' लाथा बुक्क्यांनी तुडवल्यापासून देवी-देवतांना “नीच” म्हणण्यापर्यंत: काश्मिरी पंडिताची चीड आणणारी व्यथा – InMarathi

लाथा बुक्क्यांनी तुडवल्यापासून देवी-देवतांना “नीच” म्हणण्यापर्यंत: काश्मिरी पंडिताची चीड आणणारी व्यथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

काश्मिरच्या निसर्गरम्य देखाव्यांत, डोळ्याचं पारणं फेडणा-या दृश्यांच्या पल्याड अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कायमच नजरेआड केल्या जातात.

त्या दुर्लक्षित केल्या जाण्याचं खापर नेमकं कुणाच्या माथी ? राजकीय नेतेमंडळी ? सामाजिकतेचा बुरखा चढविलेले सुधारक ? की आपला काय संबंध असं म्हणत नामनिराळे होणारे आपण?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना काश्मिरी पंडितांची भयावह स्थिती अंगावर काटा आणणारी ठरते.

काश्मिरच्या द-याखो-यात ज्यांच केवळ घरंच नव्हे तर स्वतंत्र, ठसठसशी अस्तित्व होतं, त्यांची ओळखच आता पुसली जात असल्याचा  उद्रेक केवळ संतापजनकच नाही, तर भितीने अंगावर काटा आणणारा आहे.

कायमच चर्चेचा आणि चिंतेचा विषय असलेल्या काश्मिरातील काश्मिरी पंडितांची व्यथा मांडण्याचा एक प्रभावी प्रयत्न केलाय, एका तरुण नेटेक-याने…

ट्विटरचा आधार घेत काश्मिरी पंडितांचे भयावह वास्तव देशापुढे नव्हे तर जगापुढे मांडण्याचा त्याचा हा प्रयत्न अनेकांची झोप उडविणारा आहे.

 

 

 

How many of you who follow, have seen classmate getting kicked on face, on pebbled road, by boys wearing boots in India.

We have.

Nightmare of that day haunts. We were a bunch of Hindu’s who were holding on to a curse, of being Hindu,which our parents chose & became refugees.

तुमच्यापैकी कितीजणांनी, रस्त्यातून जाणा-या आपल्या वर्गमित्राच्या तोंडावर पायातील चपलेचा झालेला मारा पाहिला आहे?

मी पाहिलंं आहे.

कारण रात्री पडणारी स्वप्न नेहमीच भितीदायक वाटायची. या सगळ्याला आमचे पालक जबाबदार होते, कारण त्यांनी हिंदु असणं पसंत केलं होतं, आणि पर्यायी निर्वासित राहणं त्यांना स्विकारावं लागलं होतं.

 

 

 

How many heard, “Killing You”, should be first priority rather than a Snake, when one came across a Snake & You at the same time.

We have.

What was our fault? Fault of being Hindu Refugee in India & it was our parents, responsible for that fault, for they chose to remain Hindu.

तुम्ही कधी ऐकलंय, की आपण आणि साप असे दोघेही समोरासमोरून जात आहोत, आणि समोरच्याने सापाऐवजी आपल्याला मारण्याला प्राधान्य दिलं ?

आमच्याकडे असचं आहे.

यात नेमका आमचा दोष काय ? तर हिंदु म्हणून जन्माला आलो हाच. अर्थात तो देखील आमच्या पालकांचा गुन्हा आहे. कारण त्यांनी कायमच हिंदु राहणं पसंत केलं,

 

 

How many of you went to College & when got late, saw your mother worried, standing on the stairs of the Verandah, waiting for your return. Worried if you would return alright or after being beaten up & bleeding

. We have.

For no fault of ours but our parents, who didn’t convert.

