नात्यात सतत भांडणं होताहेत ? नातं फुलवण्यासाठी या गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
वसुधैव कुटुंबकम् ‘ अशी संस्कृती असलेल्या आपल्या देशात नातेसंबंध हा खूप महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे…
लहानपापासूनच म्हणजे अगदी जन्माला आल्यापासूनच आपल्याला आई, हे बाबा,हे आजी आजोबा अशी नात्यांची ओळखच करून दिली जाते. मात्र हे नातेसंबंध जपले जाणं खूप महत्त्वाचं आहे..
नात्यांची वीण मजबूत करणं हे खरं तर त्या दोन माणसांवर अवलंबून असतं. यात नातं ही कल्पना फक्त नवरा बायको, प्रेयसी प्रियकर यांच्यापूर्ती मर्यादित न राहता ती सर्व नात्यांसाठी तेवढीच गरजेची आहे.
नातं हे खरं तर एखाद्या बंधनासारख पाहिलं जातं..मात्र जेव्हा नातं असूनही बंधन जाणवत नाही तेव्हा ते खर निकोप नातं म्हणता येतं…
तुमच्या आजुबाजुलाा असलेल्या अनेक नात्यांचे बंध तुम्हालाही मजबुत करायचेत ? हरवत चाललेली नात्यांची गंमत पुन्हा एकदा अनुभवायचीय ? मग नात्यातील वीण मजबूत करण्यासाठी खालील गोष्टींचा विचार करता येऊ शकतो..
१. शेअरिंग
नात्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअरिंग…
दोन माणसांमध्ये जेवढं जास्त संभाषण होतं तेवढी त्यांची जवळीक वाढते. आपल्या आयुष्यात आपली प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायला कोणीतरी आहे हीच गोष्ट खूप सुखावह असते. जेवढं शेअरिंग जास्त तेवढी दोन मनं जवळ येतात.
२. मनमोकळा संवाद
मनातील एखादी भावना व्यक्त न करता ती मनातच ठेवल्याने नात्यात गुंता झाल्याचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे ?
जो माणूस मनात काही न ठेवता जे आहे ते बोलून मोकळा होतो त्याचे नातेसंबंध जास्त दृढ असतात. यामध्ये समोरच्या माणसाचा आलेला राग, खटकलेली एखादी गोष्ट, न आवडणारी सवय अशा नकारात्मक गोष्टी प्रामुख्याने आधी सांगून टाकाव्यात.
आपल्याला वाटणाऱ्या भावना,किंवा अपेक्षित गोष्टी जर वेळेवर बोलून दाखवल्या गेल्या तर समोरची व्यक्ती सुद्धा त्या दृष्टीने कृती करू शकते. कारण ‘मन चंगा तो सब कुछ चंगा.’
३. समोरच्या व्यक्ती ला गृहीत न धरणे
आपल्याला गृृहित धरलंं जात असल्याची तक्रार केली जाते. बहुतांश महिलांकडून केली जात असते.
समोरची व्यक्ती आपलीच आहे म्हणून तिला सतत गृहीत धरणे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे जी नात्यांमध्ये बाधा आणू शकते. समोरची व्यक्ती या गोष्टी वर अशीच रिअक्ट होईल किंवा तिने व्हावं अशी आपली अपेक्षा असते.
पण तसं न करता त्या व्यक्तीला तिची स्पेस देणं जास्त गरजेचं असतं.
४. विश्वास दाखवणं
विश्वास ह नात्यांचा पाया आहे. विश्वास नुसता मनात असून चालत नाही तर तो कृतीतून सुद्धा दाखवावा लागतो.
समोरील माणूस आपल्या चांगल्या व वाईट दोन्ही वेळी आपल्यासोबत आहे, ही भावना निर्माण होण जास्त गरजेचं असतं. नाहीतर नवरा बायको यांच्या नात्यात संशयी स्वभाव नात्यात जास्त फूट पाडते.
संशयाची अनेक उदाहरणं आपण याआधीच पाहिली आहेत. त्यामुळे तुमच्या कोणत्याही नात्यात अविश्वासाला स्थान देऊ नका.
५. मैत्रीचे नाते निर्माण करणे
मैत्रीचे नाते हे सगळ्यात निर्मळ मानलं जातं. ज्या मध्ये कोणताही आडपडदा न ठेवता माणूस वाटेल त्या गोष्टी बोलू शकतो.
ज्याप्रमाणे आपल्या मित्र मैत्रिणीशी आपण मनमोकळा संवाद साधतो. तिच पारदर्शकता प्रत्येक नात्यात असणं गरजेची आहे.
