' साहित्य संमेलन की ख्रिस्ती धर्मांतराची बुवाबाजी? – InMarathi

साहित्य संमेलन की ख्रिस्ती धर्मांतराची बुवाबाजी?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक: अभिराम दीक्षित 

===

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रेटो नावाच्या कट्टर ख्रिस्ती पाद्रयांची नेमणूक होत आहे. हा मराठी वैचारिक विश्वातला काळा दिवस आहे.

या ख्रिश्चन धर्मप्रसारकाचे मराठी साहित्याला योगदान काय?

father francis dibrito inmarathi

त्याला काय म्हणून अध्यक्ष केले ? फादरने कोणती पुस्तके लिहिली आहेत?

फादरच्या पुस्तकांची नावे काय आहेत? फादरची पुस्तके पुढीलप्रमाणे : –

ख्रिस्ताची गोष्ट, ख्रिस्ती सण आणि उत्सव, पोप दुसरे जॉन पॉल, आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा, सुबोध बायबल – नवा करार, परिवर्तनासाठी धर्म, संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची, मुलांसाठी बायबल!

फादर फ्रान्सिस दिब्रेटो ची ही मराठी साहित्यसेवा आहे? की ख्रिस्त सेवा आहे?

father francis dibrito books list wikipedia inmarathi
wikipdia.com
BookGanga.com

 

BookGanga.com

 

समलैंगिकता आणि गर्भपात यावर या ख्रिस्ती पाद्र्याची काय मते आहेत? याने वेळोवेळी विज्ञानाला विरोध करत ख्रिस्ती अंधश्रद्धांना खतपाणी का घातले? कुमारी माता हे काय प्रकरण आहे?

कोणी पुरोगामी माईचा लाल हे प्रश्न विचारणार आहे की नाही?

हे फादर दिब्रेटो पांढऱ्या पायघोळ झग्यात गावभर हिंडून व्याख्याने देत असतात. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून भाषण करतील तेव्हाही पाद्र्याचा पांढरा झगा घालून भाषण देणार काय? हिंदू धर्मातले दोष दाखवून ख्रिश्चन व्हायचे आवाहन करणार काय? अशा प्रकारच्या ख्रिस्ती धर्मातराला साहित्य संमेलन पाठींबा देणार काय?

देणार असेल तर साहित्य सम्मेलनाचा हा बैलबाजार कायमचा बंद करून टाकायला हवा.

वागळे, चौधरी सारखे हिंदूंच्या मुळावर उठलेले पुरोगामी याचे स्वागत करतील यात शन्का नाही. अशाच साहित्य संमेलनात प्रा शेषराव मोरेंसारख्या खऱ्या सेक्युलर माणसाला हिंदूंची बाजू घेतो म्हणून विरोध करणे आणि फादर दिब्रेटो सारख्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला पाठींबा देणे हा पुरोगामी अजेंड्याचा भाग आहे.

फादर दिब्रेटो या पुरोगामी कंपूत राहून मोठ्या चलाखीने ख्रिस्ती धर्मप्रचार करत आलेला आहे. हिंदुत्वाला शिव्या देण्यात हा फादर दिब्रेटो कायम अग्रस्थानी राहिलेला आहे.

पण फादरने कधी ख्रिस्ती धर्मछळ, अंधश्रद्धा यावर टीका केली आहे काय? मनुवाद, गोडसेवाद, फेसिझम असे पुरोगामी पठडीतले शब्द वापरत ख्रिस्ती धर्म आणि ख्रिश्चन अंधश्रद्धाचा प्रसार करणे – ख्रिस्ती धर्मांतर करणे हेच फादर दिब्रेटोचे जीवन ध्येय आहे.

फादरने तसे ध्येय ठेवण्यात काही गैर नाही. पण अशा धर्मान्ध लोकांना साहित्य सम्मेलनाचा अध्यक्ष करणे ही लाचारीची हद्द आहे.

मे पु रेगे या जेष्ठ विचारवंतांनी फादर दिब्रेटो चे वस्त्रहरण आधीच केलेले आहे. (प्राध्यापक शेषराव मोरेंनी यांनी त्यांच्या “अप्रिय पण” या पुस्तकात सदर विषयावर एक लेख लिहिला आहे. त्या लेखाची छायाचित्रं, या लेखाच्या शेवटी जोडलेली आहेत.) फादरच्या अनेक लेखात त्याचा ख्रिस्ती कावा उघड झाला आहे.

उदाहरणार्थ, फादर कधीच सांगणार नाही की – इन्क्विजीशन काय होते? विच हंट म्हणून हजारो स्त्रियांना जिवंत जाळून मारणारे ख्रिस्ती चर्च समतावादी कधी झाले?

हा ख्रिस्ती पादरी मनुवाद, फॅसिझम अश्या खास पुरोगामी शब्दाचा कायम वापर करत असतो आणि हिंदूना हीन लेखत असतो. फादरला कोणीतरी सांगितले पाहिजे की फ्यासिस्टांचा औरस बाप म्हणजे बेनिटो मुसोलिनी.

त्याने ख्रिस्ती चर्चच्या पायस पोपशी १९२९ मध्ये युती करून व्हॅटिकन हे स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली होती. या व्हॅटिकन मध्ये बसूनच आजचे पोप जगाला ख्रिस्ती करण्याची स्वप्ने पाहत असतात. आणि चर्चचा १९२९ पर्यंत फेसिझम ला तत्वतः विरोधही नव्हता.

या चर्चने जगभर अत्याचार केले आहे. विच हंट म्हणून स्त्रियांना जिवंत जाळले आहे. गेलीलीयो सारख्या शास्त्रज्ञाशी गुंडगिरी केली आहे.

जगभरातल्या क्रूर पाशवी हुकूमशहांशी युती करत जगातले सर्वात मोठे रियाल इस्टेट चे हे ख्रिस्ती मालक आहेत.

आता फादर दिब्रेटो संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भाषण देतील. आणि समाजवाद्याच्या भाषेत ‘भूमिका’ घेतील. ही ‘भूमिका’ अर्थातच हिंदुत्वाचे राजकारण आणि हिंदूंचा धर्म यांच्या विरोधी असेल.

त्यावेळी ख्रिस्ती धर्म कसा समतावादी आहे – हिंदू मनुवादी आहेत, ख्रिस्ती धर्म कसा सुधारलेला आहे – हिंदू अंधश्रद्ध आहेत असे तारे तोडत – ख्रिस्ती अंधश्रद्धाचा सरकारी खर्चाने प्रचार होईल. आणि हिंदू षंढासारखे बघत राहतील.

प्रा. शेषराव मोरे यांचा लेख :

 

 

 

 

 

 

 

 

 

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?