तुमच्यापैकी किती जणांचे पालक तुम्हाला उशीर झाला की अस्वस्थ होतात ? तुम्हाला कॉलेजहून परतण्यास उशीर झाला, तर तुमची आई व-हांड्यात काळजीनं, भितीनं कासावीस झाली आहे,

अर्थात तुम्ही घरी परतताना तुमच्यावर हल्ला झाला आणि रक्तबंबाळ अवस्थेत तर तुम्ही घरी येणार नाही ना ही तिची प्रमुख काळजी असते.

आमच्याकडे हे नेहमीच होतं.

कारण यात आमचा दोष नसला तरी आमच्या पालकांचा आहे. कारण, त्यांनी परधर्म न स्विकारता हिंदुच राहणं पसंत केलं.

 

 

How many of you were made to feel at every step, an inferior human being with no right to live freely. You were worshipping inferior Gods & Goddesses, infact you were devil worshipping cult.

We have.

For no fault of ours but our parents, who chose to become refugee in India.

तुमच्यापैकी कितीजणांना आयुष्याच्या प्रत्येक पावलावर असं वाटलं आहे, की तुम्ही अत्यंत दर्जाहीन, निराधान आणि जगण्याचं कोणतंही स्वातंत्र्य नसलेली व्यक्ती आहात. तुम्ही अत्यंत श्रद्धेने ज्या देव-देवतांची पुजा करत होतात, त्या प्रत्यक्षात दैत्य शक्ती आहेत.

आमच्याकडे असं वाटंत,

यातही आमचा कोणताही दोष नाही, दोष आहे तो केवळ आमच्या पालकांचा, अर्थात या देशाला आपलं मानून त्यांनी आपल्य़ाच देशात निर्वासित म्हणून जगणं पसंत केलं.

 

 

How many of you, didn’t have the freedom to worship your God and only celebration for which a Bengali Hindu lives and saves daily of their life, Durga Puja.

We have.

For no fault of ours but our refugee parents, who didn’t have enough money to take us to safer places & live.

तुमच्यापैकी कितीजणांकडे तुमची श्रद्धा असलेल्या देवतेचं पुजन करण्याचाही अधिकार नाही ? बंगाली हिंदुचे जीवन वाचविणा-या मा दुर्गाचीच पुजा करणारे सण-उत्सवचं केवळ साजरे करावे लागतात ?

आमच्याकडे हे नेहमीच घडतं.

कारण यात आमचा काहीच दोष नाही, दोष आहे तो आमच्या पालकांचा, कारण आम्हाला सुरक्षित स्थळी नेवून जगविण्यासाठी त्यांच्या हाती पुरेसे पैसेचं नव्हते.

 

 

How many of you every now and then cleared loads of paper leaflets from your letter box, which had information on “Good News”.

We have.

For we were souls which needed to be rescued. Were poor Bengali refugees, who once rescued were told elite education awaits. But we didn’t.

तुमच्यापैकी किती जणांनी लेटर बॉक्समध्ये ढिगाने भरलेल्या “खुशखबर”ची पत्रकं साफ केली आहेत?

आम्ही केलीयेत.

कारण “वाचवण्याची” गरज असणारे आत्मे होतो आम्ही. बांगलादेशी शरणार्थ्यांना “उच्च शिक्षणाची” आश्वासनं दिली गेली. आम्हाला नाही.

 

 

How many of you saw your neighborhood, bright & full of life friend, after taking admission in an institute, went calm. Returned home & hid face with shawl, because his face was all swollen & red, due to daily beating he got.

We have.

Fault, he was son of a poor Hindu Bengali.

तुमच्या शेजारी राहणारा,उत्साही, आनंदी मित्राला शैक्षणिक इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर झालेला आनंद पाहिलात ? उत्साहाने जाणारा, मात्र घरी परतल्यानंतर रोजच्या मारहाणीने लाल, काळ्या रंगाचे जखमेचे व्रण घेऊन येणारा निरपराध मुलगा तुम्ही कधी पाहिलाय ?

आम्ही पाहिलाय.

