जगातल्या ७ आश्चर्यांमध्ये मोडणाऱ्या चीनच्या भिंतीबद्दल ही आहेत काही अज्ञात रहस्ये!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
चीनच्या भल्या मोठ्या भिंतीबाबत आजही अनेक मिथके प्रसिद्ध आहेत. जगातील सर्वात मोठी भिंत म्हणून ओळखली जाणारी ही भिंत अवकाशातूनही दिसते अशीही एक वंदता आहे. अर्थात यात काहीही तथ्य नाही हे नंतर सिद्ध झालेच.
खरे तर तुम्ही विमानातूनही ही भिंत पाहू शकत नाही, चंद्राची तर गोष्टच सोडा. पण, तरीही या भिंतीमध्ये अशी अनेक आश्चर्ये आणि गूढ दडलेले आहे जे लोकांना आजही आकर्षित करतात.
या भिंतीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता वाढावी असे खूप काही आहे. चला तर जाणून घेऊया या भल्या मोठ्या भिंतीमागची काही अज्ञात रहस्ये.
–
हे ही वाचा – चीनकडे डोळे रोखून पहाणारे छत्रपती शिवाजी महाराज : “मराठा इन्फन्ट्री” ची कमाल…!
–
चीनची भिंत ही चीनच्या भव्य साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेली एक तटबंदी असून दगड, विटा, चिखल, लाकूड, अशा अनेक पदार्थांचा वापर करून बांधण्यात आली आहे. पुर्वेपासुन पश्चिमेपर्यंत पसरलेली ही भिंत चीनच्या उत्तरसीमेचेही रक्षण करते.
या भिंतीची लांबी सुमारे ५,५०० मैल इतकी आहे. चीनच्या पूर्वेकडील शेन्हेग्वान पासून ते पश्चिमेकडील लॉप नूर पर्यंत ही भिंत पसरलेली आहे.
चीनच्या या भिंतीची उंची किती फुट असेल असे तुम्हला वाटते?
चीनच्या या भिंतीची उंची सुमारे ३० फुट इतकी आहे. काही ठिकाणी ही भिंत मोठ्या पर्वत शिखरावर देखील बांधलेली आहे, तिथे याची उंची अजून मोठी दिसते.
चीनची ही भिंत कोणत्या उद्देशाने बांधण्यात आली?
खरेतर मंगोल लोकांच्या हल्ल्यापासून सरंक्षण व्हावे या हेतूनेच ही भिंत बांधण्यात आली. उत्तरेकडून येणाऱ्या आक्रमकांपासून देखील बचाव होईल या हेतूने ही भली मोठी भिंत उभारण्यात आली.
तसेच चीन मधील नागरिक देखील चीनच्या बाहेर जाऊ शकणार नाहीत हा देखील एक उद्देश ही भिंत बांधण्यामागे होताच.
चीनची ही भिंत बांधून पूर्ण होण्यास खूप मोठा कालखंड जावा लागला. ही भिंत कोणत्याही एकाच सम्राटाच्या कालखंडात पूर्ण झाली नाही. या भिंतीच्या बांधकामाचे काम ५ व्या शतकात सुरु झाले आणि बांधकाम पूर्ण होण्यास १६ वे शतक उजाडावे लागले.
मध्ये मध्ये या बांधकामात खंड देखील पडला त्यामुळे याचे बांधकाम सलगपणे सुरु राहिले नाही.
या भिंतीच्या सुरुवातीच्या बांधकामासाठी त्याच परिसरातील चिखल आणि दगड वापरण्यात आले. भिंतीचा शेवटचा भाग बांधताना मात्र विटांचा वापर करण्यात आलेला आहे.
सुरुवातील ही भिंत अनेक लांबलचक भांगात विभागलेली होती. त्यात सलगता नव्हती. यातील मधले अंतर जोडण्याचे काम नंतर करण्यात आले आणि भिंत एकसलग दिसू लागली.
