' हिवाळ्यात ही फळं खाल्ली तर वर्षभर सशक्त, तंदुरुस्त रहाल…! – InMarathi

हिवाळ्यात ही फळं खाल्ली तर वर्षभर सशक्त, तंदुरुस्त रहाल…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सगळ्यांनाच आवडणारा, हवाहवासा असणारा थंडीचा मौसम सुरू झाला आहे. उन्हाची काहिली दूर होऊ हळूहळू गुलाबी थंडी पडायला सुरुवात होत आहे. या थंडीच्या मौसमात थंडीसोबत सर्दी, खोकला आणि अन्य आजारांनासुद्धा निमंत्रण मिळतं.

त्यामुळे थंडीमध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणंसुद्धा तितकंच आवश्यक असतं. थंडीमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळी फळे उपलब्ध होतात. या सर्व फळांचे फायदे अनेक आहेत. उत्तम आरोग्यासाठी आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फळांचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे थंडीच्या दिवसात उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश करणे आवश्यक आहे.

 

fruits-inmarathi

 

प्रत्येक फळाचे स्वतंत्र गुणधर्म आहेत, त्यातील घटकांमुळे आपल्या आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. रोजच्या आहारात फळांचा समावेश असलाच पाहिजे असा सल्लाही सर्वांना दिला जातो. या सर्व गोष्टी फळांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करतात.

जाणून घेऊया, थंडीच्या दिवसात कोणत्या फळांचा समावेश तुमच्या आहारात असला पाहिजे आणि त्यांचे फायदे…

 

१. संत्री

 

 

वर्षभरामध्ये दोनवेळाच बाजारामध्ये संत्री उपलब्ध असतात. त्यापैकी डिसेंबरच्या मौसमात मार्केटमधील येणारी संत्री ही चवीला गोड असतात. त्यामध्ये उपयुक्त फायबर्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. याशिवाय या संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये असतं. 

त्याचा शरीराला निश्चितच फायदा होतो. त्यामुळे नियमितपणे संत्री खाल्ली पाहिजेत असा सल्ला दिला जातो.

 

२. स्ट्रॉबेरी

 

strawberry inmarathi
real food for life

 

हिवाळ्यात , थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये दिसणारे आणखी एक लोकप्रिय फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीचे उत्पादन होते. वेगळ्या चवीचे आणि सर्वांना आवडणारे फळ असल्याने मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीला मागणी असते.

नितळ आणि तजेलदार चेहऱ्यासाठी आणि त्वचेसाठी स्ट्रॉबेरी उपयुक्त ठरते. याचबरोबर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीसुद्धा स्ट्रॉबेरी उपयुक्त असते

 

३. सीताफळ

 

Custard-apple inmarathi

 

अनेकांना सीताफळ हे त्यातील असलेल्या बियांमुळे आवडत नाही. मात्र याचे फायदे तुम्ही लक्षात घेतल्यास नियमितपणे तुम्ही हे फळ नक्की खाल. वजन वाढविण्यासाठी सीताफळ उपयुक्त असते. त्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे आणि जीवनसत्वांमुळे वजन वाढविण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते.

याचबरोबर व्हिटॅमिन बी ६ चा साठा मोठ्या प्रमाणावर यामध्ये असतो. यामुळे लहान मुलांसाठी खासकरून सीताफळ उपयोगी ठरते.

 

४. ऊस

 

sugarcane inmarathi

 

ऊस हा पित्तशामक असतो त्यामुळे थंडीच्या दिवसात त्याचा फायदा होतो. शरीराचे तापमान नियंत्रित करायला उसाचा रस फायदेशीर ठरतो.ऊस लघवीचे प्रमाण वाढवणारा असतो त्यामुळे मूतखडा वगैरे लघवीच्या संदर्भातले सगळे विकार ऊस दूर करतो. याशिवाय शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठीसुद्धा उसाची मदत होते त्यामुळे सर्वार्थाने ऊस गुणकारी आहे.

 

५. आवळा

 

amla inmarathi

 

थंडीच्या दिवसात बाजारात आवळा उपलब्ध होतो. आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास आवळा उपयोगी ठरतो. आवळ्याने आम्लपित्त आणि अ‍ॅसिडिटी कमी होण्यास मदत होते.

केसांसाठी, डोळ्यांसाठी, त्वचेसाठीही आवळा फायद्याचा असतो. थंडीच्या दिवसात त्यामुळे नियमितपणे आवळ्याचे सेवन केले पाहिजे.