कारण तो एका अत्यंत गरिब हिंदु बंगाली कुटुंबातील मुलगा म्हणून जन्माला आला हा त्याचा दोष आहे.

 

 

How many of you know of stories where, because two friends, didn’t know the finer nuances of dialect, while counting 1,2,3 were pulled out of the vehicle they were traveling in & lynched.

We have.

Reason was, yes, you got the answer right, reason we were Hindu Bengali Refugees.

तुमच्यापैकी किती जणांना बोलीभाषा ठाऊक नसणा-या दोन मित्रांची कथा माहित आहे ? बोलीभाषेची माहिती नसल्याने 1,2, 3 असे अंक मोजणारे ते दोघं ज्या वाहनात बसून अंक मोजत होते, त्याच अंकातून अचानक, विनाकारण बाहेर ढकलले गेल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे ?

आम्ही पाहिलं आहे.

तुम्ही अचूर उत्तर हेरलं आहे, या सगळ्याचं कारण आहे, की आम्ह हिंदु बंगाली निर्वासित आहोत.

 

 

How many of you slept in fear, wearing sneakers, with packed steel trunk, mother in her little better sari & before switching off the lights, she declared to, be ready to be refugee again.

We did.

Reason, our so called refugee “Ghetto” was under threat of attack that night.

मनात भिती, शंका, पायात चप्पल, एका स्टिलच्या जुन्या ट्रंकेत सामानाची बांधाबांध, आईने नेहमीपेक्षा जरा ब-यापैकी साडी गुंडाळलेली आणि तयारी होताच, दिवे बंद करण्यापुर्वीच, आपण पुन्हा एकदा निर्वासित म्हणून राहणार आहोत, ही आईनं केलेली घोषणा, ही निराशा तुमच्या पदरी नेमकी कितीवेळा पडली आहे.

आम्ही हे अनुभवलं आहे.

कारण फक्त एवढचं, की आम्हा निर्वासितांमधील स्वतःला प्रमुख अर्थात घेटो म्हणून पुकारणा-यांना त्या रात्री हल्ल्याचा धोका जाणवत होता.

 

 

How many of you served tea to CRPF during curfew hours for they were protectors. How many saw Army Flag March & got to know terror training camp has been found inside the jungle behind Quarter, where you lived & dismantled by Army.

We did.

And we were pawns for secessionist.

तुमच्यापैकी कितीजणांनी कर्फ्यूच्या वेळी संरक्षक असलेल्या सीआरपीएफला चहा दिला. तुम्ही आर्मी फ्लॅगमार्च पाहिले आणि नंतर कळलं की, ज्या जागेत तुम्ही रहात होता, त्या क्वॉर्टरच्या मागेच दहशतवादी प्रशिक्षण शिबिर सापडले आणि सैन्याने ते नेस्तनाभुत केलं.

हे सारं आम्ही अनुभवलंय.

कारण आम्ही अलगाववादी साठी प्यादी ठरत होतो.

 

 

How many of you left the land where you were born & brought up, never wanting to return as most you grew up with has left. It’s one wave after another wave of people leaving. Living there is full of insecurity & hollow feeling.

We have.

For no land belongs to us like natives.

ज्या जागेत तुम्ही जन्म घेतलात, ज्या घरात, आजुबाजुच्या परिसरात तुम्ही खेळलात, वाढलात असं प्राणांहून प्रिय असलेलं घर तुम्हाला सोडावं लागलं तर ? अर्थातच हे घर सोडण्याची कोणतीही इच्छा नसताना, तुम्हा तेथून उचलून अशा एका निर्जन स्थळी आणण्यात आलं जिथे तुमच्यासारखेच हजारो हतबल लोकं भितीच्या छायेत वावरतायत.

आमच्याबाबत असं अनेकदा घडलयं

कारण आमच्या देशात, आमच्या मालकीची, हक्काची अशी जमिन उरलेली नाही.

