सातवा राज्यस्तरीय ‘झील फॅशन शो’ पुण्यात उत्साहात संपन्न
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
झील या सामाजिक संस्थेच्या वतीने सातव्या राज्यस्तरीय फॅशन शो चे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. हा कार्यक्रम पुण्यातील नामांकित कॅरिअड हॉटेल मध्ये पार पडला.
याची सुरुवात दि. २ ऑगस्ट २०१९ पासून झाली. यामध्ये राज्याच्या विविध शहरातून एकूण ४७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पुण्याच्या कलाप्रेमींसाठी व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या भव्य फॅशनशो चे आयोजन करण्यात आले होते.
तीन दिवसाच्या या कार्यक्रमात अनुक्रमे इंडो वेस्टर्न राऊंड, टॅलेंट राऊंड, ब्रँड वॉक राऊंड, इंट्रोडकशन, Q & A राऊंड अश्या विविध पद्धतीत स्पर्धकांची परीक्षा घेण्यात आली.
या शो चे नाव ‘झील मिसेस, मिस, मिस्टर,टीन, किड्स महाराष्ट्र लेवल २०१९’ असे असून या फॅशन शोमध्ये ३.५ ते ६० वयोगटातील मुले-मुली व महिला-पुरुष सहभागी झाल्या होत्या.
या वेळी कार्यक्रमाचे संयोजक स्वीटी गोसावी आणि अविनाश गोसावी हे होते व पिया रॉय आणि रुपाली सावंत यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे आहेत.
विजेते अनुक्रमे : लहान गटात अनुष्का हारके, सिद्धी हंबीर, तशवी गुप्ता, मनस्वी गायकवाड, मयुरेश मते, शौर्य दुसाने, अनुज हारके, श्रीयांशु जाधव, सार्थ गोरे, उन्नती सिसोदिया, माधुरी देसाई, दिशा रोकडे, पायल बाविस्कर, प्रणिती तरडे, सुरेश भरडे, चिन्मय पाचपोनडे, जगत जागती, रिया मोहन, रिया पाचघोडे, कोमल जाधव, रेवती लोंढे, दिव्या तुपे, साधना सोनावणे, सरिता अगरवाल हे होते.
कार्यक्रमाचे स्पिरिच्यालिटी पार्टनर स्मिता बेलसरे व क्राऊन पार्टनर प्रेम गाडा आणि राज म्युझिक व डान्सच्या वतीने विजेत्यांना सन्मान चिन्ह दिले गेले.
या वेळी अर्णव आवरे, तेजस बोबडे, रोहिणी मोरे हे ड्रेस डिझायनर होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन हेमा शर्मा यांनी केले असून गोमती हर्बल्स व सायली कॉस्मॅटिक सेंटर कडून गिफ्ट हॅम्पर्स स्पर्धकांना देण्यात आले.
या कार्यक्रमात साक्षी चौधरी – धुमस मूवी फेम , योग एक्स्पर्ट- श्रुती शिंदे ( ABP माझा फेम ), अक्षय हाडके – बेफिकीर मूवी फेम, चाईल्ड आर्टिस्ट – प्रांजली श्रीकांत – वेलकम होम मूवी फेम या सेलेब्रिटीस ने हजेरी लावली.
तसेच स्वीटी गोसावी यांनी गौरव वानखेडे, श्रावणी गावडे, ओजल गजबकर सानिका जाधव यांचे आभार प्रदर्शन केले.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.