' साहित्य संमेलन, फादर दिब्रिटो, अब्राह्मिक धर्म आणि आपण – InMarathi

साहित्य संमेलन, फादर दिब्रिटो, अब्राह्मिक धर्म आणि आपण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : सुजित भोगले

धर्म हि अशी संकल्पना आहे जिच्या बद्दल सगळेच जण काचेच्या घरात रहात असतो. कुणीही दुसऱ्यावर दगड फेकण्यात काही हशील नाही. एखादा सामान्य व्यक्ती कोणत्याही धर्माचा अनुयायी असला तरीपण आपण भारतीय म्हणून किंवा भाषाबंधू म्हणून समान पातळीवरच आहोत.

परंतु हि समानतेची पातळी सर्व धर्माच्या प्रचारकांच्या पातळीवर समान नक्कीच नाही. सत्य सनातन वैदिक धर्म ज्याचे प्रचलित नाव हिंदू धर्म आहे,

या धर्माचे मुख्य तत्व हे आहे कि तुम्ही कोणत्याही मार्गाने ईश्वराची आराधना आणि उपासना केली तरी ती त्याच्या पर्यंत पोचते आणि आपण भिन्न धर्मीय त्याला भिन्न नावाने ओळखतो पण तो एकच आहे. त्यामुळे आपल्याकडे धर्मांतर हि संकल्पनाच नाही.

अन्य धर्मीय व्यक्तींना आपल्या धर्मात ओढून घेण्याचा आपल्याला मोह नाही आणि त्याची कधी आवश्यकता सुद्धा वाटत नाही. आपल्या धर्मातील व्यक्तीने धर्मांतर केले तरी आपले त्याच्या बद्दलचे ममत्व आणि बंधुभाव संपत नाही.

आपण धर्माला वैचारिक आणि तात्विक मांडणीच्या स्वरूपात पाहतो. त्यामुळे आपल्या धर्मातील सुद्धा ज्या प्रमुख विचारधारा आहेत त्यांना आपण दर्शनशास्त्र असे संबोधतो.

कालांतराने या विचारधारांच्या जोडीला अन्य विचार सुद्धा निर्माण झाले आपण त्यांना सुद्धा जैन मत आणि बौद्ध मत असे नामाभिधान देऊन आपल्या दर्शनशास्त्राचा भाग केलेले आहे. अर्थात आपण एककल्ली नाही वेगळा धर्मविचार स्वीकारण्याचे आणि त्याला पचवण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे.

 

hindu symbol InMarathi

 

आपण निसर्गाचे उपासक आणि पूजक आहोत. आपण पंचमहाभूतांच्या पासून सगळ्या चर आणि अचरांची निर्मिती झाली आहे असे मानतो आणि म्हणून आपल्या पूजेतील मुख्य पाच देवता म्हणजे पंच महाभूतांचे मूर्त स्वरूप आहे.

अर्थात निसर्ग उपासना आणि मूर्तीपूजा हि सुद्धा आपण वेगवेगळी करत नसून तिला परस्परात आपण गुंफले आहे. आपल्याकडे उपासना हि वैयक्तिक मानली गेलेली आहे आणि प्रत्येकाने आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी ईश्वराच्या चरणी लीन व्हावे हे आपली संस्कृती सांगते.

विचार, तत्वज्ञान आणि सामाजिक वर्तन या तीन पातळीवर हिंदू धर्मियांचे अन्य धर्मियांशी असणारे वर्तन हे जगातील सगळ्यात आदर्श वर्तन आहे.

कदाचित आपण आपल्याच धर्मबांधवांशी जातीभेद आणि अन्य कारणांनी तितके चांगले वागत नसू पण आपल्या परधर्मसहिष्णुता या सिद्धांताला अनुसरून होणाऱ्या वर्तनाबद्दल आपला शत्रू सुद्धा आपली मुक्त कंठाने स्तुती करेल.