 

 

How many of you here today see the ones whose kind tortured, insulted, abused, physically harmed you, made you feel an insect, is virtue signalling, pretending victim, getting special treatment & faking history.

We do see.

Well, we lived to tell our story. We were left alive.

तुम्हाला छळणारे, सातत्याने अपमान करणारे, शारिरीक, मानसिक अशा सर्वार्थाने तुमचा छळ करणारे, ज्यांच्यामुळे तुम्हाला आपण एखाद्या किटकाचं जीवन जगत आहोत, ही यातना जीवंतपणी भोगावी लागत आहे, अशी निष्ठुर व्यक्ती, आपण निरपराध आहोत असं भासवत आहे, गुन्हा करून तिच व्यक्ती स्वतः उपचार घेण्याचं सोंग घेत आहे, असा विसंवाद तुम्ही कधी पाहिलाय. होय, कारण इतिहास बनावटी आहे.

आम्ही पाहिलाय.

पण आमची सत्यकथा जगाला सांगायला आम्ही जीवंत आहोत, आणि जगत राहणार.

 

 

We remained Hindu – Thanks to Bharat Sevashram Sangha. We remained Hindu – Thanks to close bonding between Refugee Hindu Bengalis. We remained Hindu – Thanks to our parents for they didn’t convert.

We survived

Thanks to CRPF & Indian Army. We Survived – Thanks to Maa Durga

आम्ही हिंदु राहिलो, भारत सेवाश्रम संघाचे आभार, आम्ही हिंदु राहिलो, हिंदु बंगाली असलेल्या निर्वासितांमध्ये जो दृढसंबंध निर्माण झाला आहे त्या सर्वासाठी धन्यवाद, आम्ही हिंदु राहिलो, कारण आमच्या पालकांनी धर्मांतर स्विकारलं नाही, त्यासाठी त्यांचेही आभार.

आम्ही वाचलो.

सीआरपीएफ आणि भारतीय़ सैन्याचे खूप आभार, आम्ही बचावलो, त्यासाठी मा दुर्गाचेही खूप आभार.

 

 

What we had, nothing. Not even basic “Human Respect” was granted to us. We were for Martial Arts practice – could kick us, punch us, bleed us, beat us was game. Then while walking past, you would hear catcalls & then came the dirty foreigner jibe.

Freedom was not our right.

आमच्याकडे आमचं असं काहीच नव्हतं, मानवी मुलभुत अधिकार कधीच नव्हते. कारण आम्हाला ते दिले गेले नव्हते. मार्शल आर्ट्सचं एक जीवंत साधन म्हणून आमच्याकडे पाहिलं जायचं. ठोसा मारणं, या मारहाणीच्या सरावात रक्त काढणं, खेळात आम्हाला दुखापत करणं हे सगळं त्यांच्यासाठी नैसर्गिक होतं, त्यानंतर चालताना पायातून वेदना ऐकु आल्या, की त्यावर परदेशी व्यक्तींकडून केली जाणारी गलिच्छ टिकाही सहन करावी लागायची.

स्वातंत्र हा आमच्यासाठी अधिकार नव्हता.

 

 

In markets, poor vegetable vendors were at receiving end. Pickup vegetable, don’t pay money and if vendor dared to ask for money, well that was his last day in the market or if he fell on feet of the tormentor & begged mercy he would be seen the next day.

All freezed in fear.

बाजारपेठेतही तेच चित्र होतं, खराब भाजीविक्रेत्यांचा शेवट आला होता. पैसे न देता भाजीपाला उचलला जात होता, आणि जर भाजीविक्रेत्याने त्याचे पैसे मागितले तर तो बाजाराचा शेवटचा दिवस ठरत होता. किंवा एखादा विक्रेत्या त्यांच्या हातापाया पडला, दया मागितली, तर दुस-या दिवशी तो इतरांच्या नजरेस पडत होता.

सारं काही भितीनं गोठलं होतं.