 

६. चिंच

 

tamarind inmarathi

 

आवळ्याप्रमाणेच थंडीत गाडीवर रस्त्यांवर हमखास उपलब्ध होणारा पदार्थ म्हणजे चिंच. पचन करणं, रुची वाढवणं हाही चिंचेचा औषधी गुणधर्म. पचनासाठी थंडीच्या दिवसात चिंचेचे सेवन केले जाते.

याशिवाय रोगप्रतिकारासाठीही चिंच गुणकारी ठरते. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये खास चवीसाठी चिंचेचा वापर केला जातो.

 

७. अंजीर

 

anjeer inmarathi

 

थंडीच्या दिवसात हमखास सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे फळ म्हणजे अंजीर. ज्यांना संत्रे किंवा अननस आवडत नसेल अशा व्यक्तींसाठी व्हिटॅमिन सी देणारा एक पर्याय म्हणून अंजीरकडे बघितले जातेच. शिवाय मधाळ आणि वेगळी चव यामुळे अंजीर उपलब्ध होण्याकडे अनेकांचे डोळे लागलेले असतात. एलर्जी आणि इतर आजरांना दूर पळवण्यासाठी अंजीर गुणकारी उपाय ठरतो.

 

८. चिकू

 

chiku inmarathi

 

डोळे उत्तम राहण्यासाठी व्हिटॅमिन ए अन्नातून मिळण्याची आवश्यकता असते. चिकूमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए उपलब्ध असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी चिकू उपयोगी ठरतो.

अनेकदा भूक लागलेली असतानासुद्धा चिकू हे फळ उत्तम पर्याय आहे. शिवाय ते पचायलासुद्धा सोपे असते . त्यामुळे थंडीच्या दिवसात चिकू हा एक उत्तम पर्याय ठरतो.

 

९. मोसंबी

mosambi inmarathi

 

थंडीच्या दिवसात बाजारात प्रामुख्याने मोसंबी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. “व्हिटॅमिन सी”चा स्रोत मोसंबी मानले जाते. फायबर्सनी युक्त असलेले हे फळ पचायलासुद्धा सोपे असते.

त्याचबरोबर संत्र्यापेक्षाही चवीलाही गोड असते. या चवीसाठी आणि मिळणाऱ्या फायद्यांसाठी नक्कीच थंडीच्या दिवसात मोसंबीची चव चाखायलाच हवी.

 

१०. पपई

 

papaya-benefits-inmarathi
healthline

 

थंडीच्या दिवसात थंड तापमानाशी जुळवून घेणे आवश्यक असते अशावेळी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. पपई काहीशी उष्ण असल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम करते. त्यामुळे बाहेरच्या तापमानाशी जुळवून घेताना पपई फायदेशीर ठरते.

याशिवाय तजेलदार त्वचेसाठीसुद्धा पपई फायदेशीर आहे. महिलांना मासिक पाळीमध्ये होणारा त्रास काहीसा कमी होण्यासाठी पपई मदतशीर आहे.पपईमध्ये जीवनसत्त्व , प्रथिने आणि इतर घटक मोठ्या प्रमाणावर आढळतात त्यामुळे थंडीमध्ये मोलाची मदत होऊ शकते.

याशिवाय केळी, सफरचंद, पेरू, ड्रायफ्रूटस, अक्रोड, काजू , बदाम यांचे सेवनसुद्धा थंडीच्या दिवसात तब्येतीची काळजी घेण्यास उपयुक्त आहे. थंडीच्या दिवसात नियमितपणे ही फळे खाल्ल्याने आरोग्याला नक्कीच फायदा होतो शिवाय वेगवेगळ्या आजरांपासून आपलं रक्षण होतं.

 

fruits-inmarathi

 

फळं खाताना शक्यतो कच्ची आणि अखंड खावी. या फळांच्या सालींमध्येसुद्धा उपयुक्त गुणधर्म असतात. त्यामुळे शक्यतो अखंड फळ खावी. काही वेळा या फळांचा ज्यूस करून, चिरून किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीने फळे खाण्यास हरकत नाही. मात्र फळांवर साखर घालून फळे खाऊ नयेत.

तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या फळांचे सेवन करून थंडीवर मात तुम्ही करू शकता आणि उत्तम आरोग्यासाठी प्रयत्न करू शकता…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?