' हिवाळ्यात व्यायाम करताना या १५ गोष्टींची खास काळजी घेणं आवश्यक असतं, अन्यथा…! – InMarathi

हिवाळ्यात व्यायाम करताना या १५ गोष्टींची खास काळजी घेणं आवश्यक असतं, अन्यथा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

गुलाबी थंडीचे दिवस हे शारीरिक आरोग्यासाठी देखील खूपच पोषक असतात. थंडीच्या दिवसात व्यायाम केलाच पाहिजे पण हा व्यायाम करताना थोडी काळजी घेणं देखील आवश्यक आहे.

एक तर गुलाबी थंडीत घरातून बाहेर पडावसं वाटत नाही आणि दुसरं म्हणजे व्यायाम करण्यासाठी म्हणून बाहेर पडलोच तर दाट धुक किंवा धूसर प्रकाश यांची सोबत असतेच. त्यामुळे बऱ्याचदा व्यायाम करण्याचा उत्साह मावळतो किंवा अंधुक प्रकाशामुळे काही दुखापत होण्याची देखील शक्यता असते.

अशावेळी हिवाळ्यातील हा व्यायाम सुरक्षित व्हावा म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत या काही खास टिप्स तुमच्यासाठी..! ज्यांचा तुम्हाला व्यायाम करताना फायदा होईलच पण, व्यायामाचा संकल्प पूर्ण केल्याने तुमच्या शरिरीक आणि मानसिक आरोग्यात चांगली भर पडेल.

जाणून घेऊया व्यायामाबद्दलच्या या १५  गोष्टी ज्यामुळे हिवाळ्यातील तुमचा व्यायाम ही एक आनंददायी बाब बनेल.

घराबाहेर जाऊन मोकळ्या मैदानात, मोकळ्या आणि शुद्ध हवेत जाऊन व्यायाम केल्याने तुमच्या आरोग्याला अधिक फायदा होऊ शकतो. ऋतू कोणताही असला तरी आपल्या व्यायामाच्या दिनचर्येत बाधा येणार नाही यासाठी आपण थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे.

 

Winter workout InMarathi

 

१. व्यायामासाठी प्रेरणा शोधा 

 

Motivation InMarathi

 

एखादी गोष्ट आपण सातत्याने तेव्हाच करतो जेव्हा ती गोष्ट करण्यामागे काहीतरी ठोस कारण असेल. एखादी गोष्ट केल्याने आपल्याला काय फायदा होतो यावरूनच  आपल्या मनात त्या गोष्टीबद्दल आवड निर्माण होते.

तसेच व्यायामाचेही आहे, व्यायाम केल्याने आपल्याला नेमके काय फायदे होणार आहेत, त्याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे, हे शोधा.

हिवाळ्याच्या दिवासात शरीराची हालचाल अपोआपच मंदावते आणि भूक जास्त लागते. त्यामुळे शरीरातील चरबी यादिवासात वाढण्याची शक्यता असते. पण, या दिवसात जर सकाळी ठराविक वेळ व्यायामाला दिला तर, ही चरबी कमी होऊ शकते आणि परिणामी तुमचे वाढते वजन आटोक्यात येऊ शकते.

दुसरे कारण म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात शरीर फारच सुस्त होते, त्यामुळे आळस वाढतो शरीर सुस्त राहिल्यास कुठलीच कामे वेळेवर होत नाहीत.

यावर इलाज म्हणूनही हिवाळ्यात व्यायाम करायलाच हवा कारण व्यायामाने शरीरातील उर्जा सक्रीय होते आणि त्यामुळे हालचाल मंदावणे किंवा सुस्तपणा येणे, अशा गोष्टी टाळता येतात.

दिवसा जर तुम्ही व्यायाम करणार असाल तर, यामुळे तुमच्या शरीरातील “ड जीवनसत्वाचे” प्रमाण वाढेल, जे तुमच्या हाडासाठी अत्यंत आवश्यक असतं.

 

२. चांगली पूर्व तयारी करणे

 

workout inmarathi
tripadavisor.com

 

प्रत्यक्ष व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही कुठल्या वेळेत कुठला व्यायाम करणार आहात आणि कोणत्या व्यायामासाठी किती वेळ देणार आहात, व्यायाम कसा करणार आहात याबद्दल एक नोट लिहून काढा.

व्यायामासाठी लागणारे कपडे, शूज इतर साहित्य जे असेल तर आदल्या दिवशीच एका ठिकाणी एकत्र ठेवा, म्हणजे दुसऱ्या दिवशी शोधाशोध करावी लागणार नाही.

व्यायाम करताना कोणता पोशाख असणार आहे, त्यानंतर ब्रेकफास्ट मध्ये काय खाणार आहात याचे सगळे नियोजन आधी लिहून काढा.

