मुंबईकरांची बौद्धिक भूक आता भागणार – फोनवरच्या एका क्लिकने!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
मुंबईकरांसाठी एक खुशभर आहे!
पुस्तक वाचण्यासाठी आता लायब्ररीत जाण्याची गरज नाही…!
शॉपिंग करायची असो वा चविष्ट पदार्थांवर ताव मारायचा असतो – एका क्लिकवर सगळं काही होतं आजकाल!
भुक लागताच मिळणारे खमंग पदार्थ खायला आवडत नाही वा एका क्लिकवर शॉपिंग करण्याची आवड नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.
मात्र या शॉपिंगच्या बकेट लिस्ट मध्ये तुमची आवडती, दुर्मिळ पुस्तकंही असतील तर?
मुंबईकरांनो, तुमचा हा विचार खरा होत आहे…!
अनेकदा वाचकांना पुस्तके वाचण्याची आवड असते पण त्यांची साहित्याची भूक अनेकदा वेळेअभावी पूर्ण होत नाही.
लायब्ररीचा पर्याय असतो. पण काहीवेळा लायब्ररीमध्ये जाण्यासाठीसुद्धा वेळ मिळत नाही. मुंबईच्या आजच्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये हे प्रामुख्याने जाणवताना दिसून येतं.
अशाच वाचकप्रेमींसाठी मुंबईत एक नवीन पर्याय समोर आला आहे. “अमीगोज इंटरप्रायजेस” आणि “फ्रेंड्स लायब्ररी”च्या माध्यमातून मुंबईमध्ये एका क्लिकवर आता पुस्तकं उपलब्ध होणार आहेत.
`फ्रेंड्स’ लायब्ररीच्या घरपोच पुस्तक सेवेच्या माध्यमातून मुंबईकर वाचकांना ही सुविधा देण्यात येणार आहे.
गेली ३४ वर्षे या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून मुंबईमध्ये सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. ११ वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये फ्रेंड्सच्या या सेवेचा आनंद हजारो वाचक उपभोगत आहेत.
संपूर्ण मुंबईत ही सेवा देण्यात येणार असून पुस्तके वाचकांना घरपोच वाचायला मिळणार आहेत.
यासाठी friendslibrary.in या संकेतस्थळावर वाचकांना लायब्ररी मधील पुस्तकांची माहिती मिळेल.
लायब्ररी चे सभासदत्व घेऊन या घरपोच सेवेचा लाभ घेता येईल.
सध्या लायब्ररीकडे जवळपास अडीच लाख पुस्तकांचा संग्रह आहे. त्यामुळे वाचकांना याचा निश्चित फायदा होणार आहे.
“वाचकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असून मुंबईमध्ये अधिकाधिक वाचकांनी याचा फायदा घ्यावा” असे आवाहन अमीगो इंटरप्रायजेसच्या वतीने करण्यात येत आहे.
खास आकर्षणं:
३३ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले वाचनालय
२० हजारहून अधिक समाधानी सभासद
२,७५,००० हुन अधिक इंग्रजी व मराठी पुस्तके, मासिके, दिवाळी अंक
आपल्या आवडीचे लेखक, निरनिराळे विषय, नवीन प्रकाशित व लोकप्रिय पुस्तके आणि दिवाळी अंक उपलब्ध
विनामुल्य घरपोच सेवा
फोन वरून पुस्तक नोंदणी: 97698 46808
वेबसाईटच्या माध्यमातून पुस्तक नोंदणी – friendslibrary.in
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.