पायाच्या बुटामध्ये मावणारा पोर्टेबल टेन्ट!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ट्रेकिंग वा कॅम्पिंगला जाताना सर्वात महत्त्वाची गोष्ट घ्यायला विसरू नये ती म्हणते टेन्ट अर्थात तंबू! टेन्ट जवळ असला की टेन्शन नाही. चांगली उघड्यावरची जागा बघा आणि मांडा आपला संसार तिथे! टेन्टचा असा उपयोग असताना एक गोष्ट मात्र कोणालाच आवडत नाही तो म्हणजे टेन्ट कॅरी करणे. टेन्ट कॅरी करायचा म्हटला की डोक्यावर आठ्या येतात, पण करणार काय तेच ओझं पुढे उपयोगी पडतं. अश्या वेळी पोर्टेबल टेन्टचा पर्याय पुढे येतो. बाजारात अनेक पोर्टेबल टेन्ट उपलब्ध आहेत आणि या पोर्टेबल टेन्टमध्ये अजून एका क्रांतीची भर पडली आहे. अहो चक्क बुटामध्ये मावतील असे टेन्ट बाजारात आले आहेत. म्हणजे आता टेन्टचं ओझ पाठीवर वाहून नेण्याची गरज नाही. काय? मस्त कल्पना आहे ना? बुटामध्ये टेन्ट..!
ऑस्ट्रेलियातील एका कंपनीने बुटात मावणारा पोर्टेबल तंबू तयार केला. यामुळे गिर्यारोहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऑस्ट्रेलियातील सिब्लींग या कंपनीने तयार केलेल्या या बुटाला त्यांनी ‘वॉकिंग शेल्टर’ असे समर्पक नाव दिले आहे.
या बुटामध्ये तंबू ठेवण्यासाठी विशेष जागा करण्यात आली आहे. गिर्यारोहकाला ज्या वेळी तंबूची गरज लागते त्या वेळेस तो बुटातून काढता येतो. हा तंबू आपल्या नेहमीच्या स्लिपींग बॅग सारखा आहे.
प्रवासादरम्यान व्यक्ती विविध ठिकाणी जात असल्याने विविध तापमान आणि गरजेनुसार हा तंबू बनवण्यात आला आहे. त्यामुळे या बुटाचा आपल्याला पाहिजे तसा उपयोग करता येतो.
प्रवासादरम्यान खांद्यावर तंबू घेऊन वणवण करण्याचा त्रास कमी होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. आपत्कालिन परिस्थिती, बेघर व वाढत्या तापमानात हा तंबू वापरता येऊ शकतो.
पाठीवर ओझे नसले की प्रवास करताना हे जीवन सुंदर आहे असं म्हणायला हरकत नाही !
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.