सम्राट कींम शिहुनागने सुरुवातीला तुकड्यातुकड्यात उत्तरेकडील काही राज्यांच्या सीमेवर ही भिंत बांधण्यास सुरुवात केली.
त्याच्यानंतर सम्राट कींमने हे सगळे तुकडे एकमेकांना जोडून भली मोठी भिंत बांधण्याचे काम केले. चीनमधील छोटे शेतकरी, कैदी आणि सैनिकांनी मिळून या भिंतीचे बांधकाम पूर्ण केले.
चीनच्या या भिंतीचे तीन भाग आहेत- रस्ता, पहारेकार्यांना टेहाळणीसाठी बुरुज आणि भिंत.
–
हे ही वाचा – चीनचं काय घेऊन बसलात? आपली ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ माहितीये का?
–
चीनच्या या भिंतीमुळे या भूभागावर जो एक कृत्रिम बांध निर्माण झाला त्यामुळे फक्त जमिनीचे दोन भाग झाले आहेत. एवढेच नाही तर या दोन भूभागावरील जैवसृष्टीमध्ये देखील बराच फरक पडला आहे.
या भिंतीच्या दोन्ही बाजूकडील वनस्पतींमध्ये वर्षानुवर्षे काही अनुवांशिक बदल घडून आलेले आहेत. अर्थातच हे बदल परागीभवनामुळे झालेले आहेत. त्यामुळे दोन्हीकडील जैवसृष्टीमध्ये विविधता आढळते.
मागे, १९३० साली चीन सरकारने या भिंती वरून महामार्ग बनवण्याची योजना आखलेली होती. ज्यामुळे देशाच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत सरकारी मदत पोचवणे सोपे जाईल.
अन्न आणि लष्करी मदत पोचवण्यासाठी याचा वापर केला जाईल असा यामागे हेतू होता. परंतु, या भिंतीवरील हा महामार्ग अस्तित्वात आलाच नाही.
ही भिंत बांधताना चिकट तांदळाचा वापर करण्यात आला आहे. आत्ता हे ऐकण्यात तुम्हाला थोडे विचित्र वाटेल पण, या भिंतीचे बांधकाम मजबूत व्हावे म्हणून तांदळाच्या पिठाचा वापर करण्यात आला आहे.
मिंग सम्राट शेतकऱ्यांकडून अगदी शेवटचा तांदळाचा दाणा देखील घेऊन जात. या भिंतीचा जो भाग तांदळाच्या पीठाने बांधण्यात आला आहे तो अजूनही जसाच्यातसा आहे.
वनस्पतीची मुळे देखील या भिंतीत रुजू शकत नाहीत यामुळे याला कुठेही तडा गेलेला नाही.
दरवर्षी सुमारे १० दशलक्षाहून अधिक पर्यटक ही भिंत पाहण्यासाठी येतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना आपल्या आठवणी मागे ठेऊन जाण्याची फार इच्छा असते.
त्यासाठी भिंतीवर स्वतःचे नाव कोरणे वगैरे प्रकार ते करत असतात. काही वेळा खाऊचे पॅकेट किंवा खाण्याच्या वस्तू, स्वतः केलेला कचरा, ते इथेच टाकून जातात.
त्यामुळे या भिंतीच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा येते. चीन सरकारलाही इथे लक्ष देता येत नाही कारण ही भिंत खूपच मोठी आहे.
अनेक शतकांच्या मेहनतीनंतर पूर्ण झालेली ही भिंत, चीनच्या अनेक शत्रुंविरोधात चीनला भक्कम साथ देत उभी आहे.
भटक्या लढाऊ जमाती, रानटी हल्लेखोर, मंगोल्स आणि इतर अनेक शत्रूंनी या भिंतीचा कच्चा दुवा शोधून तिला छेद देण्याचा प्रयत्न केला पण एकालाही त्यामध्ये यश आले नाही.
चीनच्या सम्राटांनी ज्या उद्देशाने ही भिंत बांधली त्यात ते पूर्ण यशस्वी ठरले.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.