अन्य धर्मीय मंडळींचा मुलभूत धार्मिक सिद्धांत याच्या बरोबर उलट आहे. मुख्य अब्राहमिक रीलीजन म्हणजे ख्रिश्चन धर्म, मुस्लीम धर्म, ज्यू धर्म आणि बहाई धर्म आहेत. सर्व अब्राहमिक धर्मांचा पाया एकच आहे. ते अब्राहमला प्रथम आणि प्रमुख प्रेषित मानतात. ते एकेश्वरवादी आहेत.

हे सगळे धर्म स्त्रियांना अत्यंत गौण लेखतात. ते मूर्तिपूजेचे आणि निसर्ग उपासनेचे कट्टर विरोधक आहेत. त्यांच्या मते या उपासना करणारे लोक गौण देवांची उपासना करतात आणि ते व्यक्ती म्हणूनही गौण आहेत काफर आहेत.

“मग त्यांचा वध करणे किंवा त्यांना धर्मांतरित करून आपल्या धर्मात ओढणे हे आपले कर्तव्य आहे. हे धर्म आपल्या धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचे मुख्य शास्त्र म्हणजे धर्मांतर” मानतात.

 

christian-conversion Inmarathi
NewsLoose.com

अब्राहमिक धर्मात मुख्यत्वे सामुहिक प्रार्थना असतात आणि सामुहिक प्रार्थनांच्या परंपरांचे पालन हेच त्यांच्या धर्माचे मुख्य पालन आहे असे ते मानतात.

इतिहासाचे तज्ञ मानवाची हि प्रवृत्ती म्हणजे तो अजूनही टोळी संस्कृतीचा भाग असणे असे मानते आणि त्या दृष्टीने हे अब्राहमिक धर्म हे मानवाच्या उत्क्रांतीच्या पातळीवरील एक पाउल खाली असणारे धर्म मानले जातात.

हे जगभरातील इतिहास तज्ञांनी मान्य केलेले आणि मांडलेले मत आहे. धार्मिक उपासना वैयक्तिक पातळीवर आणि आत्मउन्नतीवर असणे हा मानवाच्या उत्क्रांतीमधील पुढील टप्पा आहे जो आपण हिंदू लोकांनी कधीच पार पाडला आहे.

ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचा पाया कोणताही विधिनिषेध न बाळगता केले जाणारे धर्मांतर हाच आहे.

या बद्दल त्यांच्या धर्मग्रंथात सुस्पष्ट उल्लेख आहेत. ते इतके स्पष्ट आणि त्यांच्या उद्दिष्टांना इतक्या नागड्या पद्धतीने मांडणारे आहेत कि त्यांना नाकारणे कुणालाही अशक्य आहे.

धर्माच्या नावाखाली या दोन्ही धर्मानी घातलेला हैदोस आणि सामान्य नागरिकांची केलेली कत्तल आणि लांडगेतोड हा जगाच्या इतिहासातील काळाकुट्ट भाग आहे.

ख्रिश्चन आणि इस्लाम म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ख्रिश्चन मिठी छुरी म्हणू शकतो. आपल्या धर्माचा पाया हा चर आणि अचर यांच्यातील सुद्धा प्राणशक्तीला ईश्वराचे अंशात्मक रूप मानून तिला वंदन करणे आहे त्यामुळे आपल्याला मूर्तीपूजा सहजगत्या करता येते.

आपल्याला त्या दगडाला दिलेल्या आकाराने त्याच्यात दृश्य स्वरूपात ईश्वर दिसतो आणि आपण नतमस्तक होतो. त्याच प्रमाणे आपल्याला वृक्षवल्ली सोयरे वाटतात. सगळे प्राणी हे प्रिय भासतात.

 

christians-and-muslims Inmarathi
DocumentaryTube

त्यामुळे आपल्याकडून हिंसा केली गेली तरी ती जीवो जीवस्य जीवनं या पातळीवरील असते. आपण प्रमादाच्या पातळीवर उतरून निसर्गाचे दोहन करत नाही किंवा पशु हत्या करत नाही.

तसे केल्याची जी भूतकाळातील आपल्या संस्कृतीतील उदाहरणे आहेत आपण त्याची भलामण न करता त्याला प्रमाद संबोधून त्याची शिक्षा ते कृत्य करणाऱ्या व्यक्तीला मिळाल्याचे दाखले देतो.

अगदी ईश्वरी अवतार सुद्धा त्या प्रमादाची शिक्षा म्हणून कुलक्षय करून घेतात हे आपण आग्रहाने मांडतो. आपण पूर्णपणे निसर्ग उपासक आहोत. मूर्तिपूजक आहोत. आणि आपण स्त्रीला ईश्वरस्वरूप मानतो तिला सन्मान देतो.

स्र्तीला सन्मान देणाऱ्या आपल्या संस्कृतीचे अधःपतन सुद्धा अब्राहमिक धर्मांनी भारतात प्रसार सुरु केल्यावरच झालेले आहे आणि ते यांच्या क्रूर कृत्यांची भेकड प्रतिक्रिया होती.

त्यामुळे समाजाचे आणि स्त्रियांचे सुद्धा प्रचंड शोषण झालेले आहे. पण आपली संस्कृती हि यत्र नार्यस्तु पूज्यते हे ठामपणे सांगणारीच आहे.

या उलट सर्व अब्राहमिक धर्म हे निर्गुण निराकार अश्या ईश्वराची उपासना करतात.

प्रतीकाच्या पातळीवर का होईना त्यांना चर्च बांधून क्रॉस समोर नतमस्तक व्हावे लागते किंवा मक्केच्या दिशेने एक भिंत बांधून तिच्यात एक कमान तयार करतात आणि त्या कमानीच्या समोर नतमस्तक होतात.

अर्थात आम्ही निर्गुण निराकाराची उपासना करतो सांगणारे सुद्धा व्यावहारिक पातळीवर मूर्त आणि सघन प्रतीकांच्या समोरच डोके टेकवतात आणि तरीही आपल्याला हिथन अर्थात मूर्तिपूजक गौण लोक आणि काफिर म्हणून हिणवतात.

इस्लाम मध्ये स्त्रीला अत्यंत गौण स्थान आहे. ती उंटाच्या प्रमाणे संपत्तीचा भाग आहे जिचा क्रय आणि विक्रय केला जाऊ शकतो.

अशातच एक बातमी वाचली की इराण मधील धर्मगुरूंनी आदेश दिला आहे कि पुरुषाने आपल्या मुलीशी सुद्धा विवाह करणे धर्म संमत आहे.

 

Triple talaq Inmarathi
DNA India

आता जो धर्म विकृतीच्या या पातळीवर असेल तो यत्र नार्यस्तु पूज्यते कसा काय समजू शकणार?

ख्रिश्चन धर्मात येशू ची आई मेरी हिचा वारंवार आणि अत्यंत ठामपणे उल्लेख हा व्हर्जिन मेरी अर्थात जिचे अपत्य प्राप्ती नंतर सुद्धा कौमार्य भंग झाले नाही अशी स्त्री हा उल्लेख केला गेला आहे.

योनीशुचीतेच्या थोतांडाचे मूळ ख्रिश्चन धर्मातील हे मुलभूत तत्वज्ञान आहे. मेरीचा गौरवपूर्वक उल्लेख केवळ आणि केवळ येशूची आई म्हणून केला गेला आहे. पण त्यात सुद्धा हि योनीशुचितेची पाचर मारली आहे. स्त्री म्हणजे नरकाचे द्वार हि संकल्पना ख्रिश्चन धर्मातीलच आहे.

मध्य युगीन कालखंडात आपल्याकडील अर्धवट डोक्याच्या धर्ममार्तंड मंडळीनी सुद्धा तशीच्या तशी उचलून अक्षरशः हैदोस घातला आणि आपल्या स्त्रियांचे जगणे नरकाच्या समान करून ठेवले.

अब्राहमिक धर्म हे धर्मविचार, धर्माची मुलभूत तत्वप्रणाली आणि धर्माचा मानवाच्या प्रती असणारा दृष्टीकोन, धर्माद्वारे प्रसारित केली जाणारी मानवी मुल्ये या सगळ्या पातळीवर अत्यंत मागास आहेत.

धर्मांतर घडवेपर्यंत हे सगळे लोक आमच्याकडे जातीभेद नाही हे ठामपणे सांगतात. पण एकाही दलित ख्रिश्चनाचे सवर्ण ख्रीश्चनाशी लग्न झालेले दाखवून द्या. सिरीयन चर्च मध्ये अन्य कोणत्याही ख्रिश्चन माणसाने घुसून दाखवावे.

आपल्या पेक्षाही अत्यंत कट्टर पणे ते हे वर्गीकरण पाळतात. फक्त आपण कुणाची उणीदुणी काढत नाही म्हणून आपल्याला हे समजत नाही. जो प्रकार ख्रिश्चन लोकांचा आहे तोच प्रकार मुस्लिमांचा सुद्धा आहे.

शिया सुन्नी बोहरा अहमदिया यांच्या पैकी एकही जण एकमेकांच्या मशिदीत पाय ठेवू शकत नाहीत. आपल्या हिंदू धर्मात तुम्ही बिनधास्त शिवमंदिरात जाऊन विष्णू सहस्त्रनाम मोठ्याने म्हणा कोणीही काहीही म्हणणार नाही..

 

bluemosque Inmarathi
Communities Digital News

कारण आपण बौद्धिक आणि आत्मिक पातळीवर तितके परिपक्व आणि प्रगल्भ आहोत.

जो कोणी सामान्य मुस्लीम अथवा ख्रिश्चन एखाद्या अन्य धर्मीयाला धर्मांतरित करवेल त्याचे मोठ्यातील मोठे पाप त्यांचा अल्लाह किंवा ईश्वर माफ करेल आणि त्याला स्वर्गात स्थान देईल हा उल्लेख त्यांच्या धर्मग्रंथात आहेत.

त्यामुळे त्या धर्माचा सामान्य अनुयायी सुद्धा सतत कोणी आपल्या जाळ्यात सापडतो आहे का आणि त्याला आपण धर्मांतरित करू शकतो आहे का याची चाचपणी करत असतो.

जे पाद्री होतात ते धर्मप्रचार आणि धर्मांतरण हेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट म्हणून स्वीकारतात. त्यामुळे ते उर्वरित आयुष्य अन्य धर्मियांना आपल्या धर्मात ओढणे याच साठी खर्च करतात.

त्यांच्या धर्मप्रचाराचे मुख्य सूत्र म्हणजे मूर्तीपूजेला अधिकाधिक हीन आणि न्यून दाखवणे आणि निसर्गउपासना करणे हे रानटी कृत्य आहे हे लोकांच्या डोक्यात भरवून देणे हेच असते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो या पेक्षा भिन्न जीवन जगलेले नाहीत.

त्यांच्यातील लेखन कौशल्य आणि मराठी भाषेवरील प्रभुत्वाचा त्यांनी उपयोग धर्मांतराला सहाय्यभूत होईल अश्या साहित्याच्या निर्मितीच्या साठी केला आहे. त्यांनी विशुद्ध साहित्याची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या साहित्याचे वान्गमयीन मूल्य शून्य आहे.

आपल्याकडे सुद्धा धर्माचे विवेचन करणारे मुबलक लेखन होते. परंतु त्याचा उद्देश हा नैतिकतेचा प्रचार करणे, लोकांना धर्माचरण करण्यास उद्युक्त करणे हा असतो.

मग गीतेवर भाष्य आणि टीका लिहिणारे लेखक असू दे किंवा अगदी बौद्धांच्या जातक कथा हे लेखन नितीमत्ता आणि चारीत्र्यसम्पन्न आचरणासाठी प्रेरित करायला लिहिले गेलेले आहे.

मी फादर दिब्रिटो यांचे लेखन वाचलेले आहे. ते साधा एक ललित लेख लिहितात त्यात सुद्धा ते फुलांचा केशरी रंग, पांढरा रंग आणि हिरवा रंग मांडतात.

त्यातील पांढऱ्या रंगाची महती गात केशरी आणि हिरव्या रंगातील न्यूनत्व दाखवतात. जाणीवपूर्वक एका ललित लेखात सुद्धा ख्रिस्ताचे वचन टाकण्याचा प्रताप करून दाखवतात.

 

Francis-de-breto Inmarathi
लोकसत्ता

हे सगळे वरवर खूप साळसूद वाटते. पण ज्याला आपण रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो ना, तसे वाचले कि या लेखनाच्या मागची कुटील प्रेरणा लक्षात येते.

हि सर्व पूर्व भूमिका मांडून आता दिब्रिटो यांना विरोध करण्याचे कारण सांगतो. हिंदू धर्माला गौण दाखवून हिंदू लोकांचे ख्रिश्चन लोकात धर्मांतर घडवणे हा दिब्रिटो यांचा व्यवसाय आहे. ते आयुष्यभर तेच करत आलेले आहेत. वसई विरार पट्ट्यात दिब्रिटो यांचे हे कार्य जोरात चालू आहे. जी अत्यंत चुकीची गोष्ट आहे.

हे धर्मांतर घडवताना साम , दाम, दंड भेद सगळी अस्त्रे वापरली जात आहेत. आपल्या पराकोटीच्या आदर्श अश्या राज्यघटनेमध्ये धर्मांतर घडवणे हा मुलभूत अधिकारांचा भाग मानला गेला आहे.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केलेले मराठी भाषेतील सगळे लेखन या धर्मांतर कार्याच्या साठी भूमी भुसभुशीत व्हावी या हेतूने केलेले आहे. त्यांचे संपूर्ण लेखन हे स्वतःच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे आहे.

जे विद्वान त्यांना लेखक समजतात त्यांनी एकदा दिब्रिटो यांचे लेखन वाचून हि खात्री करून घ्यावी आणि त्यानंतर प्रतिवाद करावा. एखादी भाषा हि केवळ भाषा नसते त्या भाषेची संस्कृती सुद्धा असते. मराठी भाषेची संस्कृती हिंदू आहे.

आपले धर्म आणि संस्कृती संदर्भातील विचार हे मूर्तिपूजक, निसर्गउपासक, स्त्रीला पूज्य मानणारे आहेत. आपल्या धर्म आणि सांस्कृतिक विचारांचा हा पाया आहे. फादर दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्माचे धर्मप्रचारक आहेत.

 

Father Dibrito Inmarathi
Lokmat.com

त्यांच्या धर्मविचारांचा पाया हा या सगळ्याचा विरोध करून त्यातील गौणत्व येनकेनप्रकारेण दाखवून धर्मांतर घडवणे हा आहे. अर्थात त्यांचे कार्य हे हिंदू संस्कृतीला नष्ट करणारे आहे.

जो व्यक्ती आपल्या भाषेला शस्त्र बनवून आपल्याच संस्कृतीचा आणि धर्माचा नाश करण्याचे कार्य करतो आहे, त्याच्या या कार्याला आपण अध्यक्षपदाचे कोंदण देणे हा बौद्धिक दिवाळखोरीचा उत्तम नमुना आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांनी हि पार्श्वभूमी समजून घेतली नाही हे दुर्दैवाने नमूद करावे लागते आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. |आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?