 

 

३. व्यायामासाठी लागणारा पोशाख कसा निवडाल 

थंडीच्या दिवसात पुरेसे उबदार आणि तरीही घाम शोषून घेतील असे कपडे वापरा. आतून हलके सुती कपडे घाला हे घाम शोषून घेतील. त्यावर वजनाला हलके असणारे  घाला. खूप घट्ट किंवा अगदी सैल कपडे नको. त्वचेचा श्वासोच्छवास चालू राहिला पाहिजे.

 

workout wear InMarathi

 

४. सुरक्षित राहा 

 

Morning-Walk-inmarathi
patrika

 

हिवाळ्याच्या दिवसात पहाटेच्या वेळेला आपण जेव्हा व्यायामासाठी घरातून बाहेर पडतो तेव्हा पुरेसा सूर्यप्रकाश नसतो किंवा धुक्यामुळे फारसे स्पष्ट दिसत नाही. अशावेळी हलक्या रंगाचे कपडे वापरा जेणेकरून दुरूनही रंग ओळखता येतील. त्यावर जास्त उठून दिसणाऱ्या पट्ट्यांची डिझाईन असल्यास उत्तम.

कपड्यांचा रंग जर डार्क असेल तर, हेड-टॉर्च वापरणे फायद्याचे ठरेल. शक्यतो व्यायामासाठी ओळखीचा परिसर किंवा रस्ता पहा, जिथे आजूबाजूचे रस्ते माहित असतील.

सकाळच्या वेळेत फारच धुकं असेल तर थोडा वेळ ते धुकं कमी होण्याची वाट बघा, धुक्यातून येणाऱ्या वाहनांना देखील समोरचे फारसे स्पष्ट दिसत नाही, अशावेळी अपघात होण्याची शक्यता असते.

म्हणून थोडा उशीर झाला तरी चालेल पण, धुके विरळ होण्याची वाट पहा. वर्कआऊट करताना म्युझिक ऐकण्याची सवय असेल तर, एकाच कानात इअर-बड घाला कारण आजूबाजूला नेमके काय सुरु आहे ते तुम्हाला समजणे आवश्यक आहे.

 

५. सोबत असल्यास उत्तम

 

winter exercise inmarathi 1
openfit

 

हिवाळ्यात खरे तर, सकाळी लवकर उठून आवरणे आणि घराच्या बाहेर पडणे जीवावर येते. अशावेळी आळस व्यायामाच्या इच्छेवर मात करू शकतो. म्हणून तुमच्यासोबत एखादा ट्रेनी असेल तर, त्याचा फायदा होईल.

त्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी म्हणून तुम्ही दररोज लवकर उठून व्यायाम कराल आणि ट्रेनीकडून मिळालेल्या टिप्स देखील तुम्हाला बिनचूक व्यायाम करण्यास उपयोगी ठरतील. यामुळे व्यायाम करण्याचा उत्साह देखील टिकून राहील.

 

६. हातापायाच्या बोटांची काळजी

 

Winter Gloves inmarathi
switchback travel

 

थंडीच्या दिवसात शरीरातील रक्त जास्तीत जास्त मध्यभागात केंद्रित झालेले असते ज्यामुळे हाता-पायांच्या तळव्यांना कमी रक्त पुरवठा होतो. अशावेळी हाताची बोटे, नाक, कान, असे बाहेरचे अवयव गारठू शकतात. म्हणून हातमोजे आणि सॉक्स आवर्जून वापराच.

कान झाकतील अशी टोपी, मफलर किंवा स्कार्फ वापरू शकता. हातमोजे, सॉक्स हे शक्यतो सिंथेटिक असले पाहिजेत म्हणजे घाम शोषला जाईल.

७. जास्त घाम आल्यास वरचा थर कमी करा 

वर्कआऊट किंवा वार्मअप केल्याने शरीराचे तापमान वाढते. अशावेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी चढवलेले वरचे थर म्हणजे जॅकेट, मफलर, हातमोजे, सॉक्स काढून थोडा वेळ रीलॅक्स होऊ शकता. यामुळे त्वचेलाही हवा मिळेल आणि घाम सुकून जाईल. vorm

 

८. त्वचेची काळजी घ्या

 

Skin care InMarathi

 

 

हिवाळ्यात फक्त थंडीच असते असे नाही तर, शुष्कता देखील जास्त असते. अशा दिवसात त्वचा कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी भरपूर पाणी प्या.

त्वचेला मॉइश्चरायजर किंवा लोशन लावा. नाकपुड्या आणि कानाला लोशन लावल्यास त्वचा कोरडी पडणार नाही. थंड हवेपासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर स्कार्फ किंवा मास्क वापरा.

 

९. वार्मअप कराच

 

workout InMarathi

 

हिवाळा असो किंवा पावसाळा, व्यायाम करण्यापूर्वी वार्मअप केलाच पाहिजे. वार्मअपमुळे स्नायुंतील रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे लचक भरणे किंवा स्नायूंवर ताण येण्यासारखे प्रकार होत नाहीत.