काही नात्यांमध्ये विशेषतः नवरा व बायको मध्ये खूप गोष्टीत जबरदस्ती होताना दिसते. हे असच आहे..तू असच केलं पाहिजेस..असच राहील पाहिजेस..या गोष्टींमुळे ते नातं फुलायच्या ऐवजी कोमेजून जातं.
७.वेळ व स्पेस देणं
काही नाती फुलण्यासाठी त्या नात्याला लागणारा वेळ आणि त्या व्यक्तीला लागणारी स्पेस देणं खूप गरजेचं असतं.
एखादी व्यक्ती नवीन असेल तर नातं निभावण्यासाठी त्या व्यक्तीला लागणारा वेळ देणं फार महत्त्वाचं आहे.
८.एकत्र वेळ घालवणं
तुमच्या कुटुंबियांसह संपुर्ण दिवसभर एकत्र वेळ घालविल्याचं आठवतयं ? व्हॉट्सअपपेक्षा मित्राला प्रत्यक्ष भेटून दिवसभर मारलेेल्या गप्पा, किंवा इमोजी पाठविण्यापेक्षा मनाला येईल तेंव्हा प्रिय व्यक्तीला मारलेली मिठी ? हे सगळे क्षण तुम्हाला चटकन आठवत नसतील तर तुम्ही तुमचं नातं खरोखर रिफ्रेश करायची गरज आहे.
तुमचं काम, करिअर, स्पर्धेत टिकण्यासाठी अहोरात्र मेहनत ही काळाची गरज आहे यात शंका नाही, मात्र या सगळ्यासाठी तुम्ही नाती पणाला लावत असाल, तर तुमचं नक्कीच चुकतंय.
स्पर्धा, नोकरी या गोष्टी काही कालांतराने संपणा-या असतात, मात्र नाती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत आहेत, त्यामुळे तुमचा प्राधान्यक्रम ठरवा आणि कुटुंब, मित्र यांना वेळ द्या.
माणूस हा घोळक्यात रमणारा प्राणी आहे. दोन माणसे जेवढा वेळ एकत्र घालवतात तेवढी ती एकमेकांशी जास्त कनेक्ट होतात. एकमेकांना जास्त समजून घेऊन आपल्या वागण्यात योग्य तो बदल करू शकतात.
९.समोरील व्यक्ती खास आहे हे दाखवून देणं.
आताआतापर्यंत मित्राच्या वाढदिवसाला पार्टीसाठी बाहेरं जाणं, आईच्या वाढदिवसाला एखादी छानशी साडी खरेदी करून दिला सरप्राईज देणं, पतीचं प्रमोशन झाल्यावर त्याला गिफ्ट देत खुश करणं हे क्षण आता दुर्मिळ झाले आहेत.
सोशल मिडीयावर विश करण्यापेक्षा समोरच्याला भेटून खुश करण्यात जास्त गंमत असते, हे पुन्हा अनुभवा.
आपल्या प्रिय व्यक्तींचे वाढदिवस किंवा काही महत्वाचे दिवस लक्षात ठेवून त्या दिवशी त्यांना भेटवस्तू देणे किंवा तो दिवस त्यांच्या लक्षात राहील असा साजरा करणे या छोट्या छोट्या कृती सुद्धा नात्यांची वीण अधिक घट्ट करायला मदत करतात.
१०. अपमान न करणे
माणसं चुकू शकतात मात्र माणसांच्या चुका त्यांना कधीच सर्वांसमोर दाखवून देऊ नयेत.
हा झालेलं अपमान सुद्धा दोन माणसाचे नाते डळमळीत करू शकतो. माणसाची चूक नेहमी त्याला एकट्याला बाजूला घेऊनच सांगावी मात्र चारचौघात त्याचा कधीही अपमान करू नये.
या आणि अश्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी नात्यांची वीण मजबूत करता येते…शेवटी दोन माणसे एकमेकांना किती समजून घेतात यावर सगळं अवलंबून असतं.
आजच्या धकाधकीच्या काळात तर या गोष्टी खूप कठीण होऊन बसल्या आहेत…तरीही नातं तुटणार नाही याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी झाला पाहिजे. खरं तर नातं कमजोर होईल एवढी वेळ येऊ न देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
कारण आयुष्यात बाकी सगळ्या गोष्टी विकत मिळतील पण नात्यांची ऊब कितीही पैसा मोजला तरी मिळणार नाही त्यासाठी तेवढी आपुलकीची माणसंच जवळ हवीत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.