' पृथ्वीवरील या अत्यंत सुंदर ठिकाणांवर मनुष्य फारसा गेला नाहीये हे खरं वाटणार नाही…! – InMarathi

पृथ्वीवरील या अत्यंत सुंदर ठिकाणांवर मनुष्य फारसा गेला नाहीये हे खरं वाटणार नाही…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भटकंती करावी, नवीन ठिकाणं एक्सप्लोर करावी अशी अनेकांची इच्छा असते. ग्रुप ट्रॅव्हलिंग, सोलो ट्रिप्स अशा माध्यमातून अनेक जण आपली ट्रॅव्हलिंगची हौस पूर्ण करत असतात.

सध्याच्या घडीला माहिती तंत्रज्ञानाचा वाढता पसारा आणि सोशल मीडिया आणि इंटरनेट यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन भ्रमंती करणे तुम्हाला सहज शक्य आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

असं असतानाही जगभरामध्ये अशी अनेक सुंदर ठिकाणं आजही अस्तित्वात आहेत जिथे आजपर्यंत कधीच माणूस पोहचू शकलेला नाही. अशाच काही ठिकाणांची सफर आज आपण करणार आहोत.

या ठिकाणांपर्यंत न पोचण्याची कारणं जरी वेगवेगळी असली तरीही सौंदर्याचे वरदान लाभलेली ही ठिकाणं दुर्दैवाने अजून प्रकाशझोतात आलेली नाहीत. पाहूया कोणती आहेत की ठिकाणं…

१. म्यानमार फॉरेस्ट

 

myanmaar forest inmarathi
mmtimes.com

 

वनसंपदा आणि प्राणिजीवांचे नंदनवन म्हणून म्यानमारच्या जंगलाकडे बघितले जाते. म्यानमार हे आशियातील एक छोटेसे राष्ट्र. समुद्रसपाटीपासून जवळपास १६,४०० फूट उंचीवर असणारे नॉर्दन फॉरेस्ट कॉम्प्लेक्स हे म्यानमार मधील एक आश्चर्यच.

हरिण, लाल पांडा, सांबर यांसारखे वेगवेगळे प्राणी तसेच वेगवेगळी वनसंपदा येथे अस्तित्वात आहे . काही वैज्ञानिक संशोधक वगळता आजपर्यंत येथे कोणीही जाऊ शकलेले नाही.

 

२. पॅटागोनिया

 

patagonia inmarathi
viator

 

निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेला भूभाग हीच पॅटागोनियाची ओळख सांगता येईल. बर्फ़ाच्छादित शिखरे , घनदाट जंगल आणि अर्जेंटिना ते चिलीपर्यंत पसरलेल्या अप्रतिम अशा लक्षवेधी डोंगररांगा हे येथील खरे वैशिष्टय.

धोकादायक रस्ते आणि येथील भौगोलिक परिस्थिती यामुळे या भागाकडे कोणीही फिरकण्याचा धोका पत्करत नाही. अनेक प्रचलित अप्रचलित वन्यप्राणी, वनस्पती, सजीव येथे वास्तव्याला आहेत.

३. नामिब वाळवंट

 

namib desert inmarathi
African budget safaris

 

जगातील सर्वात पुरातन वाळवंट अशी नामिब वाळवंटाची ओळख सांगितली जाते. जवळपास ८० मिलियन वर्षांपासून याचे अस्तित्व असल्याचे दाखले उपलब्ध आहेत. दक्षिण नामिबियामध्ये असणारे हे वाळवंट मानवी हस्तक्षेपापासून दूर आहे.

साऊथ आफ्रिका ते अंगोला या जवळपास ८०,००० चौ. किमी क्षेत्रामध्ये हे वाळवंट विस्तारलेले आहे.

 

४. मरिना खंदक

 

साऊथवेस्ट पॅसिफिकमधील मरिना खंदक थक्क करणाऱ्या जलसृष्टीचे केंद्र मानले जाते. मात्र येथील पाण्याची पातळी आणि इतर कारणांमुळे येथे लोकांना पोचणे अशक्य आहे. समुद्रामध्ये जवळपास ६ मैल खोल गेल्यानंतर त्यापलीकडे हे खंदक आहे. मात्र, येथे आजपर्यंत कोणाला पोचता आलेले नाही.

 

५. दिनीत्री नॅशनल पार्क

 

national park inmarathi
abc.net. au

 

ऑस्ट्रेलियातील नॉर्दन क्विन्सलँड भागामध्ये हे नॅशनल पार्क आहे. १२०० चौ किमी परिसरात याचा विस्तार आहे. अनेक अप्रचिलीत वन्य प्रजाती येथे उपलब्ध आहेत. हे राष्ट्रीय उद्यान ११० मिलियन वर्षे जुने असल्याचे दाखले उपलब्ध आहेत.

 

६. स्टार माऊंटन रेंज

 

mountains inmarathi
wanderlust travel magzine

 

पापुआ न्यु गिनीआमधील या पर्वतरांगांमध्ये जवळपास १०० वन्य प्रजाती आहेत ज्या जगात कुठेच बघायला मिळत नाहीत. मात्र, अतिप्रचंड पावसाने येथे पोचणे आणि राहणे कोणालाही अवघड आहे. दरवर्षी १०००० मिमी पाऊस येथे पडतो. त्यामुळे येथील हवासुद्धा अत्यंत दमट असते.

