्या देशाची जीवनपद्धती आपण कुणावर लादत नाही. पण तिचा हेवा वाटेल लोकांना तेवढी समृद्ध करू. लोकांनी तिचा आदर्श घेऊन आपलं अनुकरण केलं पाहिजे.
अमेरिकन स्वदेशी!
आता फक्त दोनच नियम काटेकोरपणे पाळायचे, अमेरिकन माल खरेदी करा आणि अमेरिकन लोकांना नोकऱ्या द्या.
जगाला दिशा देऊया!
आपला देश अख्या जगाला दिशा देत आला आहे आणि तो असाच पुढेही देत राहावा. त्यासाठी या एकत्र मिळून हा देश चालवू या आणि जगाला एक दिशा देऊया!
तर ट्रम्प ह्यांच्या ह्या भाषणात आणखीन काय काय झालं हे बघायचं असेल तर खालील व्हिडीओ बघा:
बघूया आता ट्रम्प ह्यांची टर्म कशी जाते ते!
—
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi