' अमिताभ बच्चनमुळे हा दिग्गज नेता “मुख्यमंत्री” होता होता राहिला… – InMarathi

अमिताभ बच्चनमुळे हा दिग्गज नेता “मुख्यमंत्री” होता होता राहिला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

१९४२ किंवा त्या आधीचा काळ म्हणजे असा होता की, सारा देशच इंग्रजांविरुद्ध पेटून उठला होता. देशप्रेमाचे वारे सर्वत्र वाहू लागले होते आणि देश स्वतंत्र करण्यासाठी सारे आपले प्राण पणाला लावत होते.

असेच एक नेते होते हेमवती नंदन बहुगुणा. जे खरं तर काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जात होते, पण त्यांनी शेवटी शेवटी काँग्रेसला संपवायचा विचार केला.

ते उत्तरप्रदेशच्या पहिल्या विधानसभेत सामील झालेले काँग्रेसचे चाणक्य म्हणून ज्यांची ओळख होती ते काँग्रेसच्या विरुद्ध का गेले असावेत?

काँग्रेसमध्ये असताना खरं तर त्यांना महत्त्वाची पदं मिळाली होती. ते यूपीचे मुख्यमंत्री पण झाले होते आणि केंद्रात मंत्री होते तरी एवढा राग का?

 

hemvati inmarathi
firstpost.com

आपल्याला तर माहितीच आहे की अभिनेते आणि राजकारण यांचे संबंध सतत येतच असतात. एखादा हिरो जर राजकारणात उतरला तर नवल वाटायला नको.

कारण त्यांच्या प्रसिद्धीचा फायदा राजकारणाला होतो. तर हेमवती नंदन बहुगुणा यांच्या कारकिर्दीबद्दल बोलताना एका अभिनेत्याचं नाव येतं. आणि तेही साधासुधा अभिनेता नाही, तर आपले बिग बी.

असं म्हणतात की, अमिताभ बच्चन यांनी या हेमवती नंदन यांची कारकीर्द संपवली. काय असेल हे गौडबंगाल? बघुया.

हेमवती नंदन यांचा जन्म पूर्वीच्या पौरी जिल्ह्यातील बुढाणी गावात झाला. २५ एप्रिल १९१९ ला त्यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या वेळी त्यांचा संपर्क लालबहादुर शास्त्री यांच्याशी झाला आणि त्यांना राजकारणात रस वाटू लागला. तेव्हा इंग्रजांविरुद्ध चळवळ सुरू होती.

१९३६ ते १९४२ मध्ये हेमवती नंदन छात्र आंदोलनात सामील झाले. १९४२ मधील ‘भारत छोडो’ या आंदोलनातील हेमवतींच्या कामामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली.

इंग्रज सरकार त्यांना इतकं घाबरलं की, जो कोणी हेमवती यांना पकडून देईल त्याला ५००० चं इनाम दिलं जाईल अशी घोषणा केली गेली.

१ फेब्रुवारी १९४३ ला त्यांना दुर्दैवाने अटक झाली, पण १९४५ साली त्यांची सुटका झाली. नंतर पुढे १९४७ साली देश स्वतंत्र झाला.
देशस्वातंत्र्यानंतर हेमवती यूपी च्या राजकारणात भाग घेऊ लागले.

 

hn-bahuguna inmarathi
khabarkikhabar.com

१९५२ नंतर ते सतत यूपीतील काँग्रेस कमिटीचे सदस्य राहिले. राजकारण म्हणजे काही सोपं, साधं सरळ नाहीये. असं म्हणतात की सरकार ज्यांना मंत्री करत नाही, त्यांना पद दिलं जातं. १९५७ मध्ये ते पार्लमेंट्री सेक्रेटरी झाले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सरकारला परवडण्यासारखे नव्हते.

१९६३ ते १९६९ मध्ये ते यूपी काँग्रेसचे महासचिव झाले. १९६७ च्या निवडणुकीत बहुगुणांना अखिल भारतीय काँग्रेसचे महामंत्री म्हणून निवडलं गेलं.

याच वर्षी काँग्रेसमधील चरण सिंह यांनी काँग्रेस सोडलं. काँग्रेसमध्ये एकामागोमाग एक अडचणी येत गेल्या. काँग्रेस दोन भागात विभागलं गेलं.

त्रिभुवन नारायण सिंह कामराज सिंडिकेट ग्रुपमध्ये गेले. कमलापति त्रिपाठी आणि हेमवती नंदन बहुगुणा इंदिरा गांधींबरोबर गेले. मुख्यमंत्री असताना पोटनिवणडणुकीत त्रिभुवन सिंह रामकृष्ण द्विवेदी यांच्याविरुद्ध निवडणुकीत हरले.

नंतर कमला त्रिपाठी यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री केले गेले. पण पीएसीच्या बंडामुळे त्यांनाही माघार घ्यावी लागली. कमला सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप होता.

या पार्श्‍वभूमीवर एका साध्या, सरळ, माणसाची गरज होती, जो शासन व्यवस्थित सांभाळेल आणि इंदिरागांधींसमोर आवाज पण करणार नाही. मग हेमवती नंदन यांना १९७१ मध्ये खासदार बनवलं होतं, पण त्यांना अशी आशा होती की, इंदिरा गांधींना नेहमीच आपण पाठिंबा दिला आहे, तर आपल्याला नक्कीच कोणतं तरी चांगलं पद मिळेल. पण त्यांना संप्रेषण विभागात कनिष्ठ मंत्र्यांचं पदच मिळालं.