 

७. ग्रीनलँड

 

greenland inmarathi
visit greenland

 

ग्रीनलँडमध्ये लोकांचा वावर आहे , येथे लोक निवास करतात मात्र तरीही एकंदर प्रदेशाच्या मानाने ग्रीनलँडमध्ये अशा अनेक जागा आहेत ज्या अजूनही अप्रचलित आहेत.येथील लोकसंख्येची घनता केवळ ०.०३ प्रति चौ किमी इतकी असून केवळ ६०,००० लोक या भागात राहतात.

ग्रीनलँडचा तीन चतुर्थांश भाग हा नेहमी बर्फाच्छादित असल्याने त्याभागाकडे कोणीही फिरकतसुद्धा नाही.

 

८. अंटार्टीक तलाव

1260-Antarctic-lake inmarathi

 

अंटार्टीका भौगोलिकदृष्ट्या समृद्ध प्रदेश आहे. मात्र तरीही येथील हवामान आणि अडचणींमुळे संशोधक वगळता येथे पर्यटक फिरकताना दिसत नाहीत. येथील तलावांमध्ये वेगळेपण आढळते. जमिनीच्या ३ किमी आतमध्ये असणाऱ्या लेक वोस्टोक येथे सूर्यप्रकाशसुद्धा पोचत नाही.

मात्र, येथे जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे संशोधनात समोर आले आहे. असं असूनही येथे सामान्य पर्यटक पोहोचलेले नाहीत.

 

९. माउंट नमोली

 

namoli mountain inmarathi

 

झांबेझिया येथील माउंट नमोली पर्वत निसर्गरम्य ठिकाण म्हणून गणले जाते. समुद्रसपाटीपासून ८००० फुटांवर असलेल्या या पर्वत प्रदेशावर अनेकांनी मोहिमा करण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, काही अपवाद वगळता आजही हा प्रदेश मानवाच्या संपर्काच्या दूर आहे. अवघड वाट आणि तापमान यामुळे येथे पोचणे कठीण आहे.

१०. सॅंडी आयलँड

 

sandy island inmarathi

 

साऊथ पॅसिफिकमधील या बेटाचा शोध १७७४ मध्ये कॅप्टन कुकने लावला होता. त्यानंतर मॅप्सवर १९ व्या शतकात या बेटाचा समावेश करण्यात आला. मात्र, आजही कोणीही या बेटापर्यंत पोहोचू शकलेले नाही. या बेटाच्या अस्तित्वावर प्रश्नसुद्धा उपस्थित करण्यात आलेले आहेत. २०१२ मध्ये गुगल मॅप्सवरूनसुद्धा हे ठिकाण हटविण्यात आलं.

 

११. माउंट रोराइमा पर्वत

 

mount roraima inmarathi

 

ब्राझील, गयाना आणि व्हेनिन्जुएला या तीन देशांच्या सीमांना जोडणारा माउंट रोराइमा पर्वत. येथे पोचण्यासाठी या तिन्ही देशांकडून परवाने आणि तांत्रिक परवानग्या घ्याव्या लागतात.

शिवाय, तीव्र उतार आणि अवघड वाट यामुळे या ठिकाणी जाण्याची वाट अधिकच बिकट आहे. त्यामुळे पर्यटनाच्या कक्षेत हा पर्वत येत नाही. येथे विपुल जैवविविधता आढळून येत असल्याच्या नोंदी आहेत.

 

१२. रब अल खली

 

rab al khali inmarathi

 

समुद्रातील वाळूने वेढलेले सर्वात मोठे आखात अशी रब अल खलीची ओळख सांगितली जाते. सौदी अरेबिया , ओमान , येमेन , संयुक्त अरब अमिराती या भागातुन हे आखात जाते.हा संपूर्ण भूभाग वेगवेगळ्या पक्षांसाठी ओळखला जातो. त्यामुळे अनेकांनी येथे भेट देण्याचा असफल प्रयत्न केला आहे. अद्याप तरी हे कोणाला शक्य झालेले नाही.

 

१३. अटलांटिक समुद्रतळ

 

01_atlanticocean_inmarathi

 

वैज्ञानिकांना अटलांटिक समुद्र तळापेक्षा चंद्र , मंगळावरील पृष्ठभागाची माहिती आजच्या घडीला जास्त उपलब्ध आहे. जैवविविधता असलेले अटलांटिक तळ मात्र आजही संशोधनापासून दूर आहेत. या समुद्र तटावर पोचणे पाणबुड्यांना अवघड आहे त्यामुळे येथे पोचताना अडचणी येत आहेत.

 

१४. सखा रिपब्लिक

 

sakha republic inmarathi

 

उत्तर सैबेरियातील या भूभागाचे तापमान -४३ अंशापर्यंत खाली जाते. अशा अवस्थेमध्ये या भागामध्ये वास्तव्य करणे अनेकांना अवघड होते.मात्र येथील जैवविविधता आणि सृष्टीसौंदर्य अनेकांचे लक्ष वेधून घेतात. मात्र तापमानामध्ये वास्तव्य करणे कठीण असल्याने सहसा येथे कोणी जात नाही.

 

१५. मॅक्सिकन गुहा

 

mexican cave

 

मेक्सिकोमध्ये भूगर्भामध्ये तसेच जलस्रोतांच्या खाली गुहांचा शोध लागला आहे. मात्र या गुहांमध्ये जाण्याचे धाडस पर्यटन करत नाहीत. अद्भुत जलचर प्राणी येथे बघायला मिळण्याचे अंदाज वर्तवले जातात मात्र तरीही त्यांची खोली बघता तेथे जाण्यामध्ये धोका आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?