' जगभरात फक्त हिमालयात मिळणाऱ्या या औषधाची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे! – InMarathi

जगभरात फक्त हिमालयात मिळणाऱ्या या औषधाची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

जगात काही अशाही वनस्पती आहेत ज्या दुर्मिळ तर आहेतच पण, बहुपयोगी आहेत. चंदनासारख्या झाडाच्या खोडला किती किंमत मोजली जाते ते तर आपण जाणतोच.

तिबेट, चीन आणि भारताच्या हिमालयातील प्रदेशात अशी एक वनस्पती आढळते जिची किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे.

फक्त उन्हाळ्याच्या दिवसात आढळणारी ही वनस्पती शोधण्यासाठी स्थानिक लोक मैलोनमैल दूर चालत जातात. काही जणांच्या तर उदरनिर्वाहाच साधनच ते आहे.

ही वनस्पती दुर्मिळ असल्याने हिमालयाच्या उंच भागावर किंवा अगदी गोठलेल्या हिमनदीवर देखील ही आढळते. पण ती अशी सहसा नजरेस पडत नाही.

कारण ही वनस्पती जमिनीत दडलेली असते. वनस्पती कसली ती तर एक प्रकारची बुरशीच…! हो, हो बुरशीच!

मोठ्या पतंगाच्या अळी भोवती ही बुरशी वाढत जाते आणि आतून त्या अळीला फस्त करते.

अशी ही बहुगुणी वनस्पती अनेक पोटविकारांपासून कॅन्सर पर्यंत गुणकारी ठरत असल्याचा दावा अनेक शास्त्रज्ञ देखील करतात. म्हणून तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिला प्रचंड मागणी आहे. सोन्याच्याच नाही तर हिऱ्याचा भाव देऊन देखील ही वनस्पती खरेदी करणारे लोक आहेत.

 

हे ही वाचा :

===

 

Himachal-Pradesh Inmarathi

 

१५ व्या शतकातील तिबेटच्या वैद्यकीय ग्रंथात देखील या वनस्पतीचा उल्लेख आढळतो. इतकी ही वनस्पती पुरातन आहे. तिबेटी आणि चायनीज भाषेत याला अनेक वेगवेगळी नवे असली तरी याला जगभरात वायाग्रा म्हणून ओळखले जाते.

ही वनस्पती शोधणे तसे फार कष्टाचे काम आहे. तरीही याला मिळणारी किंमत जास्त असल्याने सर्व प्रकारच्या अडथळ्यांना तोंड देत लोक याचा शोध घेतात.

मा जुन्जिओ नावाचा एक वयस्क व्यक्ती तर या वनस्पतीच्या शोधात घरापासून तब्बल ६०० किमीचा प्रवास करतो. घर चालवण्यासाठी मला हे करावच लागत असं तो म्हणतो. ‘प्रत्येक पावसाळ्यात माझा हा इतका प्रवास ठरलेला आहे’ असं तो म्हणतो.

चीनच्या पश्चिम शांघाय प्रदेशातील अम्ने मशीनच्या डोंगररांगामध्ये ही वनस्पती आढळते. या वनस्पतीमध्ये आढळून येणाऱ्या अप्रोडीसीक आणि काही मेडिसिनल वैशिष्ट्यांमुळे ही या वनस्पतीला भरपूर मागणी आहे आणि तितकीच किंमत देखील यासाठी मोजली जाते.

 

rare medicine Inmarathi

 

जमिनीच्या आत आढळणारी ही वनस्पती शोधण्यासाठी जमीन उकरून तिचा शोध घ्यावा लागतो. बर्फाळ प्रदेशातून भटकण्यासाठी बऱ्याचदा याक सारख्या प्राण्याचा वापर केला जातो. गोठलेल्या नदीवरील बर्फाळ जमिनीमध्ये देखील याचा शोध घेतला जातो.

प्रती किलो १,००,००० $ दराने याची विक्री केली जाते. स्थानिक लोकांना अर्थार्जनाचा एक उत्तम मार्ग आहे. काही ठिकाणी उंचावर जिथे फारशी लोकवस्ती आढळत नाही अशा ठिकाणी याची शेती देखील केली जाते.

इथे अख्खे गावच्या गाव पिक काढण्यासाठी गाव सोडून उंचावर राहायला जाते. चांगले पिक आले तर, एकाच सिझनमध्ये तिबेटी लोक वर्षाच्या तिप्पट पैसे मिळवू शकतात.

