सुपरफास्ट ‘डेक्कन क्वीन’ कल्याणला का थांबत नाही? कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन ही महाराष्ट्राच्या मुंबई व पुणे या शहरांदरम्यान रोज धावणारी एक खास रेल्वेगाडी. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी या गाडीचे एक विशेष स्थान आहे. ही गाडी असंख्य चाकरमान्यांसाठी रोजच्या प्रवासाचे साधन आहे.
मध्यंतरी लॉकडाऊन आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही काळ ही ट्रेन बंद करण्यात आली होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
१९३० पासून ते आजपर्यंत या गाडीच्या असंख्य आठवणी लोकांच्या मनात आहेत. एवढी चांगली गाडी असूनही प्रवाशांना पूर्णपणे त्याचा लाभ घेता येत नाही.
दादर, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वगळता या गाडीला थांबे देण्यात आलेले नाहीत त्यामुळे अनेकदा ठाणे, कल्याणला या गाडीने प्रवास करणाऱ्या लोकांचे हालच होतात.
गाडीला नवीन थांबे दिले तर प्रवासी संख्या वाढेल आणि त्यातून रेल्वेला फायदा होईल असाही युक्तिवाद करण्यात आलेला आहे. मात्र, काही कारणांमुळे कल्याणला ही गाडी थांबत नाही.
रेल्वे संघटनांची आंदोलनं, पत्रव्यवहार, मागण्या यानंतरही रेल्वेची भूमिका कायम असून एका खास कारणामुळे ही गाडी कल्याणला थांबत नाही.
काय आहे हे कारण आणि कल्याण थांबा न मिळण्यामागे कोणती वेगवेगळी कारणं आहेत याचाच वेध या लेखात घेऊ या…
दख्खनची राणी जून १, १९३० रोजी ब्रिटिश साम्राज्याच्या काळात सुरू झाली. तिचा उपयोग प्रामुख्याने घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांची मुंबई व पुण्यादरम्यान ने-आण करण्यासाठी होत असे.
सुरुवातीला केवळ शनिवार, रविवार चालणारी ही गाडी आता रोज धावते. ऑफिससाठी मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी तर ही गाडी हक्काचा आधार आहे.
सुरुवातीच्या काळानंतर हळूहळू तिच्या सेवेचा विस्तार करण्यात आला व दख्खनची राणी या दोन शहरांदरम्यान रोज धावू लागली. ह्या गाडीचा पहिला प्रवास कल्याण ते पुणे असा झाला.
पण आता ती कल्याणला थांबत नाही.
–
- ट्रेनच्या डब्यांवर पिवळ्या – पांढऱ्या रंगांचे पट्टे असण्याचं कारण जाणून घ्या…
- ऑक्सिजन एक्सप्रेस आधी तहानलेल्या लातूरकरांसाठी ही ट्रेन धावली होती…
–
खरं तर मुंबईला उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे एक महत्वाचे स्थानक म्हणजे कल्याण. कल्याण रेल्वे स्थानकाची प्रवासीसंख्याही जास्त आहे. येथून अनेक जण दररोज वेगवेगळ्या मार्गांवर प्रवास करतात.
कल्याण स्थानकात दररोज लांब पल्ल्याच्या तसेच उपनगरी अशा एकूण ९०० गाड्या थांबतात.
त्यामुळे कोणतीही लांब पल्ल्याची गाडी सामान्यपणे कल्याणला थांबते. ठाण्यापलीकडे राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी पुण्याला जाणाऱ्या गाड्यांनासुद्धा कल्याण थांबा निश्चितच देण्यात आला आहे. पण डेक्कन क्वीन मात्र याला अपवाद आहे.
उपलब्ध माहितीनुसार याचे खालील कारण सांगितले जाते.
कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून रेल्वे धावत होती ह्याबद्दल रेल्वे काही कर कल्याण नगरपालिकेला देऊ लागत असे, पण पुढे काही वर्षे रेल्वेने तो कर नगरपालिकेला दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचले.
कोर्टाने कल्याण नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि कल्याण नगरपालिकेने डेक्कन क्वीन ह्या गाडीचे इंजिन जप्त केले.
