' लिंबू-मिरची, आडवी गेलेली मांजर; आपल्या देशातल्या या ११ “अंधश्रद्धा”… – InMarathi

लिंबू-मिरची, आडवी गेलेली मांजर; आपल्या देशातल्या या ११ “अंधश्रद्धा”…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तश्या तर जगात सगळीकडेच लोक अनेक श्रद्धा पाळतात आणि त्यांच्या संस्कृतीत अनेक अंधश्रद्धा आहेत. उदाहरणार्थ फ्रायडे द थर्टीन्थ, तेरा हा आकडा अशुभ, इमारतीला तेरावा मजलाच नसणे, ६६६ हा सैतानाचा आकडा, १११ म्हणजे नेल्सन आकडा वगैरे वगैरे!

आपल्या देशात सुद्धा अश्या अनेक अंधश्रद्धा आहेत ज्या आपण नकळत पाळतो. आता एकविसाव्या शतकात सुद्धा बरेच श्रद्धाळू लोक ह्यातील अनेक श्रद्धा अगदी इमानेइतबारे पाळतात.

अनेक अंधश्रद्धाळू लोक तर तंत्रज्ञानाचा उपयोग सुद्धा अंधश्रद्धा पसरवण्यासाठी करतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

दसऱ्याच्या दिवशी राफेलची पूजा करताना राजनाथ सिंह ह्यांनी नारळ फोडला, विमानावर “ओम” काढले आणि विमानाच्या चाकांखाली लिंबं ठेवली. खरं तर नव्वद टक्के भारतीय त्यांच्या नव्या गाडीचे स्वागत असेच करतात.

तरीही राजनाथ सिंह ह्यांच्या ह्या “श्रद्धेवर” अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आपण भारतीय लोक आजही ह्या अकरा गोष्टींवर भरवसा ठेवतो. किंबहुना ह्या गोष्टी इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की त्या आपण नकळत पाळतो.

१. शनिवारी केस आणि नखं कापू नयेत

आता हा नियम मुळात कुणी बनवला आणि का बनवला हे कुणालाच सांगता येणार नाही. पण आजही अनेक भारतीय लोक शक्यतो शनिवारी केस आणि नखं कापायचे टाळतात. कारण ह्यामुळे शनिदेव कोपतात असे आपल्याला लहानपणीपासून सांगितलेले असते.

शनिवारी केस कापले तर त्यामुळे आपल्या बरोबर काहीतरी वाईट घडते अशी अंधश्रद्धा आहे. पाळणारे लोक अजूनही हे पाळतात आणि न पाळणारे बिनधास्त शनिवारी कटिंग करून येतात आणि केवळ त्यामुळे त्यांचे काही नुकसान झालेले तरी कुणी बघितले नाही.

 

Haircutting Salon InMarathi
Storytrender

२. काळे मांजर आडवे गेल्यास आपले काम होत नाही

ही अंधश्रद्धा तर जवळ जवळ सगळे लोक पाळतात. आपण रस्त्याने जात असताना आपल्याला काळे मांजर आडवे गेले तर आपले काम हमखास फसणार अशी अंधश्रद्धा बऱ्याच लोकांच्या मनात असते.

बिचारे काळे मांजर, त्याला ठाऊक देखील नसते की समोरचा माणूस कुठे आणि कुठल्या कामानिमित्त चाललाय आणि चुकून एखाद्याचे काम झाले नाही तर सगळा दोष त्या बिचाऱ्या मांजरावर येतो. काळे मांजर अपशकुनी असते असा उगाच त्या मुक्या प्राण्यावर ठपका ठेवला गेलाय.

 

black-bad-cat InMarathi
Science ABC

३. इमारतीत तेरावा मजला नसणे

ह्याला खरं तर काहीच लॉजिक नाही. पण ख्रिश्चन लोक तेरा ह्या आकड्याला अशुभ मानतात. ह्या गोष्टीचा त्यांनी इतका धसका घेतलाय की अनेक इमारतीत बाराव्या मजल्यानंतर थेट चौदावा मजला असतो. तेरा हा आकडा चक्क गाळलेला असतो.

 

np-13th-floor Inmarathi
InMarathi.com

४. आठ आकडा म्हणजे संकट

न्यूमरॉलॉजीच्या मते आठ हा शनीचा आकडा आहे. त्यामुळे जर तुमचा न्यूमरॉलॉजी नंबर आठ असेल तर तुमच्या आयुष्यात अनेक अडथळे आणि संकटे येतील असे न्यूमरॉलॉजी सांगते. खरं तर शनीला आपल्या आयुष्यात अडथळे आणणे हे एकच काम आहे का? नाही. पण अंधश्रद्धेवर काही इलाज आहे का?

 

Saturn-in-8th-house InMarathi
The Horoscope (i.TheHoroscope.co)

५. अंत्यसंस्कारानंतर शरीरशुद्धी करणे

आपल्या पूर्वजांनी हा नियम घालून दिला आहे की जर तुम्ही कुणाच्याही अंत्यसंस्कारांना गेलात तर घरात येताना हात पाय धुवूनच यायचे आणि लगेच अंघोळीला जायचे.

अंघोळ केल्याशिवाय कुणालाही शिवायचे नाही. हा नियम आपल्याच आरोग्यासाठी बनवण्यात आला आहे. कारण मृत शरीरावर अनेक जंतू असतात.

