या मुलींनी असं काहीतरी केलं जे प्रत्येक घरातील आजी-आजोबांचं जीवन बदलून टाकेल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एकटेपणा हा कुणालाही त्रासदायकच वाटतो. एकटेपणाची जाणीव किती जीवघेणी असू शकते याची प्रचीती आपल्या जवळच्या माणसावर जेंव्हा ही वेळ येते, तेंव्हा जाणवते. असच काहीसं अनन्या ग्रोवरला आपल्या आजोबांविषयी वाटलं.
अनन्या सांगते, गेल्याच वर्षी तिचे आजी-आजोबा कायमचे सोडून गेले. तिची आजी कॅन्सरने गेली. पण तिचे आजोबा फक्त एकटेपणा सहन न झाल्याने गेले.
“आजी गेल्यानंतर आजोबा स्वतःला खूप एकटे समजू लागले होते. साहजिक आहे, आयुष्यातला मोठा प्रवास ज्या जोडीदारासोबत केला, त्याचं असं जाणं खूप वेदनादायी असतं. आजोबांना हा विरह आणि एकाकीपणा सहन झाला नाही. आजी गेल्यानंतर काही महिन्यातच आजोबा सुद्धा आम्हाला कायमचं सोडून गेले,” अनन्या सांगत होती.
==
हे ही वाचा : भल्या भल्या तरुणांना लाजवेल अशी आहे ह्या ६८ वर्षीय वृद्धाची बॉडी…
==
फक्त एकटेपणामुळे आपण आपल्या आजोबाना गमावलं या गोष्टीची खंत अनन्याला सतावत होती. आपल्या आजोबांसारखीच अशी किती तरी माणसे असू शकतात ज्यांना एकटेपणा दूर करण्यासाठी कुणाच्या तरी सोबतीची गरज असेल.
या एकाकी आणि विशेषतः वृद्ध, वयस्क व्यक्तींच्या आयुष्यातील हा एकटेपणा कसा दूर करता येईल, याबद्दल आपल्या मैत्रिणीसोबत बोलताना, त्यांना यावर एक हटके उपाय सुचला.
मग अनन्याने आपल्या मैत्रिणी अनुष्का शर्मा, आरीफा, वंशिका यादव आणि एमीटी इंटरनॅशनल स्कूल, नोएडाच्या वसुधा सुधींदर यांनी मिळून अनाथाश्रमातील मुले आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक यांना जोडणारा एक दुवा बनवला.
या वृद्धाना आणि मुलांना एकमेकांसोबत वेळ घालवता यावा आणि एकटेपणा दूर करता यावा या एकमेव उद्देशाने या मुलीनी एक सुंदर अॅप बनवले आहे. या अॅपचे नाव आहे, ‘मैत्री’. या मैत्रीच्या माध्यमातून एकमेकांच्या आयुष्यातील एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो.
विशेषतः वृद्धांच्या आयुष्यात निर्माण होणारा एकाकीपणा भरून काढण्याच काम हे अॅप करते, या अॅपच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील वृद्ध आणि अनाथालयातील मुले एकमेकांशी जोडली जातात. ते एकमेकांसोबत आपला वेळ घालवू शकतात.
याबाबत अनन्या असं सांगते आहे,
“आम्हाला असं जाणवलं की, वृद्धत्व आणि त्यासोबत येणारा एकाकीपणा ही एक गंभीर समस्या आहे. अशाच प्रकारची दुसरी समस्या म्हणजे काळजी आणि प्रेम यांच्या अभावाने मोठी होणारी अनाथाश्रमातील मुले. त्यांना देखील आपलेपणाची गरज असतेच.”
या दोन्ही घटकांना जर एकत्र आणलं तर काही मार्ग निघू शकतो का यावर त्यांनी विचार केला. यावर त्यांनी अभ्यास करणे सुरु केले आणि त्यांना या एका सुंदर कल्पनेचा शोध लागला.
मग, मार्च २०१९ पासून ही टीम कामाला लागली. एका महिन्यातच यावर नेमका काय उपाय करता येईल आणि त्यांना काय केलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या रिसर्च दरम्यान ते, १४० वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमाच्या प्रशासकांची मुलाखत घेतली. या अॅपच्या माध्यमातून त्या काय मदत करू शकतात हे समजावून सांगितले.
सुरुवातीला सगळ्यांनाच ही संकल्पना समजत होती किंवा पटत होती असे नाही. काही लोकांना समजावून सांगण्यात खूप वेळ जायचा पण, हळूहळू काम सुरळीत होत गेले.