रेल्वेचे अधिकारी दुसऱ्या दिवशी आले, त्यांनी तो कर भरला आणि मग कल्याण नगरपालिकेने ते जप्त करून एक रात्र स्वतःच्या ताब्यात ठेवलेले डेक्कन क्वीनचे इंजिन रेल्वेला परत केले.
आपला हा अपमान आणि नामुष्की रेल्वे विसरली नाही आणि तिने कल्याणला डेक्कन क्वीन ही गाडी कधीच न थांबवण्याचा निर्णय घेतला.
ह्या खटल्यात कल्याण नगरपालिकेची बाजू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत.
प्रशस्त जागा, वेगवान प्रवासाची क्षमता, आरामदायी कोच ही डेक्कन क्वीनची खास वैशिष्ट्ये. खऱ्या अर्थाने डेक्कन क्वीनचा थाट राजेशाही आहे. या गाडीला सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. जवळपास ८९ वर्षांची प्रदीर्घ परंपरा या गाडीला लाभलेली आहे.
ताशी १६० किमी वेगाने धावण्यास पूरक लिकें हॉफमन बूश (एलएचबी) डबे जोडून ‘डायनिंग कार’ वातानुकूलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे, येत्या काळात तर गाडीचा वेग आणखी वाढणार आहे.याशिवाय डेक्कन क्वीनचे खरे वैशिष्ट्य आहे ती येथील सर्वोत्कृष्ट डायनिंग कार. डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार सुविधा ही भारतातील अन्य कोणत्याही गाडीमध्ये उपलब्ध नाही.
हॉटेलप्रमाणे किचन आणि त्याच ठिकाणी ग्राहकांना बसून खाण्याची सोय, अशी डायनिंग कारची रचना आहे. या डायनिंगकारमध्ये ३२ टेबल-खुर्च्या आहेत.
पुणे-मुंबई प्रवासामध्ये कित्येक प्रवासी डायनिंग कारमध्ये बसावयास जागा मिळावी, यासाठी नंबर लावून ताटकळत उभे राहतात. आकर्षक अंतर्गत रचनेमुळे डेक्कन क्वीनची डायनिंग कार प्रसिद्ध आहे. भविष्यात एसी डायनिंग कारही प्रस्तावित आहे.
या सगळ्या सोयीसुविधांमुळे कल्याण, कर्जत येथे या गाडीला थांबा मिळावा आणि प्रवाशांची सोय व्हावी अशी अनेक वेळा मागणी झाली आहे.
मात्र, रेल्वेद्वारे त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. केवळ धोरणापलीकडेही अनेक कारणे रेल्वेकडून दिली जात आहेत.
डेक्कनला सुपरफास्ट गाडीचा दर्जा देण्यात आला आहे. जर या गाडीच्या थांब्यामध्ये वाढ झाली तर गाडीच्या वेळात फरक पडेल आणि त्यामुळे गाडीचा सुपरफास्ट हा दर्जा राहणार नाही.
त्यामुळे या गोष्टीचा विचार करून गाडीला नवीन थांबे दिले जात नसल्याचे सांगितले जाते.
सकाळी ऑफिसच्या गर्दीच्या वेळापत्रकाच्या वेळी या गाडीला कल्याणला थांबा दिला तर त्यावेळी मध्य रेल्वेचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.
याशिवाय पुण्याहुन मुंबईला आणि मुंबईहुन पुण्याला जाणाऱ्या इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे रेल्वेकडून कल्याण थांब्यासाठी परवानगी दिली जात नसल्याचे सांगितले जाते.
याशिवाय, प्लॅटफॉर्मची उपलब्धता आणि गाडीची वेळ, प्रवाशांची गर्दी हीसुद्धा कारणे दिली जातात.
याआधी प्रचंड मागणीमुळे इंद्रायणी एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा देण्यात आला होता. डेक्कन क्वीनची कल्याण थांब्याची मागणी पूर्ण होणार की प्रवाशांची प्रतिक्षा कायम राहणार हे तर वेळच ठरवेल.
पण मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी डेक्कन क्वीन ही नेहमीच स्पेशल गाडी असेल आणि त्याचा कल्याण थांबा प्रवाशांना नक्कीच हवाहवासा असेल हे निश्चित.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.