 

 

Everything freezed. Time freezed, respect freezed, human inside came to a stop, no one dared to raise voice or stop & who didn’t care, for them Bengali Hindu was a game & a sub-human.

It was said, Dao (Sword) if pulled out, it needed blood & only then it could be pulled back.

सर्वकाही गोठलं होतं, काळ गोठला बोता, आदर गोठला होता. माणसाला त्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी कुणीही प्रयत्न करत नव्हतं, किंबहुना स्वतःचा अधिकार मिळविण्यासाठी आवाज उठविण्याची कुणातही हिंमत नव्हती. कारण हिंदु बंगाली म्हणजे त्यांच्यासाठी नेहमीच एक खेळ होता, आम्ही माणुस नव्हतोच, तर त्यांच्यासाठी अस्तित्वात असलेला उप मानव होतो.

असं म्हटलं जायतचं, की एकदा उगारलेलं दावं रक्ताची गरज भासल्यानंतरच मागे खेचलं जाऊ शकतं.

 

 

 

As events unfolded, a silent boy was observing. Sometime standing by side of his father, at other by mother, with friends & at times alone.

Where were THE Hindu Organizations then. None were to be seen anywhere.

Think CAA, was in a way, saying sorry to us, Refugee Hindus.

End.

ज्यावेळी या सगळ्या घटना घडत होत्या, त्यावेळी एक मुक मुलगा हे सगळं पहात होता. कधी वडिलांच्या बाजुने उभे राहून, तर कधी आईच्या शेजारी. कधी मित्रांसह तर कधी पुर्णपणे एकाकी.

त्यावेळी या हिंदुत्ववादी संघटना कुठे होत्या? यापैकी एकही संघटना तेंव्हा दिसली नाही.

सीएए, जरा विचार करा. हिंदु निर्वासितांची माफी मागण्याचा हा एक मार्ग आहे.

समाप्त.

 

 

Why did I write this?

Wrote it as was fed up of virtue signalling by the hunters who hunted us down. Fed up at, even after living on central funds, with protection, no taxes, getting all benefits crying as endangered.

Till a lion tells his story, people will glorify the hunter.

मी हे सगळं का लिहीलं ?

कारण आमची वारंवार शिकार करणा-या शिका-यांच्या जाचाला आम्ही कंटाळलो आहोत. केंद्राच्या निधीवर जगणा-या, कर न घेता संरक्षणासह सगळ्याच सुविधांवर हक्क सांगणा-या आणि तरिही ओरडणा-यांचं सत्य सांगायला.

कारण जोपर्यंत सिंह आपली कथा सांगत नाही, तोपर्यंत कायमच शिका-याचं कौतुक होत असतं.

सीएएच्या मुद्द्यावरून इंटरनेटवर गाजणारा गदारोळ आणि त्यावर होणारी मतमतांतरे नवी नाहीत, मात्र या सगळ्यात जळजळीत भुतकाळ, तितकाच भयानक वर्तमान आणि भविष्याची भिती मांडण्याचा हा युवा नेटेक-याचा प्रयत्न निश्चित वाखाखण्याजोगा आहे.

भविष्य उज्लव करायचं असेल, तर भुतकाळात रमु नये असं म्हणतात, मात्र वर्तमानात घडणा-या घटनांचा अभ्यास करण्यासाठी इतिहासात डोकवावं लागणार हे देखील तितकंच खरं.

नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देणा-या किंवा हट्टाने विरोधाचे काळे झेंडे दाखविणा-यांनी वादप्रतिवादाचा हा पडदा किमान काही वेळासाठी बाजुला सारून काश्मिरी पंडितांच्या अजूनही भळभळणा-या जखमांकडे तर्कशुद्ध बुद्धीने पाहणे गरजेचं आहे.

जर ह्या मुळ ट्विट्स वाचायच्या असतील तर या लिंकवर क्लिक करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?