' जगभरात निर्वासित, आश्रितांना कसं वागवलं जातं? काय आहेत सिटीझनशिपचे कायदे? – InMarathi

जगभरात निर्वासित, आश्रितांना कसं वागवलं जातं? काय आहेत सिटीझनशिपचे कायदे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

भारतामध्ये सध्याच्या घडीला CAA आणि NRC या कायद्यांवरून वातावरण चांगलेच तापले आहे. सिटीझनशिप अमेंडमेंट कायद्याच्या विरोधात आंदोलने आणि मोर्चे मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

भारतात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात हे चित्र असलं तरीही अशाप्रकारचा कायदा केवळ आपल्याकडेच नाही तर सर्व देशांमध्ये बघायला मिळतो.

प्रत्येक देशामध्ये नागरिकत्वाबद्दल वेगवेगळे कायदे आहेत. अनेक देशांमध्ये तर हे कायदे अत्यंत कडक आहेत.

 

caa protest inmarathi

 

सहसा सर्वच ठिकाणी तुम्हाला जन्माने नागरिकत्व प्राप्त होते. मात्र आपला देश सोडून बाहेरच्या देशात जाऊन राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. अशावेळी दुसऱ्या देशातील नागरिकत्वाच्या अटी, शर्तींची पूर्तता करून त्यानुसार त्या देशाचे नागरिकत्व तुम्हाला प्राप्त होऊ शकते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

याबाबतीत प्रत्येक देशाचे स्वतंत्र नियम, अटी आहेत. जगभरात सिटीझनशिपचे नियम कोणते, भारताबाहेर नागरिकत्व नसलेल्यांना कसं वागवलं जातं आणि नियमांची पूर्तता करून नागरिकत्व कशाप्रकारे मिळवावे लागते ते आपण देशांनुसार पाहूया.

 

ऑस्ट्रेलिया :

 

australia inmarathi
world atlas

 

ऑस्ट्रेलियामध्ये जन्म झालेल्यांना जन्मानंतर सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व जन्मानंतर थेट देण्यात येत होते. १९८६मध्ये यामध्ये बदल झाला. तेव्हापासून अपत्याच्या पालकांपैकी कोणीही एक जण ऑस्ट्रेलियाचा नागरिक किंवा निवासी असणे आवश्यक आहे. तरच जन्मानंतर अपत्याला नागरिकत्व दिले जाते. ऑस्ट्रेलियामध्ये जन्म झालेल्या व्यक्तीला अन्यथा १० वर्षांनी ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व दिले जाते.

 

फ्रान्स :

france (1) inmarathi
flags on line

 

फ्रान्समध्येही नवीन अपत्यांना सुरुवातीला नागरिकत्व दिले जात होते. मात्र १९९३ मध्ये या कायद्यामध्ये बदल करण्यात आला. फ्रान्सचे मूळ नागरिक नसणाऱ्या व्यक्तींच्या अपत्यांना फ्रान्सच्या नागरिकत्वासाठी या कायद्यानुसार सज्ञान झाल्यानंतर १३-१९ या वयामध्ये फ्रान्सच्या नागरिकत्वासाठी अर्ज करावा लागतो. 

जर्मनी:

germany flag
world atlas

जर्मनीमध्ये मुलांच्या पालकांपैकी एक पालक जर्मन नागरिक असल्यास २००० पर्यंत त्या नवजात बालकाला नागरिकत्व दिले जात असे. मात्र सध्या दोन्ही पालकांपैकी एक पालक किमान तीन वर्षे जर्मन नागरिकत्व प्राप्त असेल किंवा सलग आठ वर्षे जर्मनीमध्ये वास्तव्याला असेल तरच त्या पालकांच्या अपत्याला नागरिकत्व दिले जाते. त्याचबरोबर वयाच्या २३ व्या वर्षी हे नागरिकत्व राखण्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागतो

यु.के अर्थात युनायटेड किंगडममध्येसुद्धा दोनपैकी एक पालक तेथील रहिवासी असणे बंधनकारक आहे तरच युनायटेड किंगडमचे नागरिकत्व अपत्याला देण्यात येते.

या देशात नागरिकत्व मिळवणे अतिकठीण:

 

व्हॅटिकन सिटी

 

va-flag inmarathi

 

केवळ ८०० रहिवासी आणि ४५० निवासी असणारा व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश मानला जातो. जर एखादी व्यक्ती रोम किंवा व्हॅटिकन सिटीमध्ये अनेक वर्षे रहात असेल तरच त्याला येथे नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो.

याशिवाय, व्हॅटिकन सिटीमध्ये चर्चमध्ये अधिकृत कामासाठी नियुक्ती झाली असेल तरच त्यांना नागरिकत्व प्राप्त होऊ शकते. नागरिकत्वासाठी सर्वात कठीण नियम येथे लागू आहेत. निर्वासितांसाठी या देशाची दारे बंद आहेत.