त्या शरीराच्या सानिध्यात आपण असताना आपल्याही शरीरावर हे जंतू येतात आणि आपल्याबरोबर ते आपल्या घरात देखील येतात. म्हणूनच लगेच अंघोळीला जायचे आणि ते कपडे वेगळे व स्वच्छ धुवायचे. हा नियम आजही जवळजवळ सगळीकडेच पाळला जातो.

 

antim-sanskar Inmarathi
Jagruk

६. सूर्यास्तानंतर नखे कापू नये

हा नियम सुद्धा आजही घराघरांत पाळला जातो. ह्यामागचे कारण असे की पूर्वी आजच्यासारखी विजेच्या दिव्यांची सोय नव्हती आणि सूर्यास्तानंतर कमी प्रकाशात काम करावे लागे.

अश्या वेळेला कमी उजेडात नखं कापायला गेलो तर हाताच्या बोटांना इजा तर होऊ शकतेच शिवाय ती नखे चुकून इकडेतिकडे पसरली किंवा खाद्यपदार्थांत गेली तर ते आरोग्यासाठी चांगले नाही.

त्यातून जंतू पसरू शकतात. म्हणूनच दिवसाउजेडी नखं कापून घ्यावीत आणि सूर्यास्तानंतर नखं कापू नयेत असा आपल्या पूर्वजांनी नियम बनवला. जो आजही अनेक लोक पाळतात.

 

nailcutting_InMarathi
Heart Meet Soul

७. आरसा फुटल्यास किंवा काचेला तडा गेल्यास अपशकुन होतो

असे म्हणतात की पूर्वी आरसे खूप महाग असायचे. नाजूक सुद्धा असायचे. त्यामुळे हलगर्जीमुळे तो फुटून नुकसान होऊ नये किंवा कुणाला काच लागून जखम होऊ नये म्हणून अशी श्रद्धा पसरली असावी जी आरसा फुटल्यास अपशकुन होतो. म्हणजे लोक आरसा वापरताना आपसूकच काळजी घेतील.

 

broken-mirror InMarathi
My blog

 

८. डोळा फडफडत असल्यास काहीतरी वाईट होते

ही अंधश्रद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. पुरुषांचा उजवा डोळा किंवा स्त्रियांचा डावा डोळा फडफडत असल्यास काहीतरी वाईट घटना घडते. डोळा फडफडणे म्हणजे काहीतरी वाईट घडण्याचे संकेत असतात अशी अंधश्रद्धा अनेक ठिकाणी आढळते.

खरं तर डोळा फडफडणे म्हणजे शरीर काहीतरी संकेत देत असते. डोळा फडफडण्याची अनेक कारणे असतात. ताण, दारु, डोळा थकणे, ऍलर्जी किंवा डोळे कोरडे पडणे ह्यामुळे डोळा फडफडू शकतो. त्याचा अपशकुनाशी किंवा वाईट घटना घडण्याशी काहीही संबंध नाही.

 

Eye Blinking InMarathi
YouTube

९. तीन तीगाडा, काम बिघाडा

कुठेही तीन लोक एकत्र जात असतील तर त्यांचे काम होत नाही अशी अंधश्रद्धा अजूनही आढळते. म्हणून लोक पूर्वी आपल्याबरोबर चौथी व्यक्ती म्हणून एक लहानसा दगड घेऊन जात असत.

तीन तीगाडा काम बिघाडा ह्या अंधश्रद्धेमागे नेमके काय कारण असावे ह्याचे लॉजिक समजत नाही. ह्यामुळे उगाच तीन हा आकडा बदनाम झालाय.

 

Three Friends Inmarathi
Indian Express

१०. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नये.

पिंपळाच्या झाडावर भुतं असतात आणि संध्याकाळी पिंपळाजवळ गेल्यास ती भुतं आपल्या मागे लागतात अशी भीती आपल्याला लहानपणी दाखवली जात असे. संध्याकाळी कुठल्याच झाडाजवळ जाऊ नये आणि झाडांची पाने तोडू नये असे आपल्याला शिकवले जाते.

ह्याचे कारण म्हणजे संध्याकाळच्या वेळेला झाडे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करतात. कार्बन डायऑक्साइड आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. म्हणूनच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नये असे मोठी माणसे सांगतात.

 

Pimplache jhaad Inmarathi
Webdunia Marathi – वेबदुनिया

११. घराबाहेर किंवा दुकानाच्या बाहेर लिंबू मिरची टांगणे

घराला, दुकानाला दृष्ट लागू नये म्हणून घराबाहेर किंवा दुकानाबाहेर लिंबू मिरची लावणे ही श्रद्धा तर लाखो लोक आजही पाळताना दिसतात. वाईट शक्ती किंवा लहरी घराबाहेरच राहाव्यात म्हणून लोक असे करतात असे सांगितले जाते.

ह्याचे खरे कारण तर असे आहे की लिंबू आणि मिरची ह्या दोन्हीमुळे किडे व कीटक घरात येत नाहीत. त्यामुळे घर कीटकमुक्त राहते. म्हणूनच पूर्वीची माणसे घराबाहेर दारावर लिंबू मिरची टांगत असत.

 

superstition-lemon-and-green-chilli InMarathi
Patrika

तर अश्या ह्या श्रद्धा आजही अनेक लोक पाळताना दिसतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?