या अनाथाश्रमाचे किंवा वृद्धाश्रमाचे जे कोणी संचालक असतील त्यांच्याकडून आम्ही या मुलांच्या आणि वृद्धांच्या जीवनशैलीची माहिती काढली.
खरे तर, या वृद्ध लोकांना फक्त बोलण्यासाठी आणि त्याचं ऐकून घेण्यासाठी कुणी तरी हवं असतं. जेंव्हा यांच्या घरचे यांना वेळ देऊ शकत नाहीत, तेंव्हा त्यांच्या मनात एक भली मोठी पोकळी निर्माण होते.
म्हणूनच त्यांचा हा एकाकी पणा काही अंशी कमी करण्यासाठी हा दुवा काम करू शकतो का याची चाचपणी करून या मुली कामाला लागल्या.
अनन्या असं सांगते आहे,
“सुरुवातीला एकमेकांच्या चांगल्या-वाईट बाजू समजून घेण्यातच खूप वेळ गेला. एकदा ही स्टेज संपल्यानंतर आमच्या कामाला वेग आला. जुलै पर्यंत आमचे अॅप तयार झाले व युजर्स देखील वाढले.”
==
हे ही वाचा : स्वतःचे आयुष्य वेचून सुंदरबन आणि तिथल्या रहिवाशांना वाचवणाऱ्या वृद्धाची कहाणी!
==
अॅप सुरु झाल्यानंतर दिल्लीमध्ये १००० युजर्सनी हे अॅप डाऊनलोड केले. या अॅप मध्ये युजर्सचे तीन प्रकार आहेत. एक आहे, स्वयंसेवक, दुसरे देणगीदार आणि तिसरे अनाथाश्रम किंवा वृद्धश्रमाचे प्रशासक.
या अॅपवर दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील सध्या सातपेक्षा जास्त अनाथाश्रम आणि १३ वृद्धाश्रम कनेक्ट आहेत.
हे अॅप बनवण्यासाठी या टीमला खूप परिश्रम घ्यावे लागले, खूप वेळ द्यावा लागला. असे असले तरी, या कामाच्या निमित्ताने, त्यांना खूप शिकायला देखील मिळाले.
या टीमची सीइओ अनन्या असं सांगते आहे,
“कोणत्याही इतर कंपनी प्रमाणे आमच्या टीम मध्ये देखील सीइओ, मुख्य वित्त अधिकारी, मुख्य वितरण कार्यकारी, डिझाईन, कम्युनिकेशन आणि टेक्निकल ऑफिसर अशी पदे होती. खरच या कामातून आम्हाला खूप काही शिकता आले, आणि आमच्या मधील प्रत्येकात काम करण्याची कितपत क्षमता आहे, हे देखील ओळखता आले,”
या अॅपने तीन युजर्स यासाठी ठेवलेत कारण, ज्याला ज्या प्रकारची मदत देणं शक्य आहे, त्यांना ती देता यावी. यासाठी देणगीदार किंवा डोनर हा एक पर्याय देखील ठेवला आहे.
ज्यांना या अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमांना वस्तूरुपात मदत करायची असेल किंवा त्यांच्यासाठी गरजेच्या असणाऱ्या वस्तू पुरवायच्या असतील तर ते देखील या अॅपच्या माध्यमातून पुरवू शकतात.
ज्यांना स्वतःहून या वृद्धाश्रमासाठी काही मदत करायची असेल किंवा प्रत्यक्ष त्यांच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवायचा असेल त्यांच्यासाठी व्हालेंटीयर हा पर्याय आहे.
खरे तर अल्पावधीत हजारो युजर्स हे अॅप डाऊनलोड करत असतील तर, या अपची किती आवश्यकता होती हे यावरून समजून येते.
अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम यांना जोडण्यापुरतेच हे काम मर्यादित राहिले नाही. तर, या अॅपच्या माध्यमातून जोडलेल्या अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांनी एकत्र येऊन दोन कार्यक्रम देखील केले. म्हणजे या अॅपमुळे खरोखरच त्यांचा एकाकीपणा दूर होण्यास मदत होत आहे आणि हेच खरे या अॅपचे यश आहे.
==
हे ही वाचा : ट्रॅफिक रूल तोडून ही ९६ वर्षांच्या वृध्दाला शिक्षा झाली नाही, डोळे पाणवणारी घटना
==
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.