 

लिंचेस्टाइन

 

liechtenstein flag inmarathi'
Flags on line

 

या देशाची लोकसंख्या केवळ ४०,००० आहे. निर्वासित आणि आश्रितांसाठी कडक नियम आखून त्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली आहे. तुम्ही बाहेरच्या देशातून जर येथे येत असाल तर तुम्हाला किमान ३० वर्षे वास्तव्यानंतर येथे नागरिकत्व प्राप्त होते. २० वर्षांखालील मुलांसाठी हीच अट १५ वर्षांची आहे.

याशिवाय, जर तुम्ही येथील व्यक्तीशी विवाहबद्ध झालात तर लग्नानंतर पाच वर्षांनी तुम्हाला नागरिकत्व प्राप्त होते. याशिवाय तुम्हाला तुमच्या मूळ देशाचे नागरिकत्व त्याग करावे लागते.

भूतान

 

flag-dragon-image-Bhutan-design inmarathi
britannica

 

हिमालयीन देश अशी ओळख असलेल्या भूतानमध्ये १९७४ पर्यंत पर्यटनाला परवानगी नव्हती. येथे नागरिकत्वाचे नियम अत्यंत कडक आहेत. भूतानमध्ये १५ वर्षे वास्तव्य केल्यानंतर तुम्हाला येथे नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो. प्रशासनासाठी काम न करता खाजगी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हीच मुदत २० वर्षांची आहे. जर दोन्ही पालक भूतानचे रहिवासी असतील तर नवीन बालकाला भूतानचे नागरिकत्व प्राप्त होते.

याशिवाय, भूतानच्या प्रशासनाच्या आणि राज्यशासनाच्या विरोधात बोलण्यास येथे मज्जाव आहे. तसं केल्यास थेट नागरिकत्वावर गदा येऊ शकते. याशिवाय बाहेरच्या व्यक्तीला नियमांची पूर्तता केल्यावरही नागरिकत्व मंजूर न करण्याचा अधिकार तेथील प्रशासनाला आहे.

 

कुवैत

 

kuwait-flag inmarathi
edarabia

 

केवळ जन्माने किंवा धर्मबदलाने मुस्लिम असलेल्या व्यक्तींना कुवैतचे नागरिकत्व दिले जाते. जर तुम्ही धर्मांतर केले असेल तर कुवैतमध्ये नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पाच वर्षे अधिक प्रतिक्षा करावी लागते.

शिवाय, अरबी भाषेचे ज्ञानसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. कुवैतमध्ये नागरिकत्वासाठी २० वर्षे तेथे वास्तव्य करणे आवश्यक आहे. याशिवाय जर एखाद्या महिलेने कुवैती पुरुषाशी लग्न केले तर पंधरा वर्षे वास्तव्य केल्यावर नागरिकत्व प्राप्त होते.

 

चीन

 

china-flag-inmarathi

 

चीनमध्येही नागरिकत्वाच्या अटी अत्यंत कडक आहेत. जर तुम्हाला चीनचे नागरिकत्व हवे असेल तर तुमचे नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य चीनमध्ये वास्तव्याला असले पाहिजेत अशी अट आहे. तसं नसल्यास चीनमध्ये नागरिकत्व प्राप्त होण्याचा मार्ग कठीण आहे. प्रदीर्घ काळ चीनमध्ये वास्तव्य असण्याचीही अट आहे मात्र त्याची मर्यादा स्पष्ट करण्यात आलेली नाही.

स्विझरलँड

 

switzerland inmarathi
flags on line

 

येथे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी तुम्हाला दहा वर्षांचे वास्तव्य आवश्यक आहे. याचबरोबर सी परमिट तुमच्याकडे आवश्यक आहे. सी परमिटच्याद्वारे व्यवसायासाठी परवानगी प्राप्त होते. मात्र सी परमिट प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पाच ते दहा वर्षे व्यवसायात आणि त्या भागात सक्रिय असण्याची आवश्यकता असते.

 

निर्वासितांची समस्या गंभीर

 

homeless inmarathi
newsclick

 

दिवसेंदिवस निर्वासितांची समस्या गंभीर होताना दिसत आहे.नागरिकत्वाच्या अटी आणि नियमांमुळे निर्वासित आणि आश्रयदात्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते आहे.अमेरिकेतून अनेकांना नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून देशाबाहेर पाठवले जात आहे.

बार्बाडोस , वेस्ट इंडिज येथेही मोठ्या प्रमाणावर निर्वासितांची समस्या आहे. निर्वासितांना ज्या देशात ते आश्रयाला आहेत तेथे कोणतेही मूलभूत अधिकार प्राप्त होत नाहीत. त्याचबरोबर त्यांना मतदानाचाही अधिकार मिळत नाही.

कागदपत्रांची जुळवाजुळव करताना तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. यु.के, मालटा, भारत, न्यूझीलंड येथेही आश्रयदाते आणि निर्वासितांची संख्या मोठी असून देशाच्या विकासावर त्याचा परिणाम निश्चितच होतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?