जमीन खोदून त्यातून वायाग्रा शोधणारी माणसे कामासाठी घेतली जातात. त्यांना याचे पैसे मिळतात. या पैशातून या लोकांनी आता घरावर सोलर पॅनेलदेखील बसवले आहेत.

गवतावर आढळून येणाऱ्या आळ्यांवर ही वनस्पती वाढते. हिवाळ्याच्या दिवसांत या अळ्या स्वतःला जमिनीत गाढून घेतात. या अळ्यांनी स्वतःला जमिनीत गाडल्यानंतरच त्याभोवती या बुरशीची वाढ होते. अळीच्या प्रकारावरून या वनस्पतीचा देखील दर्जा ठरवला जातो.

 

हे ही वाचा :

===

 

chinese_mountains_Inmarathi

 

गुलाबी रंगाच्या मोठ्या पतंगाची जी आळी असते तिच्या पासून तयार झालेली वनस्पती असेल तर तिची किंमत अधिक असते. हिवाळ्यापासून या वनस्पतीची वाढ सुरु होते. उन्हाळ्यापर्यंत त्यांची पूर्ण वाढ झालेली असते.

मग उन्हाळ्यात या वनस्पती शोधून त्या काढून आणल्या जातात आणि एका कपड्यावर ठेऊन सुकवल्या जातात. ही वनस्पती सुकवण्यासाठी मोठमोठे गोडाऊन बांधले जातात. कारण सोन्याच्या किमतीच्या या वनस्पतीसाठी मारामारी आणि खून देखील होतात.

या वनस्पतीच्या मोहापायी एकदा नेपाळमध्ये सात लोकांचे अपहरण करण्यात आले होते. त्यातील दोघांचे मृतदेह नदीशेजारी आढळून आले होते. त्यामुळे हा व्यापार करणाऱ्यांना जीवाची देखील खूप काळजी घ्यावी लागते.

वायाग्रा शोधायला गेलेले लोक डोंगरातच तंबू ठोकून वस्ती करतात. तब्बल पाच ते सहा आठवडे हे लोक घरापासून दूर तिथल्या तळावर राहतात. जमिनीतून ही वनस्पती खोदून काढण्यासाठी कुदळीसारख्या हत्यारांचा वापर केला जातो.

या वनस्पतीच्या व्यापारामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. उंच डोंगरावरून शोधून ही वनस्पती काढून आणल्यानंतर ती सुकवली जाते. नंतर ती स्वच्छ निवडली जाते.

 

medicine picker Inmarathi

 

हे ही वाचा :

===

 

महिलांना देखील यामुळे रोजगार मिळत आहे. वनस्पती सुकवणे आणि निवडणे अशी कामे इथल्या स्त्रिया करतात. या वनस्पतीची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली असतात त्यामुळे, वनस्पतीच्या मुळामधील माती झटकून ती स्वच्छ करण्याचे काम या स्त्रिया करतात.

या वनस्पती पासून तयार करण्यात येणारे पेय $500 ते $1,300 प्रती ग्लास इतक्या महागड्या दराने विकले जाते. अलीकडे हवामान बदलाचा परिणाम देखील या वनस्पतीवर जाणवतो आहे. वातावरणातील तापमान वाढल्याने हवेतील आर्द्रता कमी झाली आहे.

परिणामी जमिनी देखील कोरड्या पडत चालल्या आहेत. परंतु या वनस्पतीच्या वाढीसाठी जमिनीत आर्द्रता असणे आवश्यक आहे. जमिनीत आर्द्रता असेल तरच ही बुरशी वाढू शकते.

१९८० पासून शांघाय-तिबेटच्या या पठारावरील हवामानात फरक पडत असल्याचे चीयानीज शास्त्रज्ञ सांगतात. दिवसेंदिवस या वनस्पतीची किंमत वाढतच चालली आहे. चीनमध्येच गेल्या दहा वर्षात याची किंमत दहापतीने वाढली आहे.

चीनच्या मध्यमवर्गीय लोकांमध्ये या वनस्पतीला खूप मागणी आहे. ही वनस्पती बाळगणे हे आत्ता एक स्टेट्स सिम्बॉल बनले आहे. तसेच किडनीच्या विकारापासून वंध्यत्वावरील उपचारात या वनस्पतीचा उपयोग केला जातो. म्हणूनच या बुरशीजन्य वनस्पतीसाठी सोन्यापेक्षादेखील जास्त दर मोजला जातो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?