' गुंडगिरी युक्त भाजप – पार्टी विथ नो डिफरंन्स ! – InMarathi

गुंडगिरी युक्त भाजप – पार्टी विथ नो डिफरंन्स !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

भारतीय जनता पक्ष उदयास आला तो “पार्टी विथ डिफरंस” ह्या घोष वाक्याने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने फुललेलं कमळाचं रोपटं, गलिच्छ राजकारणाच्या चिखलात, आपली “स्वच्छ प्रतिमा” मोठ्या अभिमानाने झळकावत असत. पण – गेले…ते दिन गेले…!

एखादा नेता, पक्ष जस जसा राजकारणात स्थिरसावर होतो, तस तसा तो आजूबाजूच्या वातावरणाशी, परिस्थितीशी ‘जुळवून’ घेत असतो – असं साधारण चित्र सर्वत्रच आहे. भाजप ह्या वास्तविकतेला अपवाद नाही.

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत, ज्या पक्षाला “भ्रष्टवादी” म्हणत त्या पक्षातील ‘गुंडगिरी’वर टीकेची झोड खुद्द मोदींनी उठवली होती, त्याच पक्षातील नेते गट्ठ्यांनी भाजपच्या लाटेवर स्वार झाले होते. नुकतीच ह्या प्रकारात ठळक भर पडली – पुण्याचे, पिंपरी चिंचवड मनपाचे पुर्वाश्रमीचे महापौर आझम पानसरे भाजप ला सामील झालेत.

azam-pansare-joins-bjp-marathipizza

स्रोत

ह्याहून आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे – पुण्यातील “गँगस्टर” विठ्ठल शेलार ची भाजप कमलदलात स्थापना!

शेलारांचा भाजप प्रवेश केवळ त्या पक्षासाठी शोचनीय नसून, महाराष्ट्रातील / भारतातील राजकारणाची दुर्दैवी अपरिहार्यता अधोरेखित करणारी आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाला, तसंच, मोदी-फडणवीस ह्यांच्यासारखं – भाजप समर्थकांच्याच शब्दात – कणखर आणि स्वच्छ प्रतिमेचं नेतृत्व असताना – मनपा निवडणुकीसाठी एका गुंडाचा आधार घ्यावा लागावा, हे alarming आहे.

vithal-shelar-joins-bjp-marathipizza

बरेचदा राजकीय व्यक्तींवर विनाकारण केसेस दाखल होत असतात. पण शेलारांची गोष्ट तशी नाही. २०१० पर्यंत शेलारांचा “मरने-शेलार” गॅंग द्वारे पुण्यात दबदबा होता. संजय मरने (राष्ट्रवादीचेच!) ह्यांच्या हत्येचा आरोप ह्याच गँगवर होता. अवैध पिस्तुलांसोबत अटक केलेल्या शेलारांवर मोक्का (Maharashtra Control of Organised Crime Act ) लावण्यात आला होता. ऑगस्ट १६ मध्ये त्यांना जामीन मिळाली…आणि आता ते भाजपात सामील झालेत.

तशी ही घटना, भाजपच्या “गुन्हेगार युक्त” असण्याबद्दल खात्री देणारी पहिली घटना नव्हे. ह्या आधी वेळोवेळी पक्षाचं हे रूप समोर आलं आहेच. उदाहरणार्थ – गेल्या वर्षीच्या भाजपच्या राज्यसभा उमेदवार गोपाल नारायण सिंग ह्यांच्यावर तब्ब्ल २८ गुन्हेगारी खटले होते. बिहार निवडणुकीत भाजपच्या कित्येक उमेदवारांचा गुन्हेगारी बॅकग्राऊंड होता.

थोडक्यात…काँग्रेस मुक्त भारत ची घोषणा देत, भाजप स्वतः गुन्हेगार युक्त होत आहे.

So much for the “party with difference”… हो ना?

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?