वार्मअप मध्ये हालचाली कमी असल्या तरी ज्याप्रकारचा व्यायाम करणार आहात त्याचीच ती छोट्या प्रमाणातील झेरॉक्स कॉपी असते हे लक्षात ठेवा.

 

१०. योग्य पद्धतीने श्वासोश्वास करा

 

breathing-marathipizza
vereencenter.com

 

थंडीच्या दिवसात थंड आणि कोरड्या हवेमुळे श्वासोश्वास करताना त्रास होतो. त्यामुळे जेव्हा व्यायाम केल्यानंतर हृदयाची धडधड जस्त वाढेल तेव्हा श्वासोश्वास नीट करण्याकडे लक्ष द्या.

व्यायाम करताना नाकाने श्वासोश्वास करा पण, जास्त दम भरतो तेव्हा हे शक्य नसते म्हणून तोंडाला हलका स्कार्फ गुंडाळा ज्यामुळे उच्छवास सोडताना हवेतील आर्द्रता आतच राहील, त्यामुळे श्वासोश्वास करताना कोरडेपणा जाणवणार नाही.

 

११. भरपूर पाणी प्या

 

water InMarathi

 

ऋतू कोणताही असला तरी शरीराला पाण्याची आवश्यकता असतेच. थंडीच्या दिवसात फारशी तहान जाणवत नाही किंवा थंडीमुळे काहीजण पाणी पिण्याचे टाळतात.

वर्कआऊट केल्यावरही शरीरला पाण्याची गरज भासतेच, म्हणून इतर ऋतू प्रमाणेच या दिवासात ही व्यायाम केल्यानंतर पाणी जरूर प्या.

 

१२. योग्य दिशा निवडा 

 

 

जितक्या वेगाने धावाल तितक्याच वेगाने तुम्हाला हवेचा मारा झेलावा लागेल, ज्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान कमी होऊ शकते. हवेचा हा परिणाम टाळण्यासाठी जर तुम्ही धावत असाल, सायकलिंग करत असाल तर वारा तुमच्या पाठीमागून येईल अशी दिशा निवडा.

 

१३. कुल डाऊन

 

winter-Vapor-inmarathi
twoeggz.com

 

थंडीच्या दिवसात व्यायाम थांबवल्यानंतर तुम्हाला जास्त थंडी जाणवू लागेल पण, म्हणून तुम्ही शांत व्हायचेच नाही असे नाही, तर थोडा वेळ शांत राहणे आवश्यक आहेच. व्यायामामुळे शरीरात उत्पन्न झालेली उर्जा बाहेर जाण्यास मदत होते आणि आपल्या स्नायूंमधील वेदना देखील कमी होतात. म्हणून थोडा वेळ शांत बसून राहा.

 

१४. हिवाळ्याचे स्वागत करा

 

winter-inmarathi
colors.couponrani.com

 

संपूर्ण वर्षातील हा असा ऋतू आहे ज्यामुळे आपण आपल्या शरीरातील उर्जा आणि ताकद पुन्हा कमवू शकतो. या दिवासात व्यायामाकडे एक सोपस्कार म्हणून न स्वतःसाठी स्वतःचा दिलेला अनमोल वेळ आणि स्वतःवर प्रेम करण्यासाठी दिलेली संधी या दृष्टीने पहा.

व्यायाम म्हणून कधी एखादा आठवडा गावाच्या किंवा शहराच्या बाहेर जाऊन दोन तीन तास चाललात तरी त्याचा फायदा होईल.

 

१५. ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करा

 

goals inmarathi
Inc.com

 

बक्षीस द्यावे की नको यावरून अनेक मतभेद उद्भवतात. पण व्यायामाचा संकल्प पूर्ण केल्याबद्दल स्वतःला बक्षीस नक्कीच देऊ शकता. हे बक्षीस खाण्याच्या स्वरुपात असू नये ज्यामुळे तुमच्यातील कॅलरीज पुन्हा वाढतील. तर, गोडधोड पदार्थाऐवजी बक्षीस म्हणून या काही गोष्टींचा प्रयोग करायला हरकत नाही.

हिवाळ्याच्या शेवटी स्वतःसाठी मसाज बुक करू शकता.

व्यायाम केल्यानंतर रीलॅक्स होण्यासाठी म्हणून तुम्हाला आवडणारी गोष्ट करू शकता, जसे की पुस्तक वाचणे, टीव्ही पाहणे किंवा आवडती रेसिपी करणे.

आठवड्यातून एखादा दिवस रेस्ट डे पाळू शकता. यादिवशी व्यायामाऐवजी थंडीत फेरफटका मारून थंडीचा आनंद लुटू शकता.

त्यामुळे आता गुलाबी थंडीचा आस्वाद घेताना व्यायाम सुद्धा करा आणि वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?