 

indira inmarathi
IndiaContent

त्या वेळी ते इतके नाराज झाले होते की, १५ दिवस त्यांनी मंत्रिपदाची सूत्रे पण स्वीकारली नाहीत. त्यामुळे इंदिरा गांधींनी रागाच्या भरात त्यांना स्वतंत्र पदभार दिला. इंदिरा गांधींना सल्ला दिला की, त्यांना यूपी चे मुख्यमंत्री करा, ते या संधीचं सोनं करतील.

कमलापति आणि हेमवती यांचे संबंध खूपच चांगले होत. हेमवती उत्तर प्रदेशचे आमदार झाले. त्यांनी यूपीतील समस्या चांगल्या प्रकारे हाताळायला सुरुवात केली. आणि सहा महिन्यांनतरच्या निवडणुकांत काँग्रेसला जिंकून दिलं.

१९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशाला जोरदार धक्का दिला, लोकं आश्‍चर्यचकित झाली, देशात त्यांनी आणीबाणी लागू केली. काँग्रसेचे अनेक नेते यामुळे चिडले, पण इंदिरा गांधींसमोर बोलण्याची कुणाचीच ताकद नव्हती.

प्रत्येकाला वाटत होते आपल्याला काहीतरी मोठे व चांगले पद मिळेल. लोकं आशेवर होती. याच दरम्यान १९७५ मध्ये हेमवतींचे आणि इंदिरागांधीचे काहीतरी खटकले आणि त्यांनी राजीनामा दिला.

यानंतर १९७७ मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा हेमवती यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या विरोधात पाऊल उचलले.

त्यांनी माजी संरक्षणमंत्री जगजीवन राम यांच्यासमवेत काँग्रेस फॉर डेमॉक्रसी पार्टीची स्थापना केली. या पक्षाला त्या निवडणुकीत २८ जागा मिळाल्या, ज्या नंतर जनता दलात विलीन झाल्या.

हेमवती यांनी आजच्या उत्तराखंडच्या चार लोकसभेच्या जागा या पक्षाच्या बॅनरखाली जिंकल्या. चौधरी चरण सिंह पंतप्रधान असताना हेमवती देशाचे अर्थमंत्री होते.

 

indira-gandhi-inmarathi02
medias.rs

हेमवतींचे चांगलेच नाव झाले होते. इंग्रजी वीकली ब्लिट्चे संपादक ज्येष्ठ पत्रकार करंजिया यांनी इंग्रजी नेत्यांसोबतच्या आयोजित चर्चासत्राला सांगितले की, हेमवती हे देशाच्या पंतप्रधानपदासाठी सक्षम आहेत.

यामुळे माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाली. या बातम्यांमुळे चिडलेल्या इंदिरा गांधी यांनी हेमवतींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी यशपाल कपूर यांच्याकडे सोपवली असं बोललं जातं.

असंही म्हटलं जातं की, यशपाल कपूर हे इंदिराजींच्या खास मर्जीतले होते. असंही म्हटलं जातं की, हे समजल्यावर चिडून हेमवती यांनी यशपाल यांचा बाड-बिस्तरा मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर फेकून दिला.

त्याच वेळी आणीबाणी विरोधी लढा जयप्रकाश नारायण यांनी सुरू केला. त्यासाठी ते लखनऊ इथे आले. हेमवतींनी पण त्यांना प्रतिकार केला नाही. उलट रेड कार्पेटमध्ये त्यांचं स्वागतच केलं.

जयप्रकाश नारायण त्यामुळे प्रभावित झाले आणि त्यांनी यूपी सरकारविरोधात एकही निदर्शन केलं नाही, पण इंदिराजी मात्र हेमवतींवर खूप संतापल्या.

 

JP and Indira Inmarathi
Satyagrah.scroll.in

 

तरीही नंतर जेव्हा जनता पार्टी विखुरली गेली. तेव्हा १९८० च्या निवडणुकीत हेमवती पुन्हा काँगेसमध्ये सामील झाले, इंदिरा गांधींनी त्यांना परत बोलावून घेतले आणि त्यांना मुख्य सरचिटणीस केले.

१९८० च्या निवडणुकांत हेमवती यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि गढवाल येथून ते विजयी झाले.

निवडणुकीनंतर केंद्रास काँग्रेसचे सरकार आले, पण हेमवती नंदन बहुगुणामंत्रिमंडळात जागा मिळाली नाही. इंदिराजींची सूड घ्यायची पद्धत वेगळीच होती. लोकांचा अपमान करून त्या बदला घ्यायच्या.

पद मिळाले नाही, म्हणून सहा महिन्यांतच हेमवती यांनी काँग्रेस पक्षासह लोकसभेचे सदस्यत्व सोडले.

१९८२ मध्ये इलाहाबादमध्ये त्यांनी पोटनिवडणूकही जिंकली होती, पण १९८४ ची निवडणूक त्यांच्यासाठी कठीण होती. राजीव गांधी यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांच्यासमोर उभे केले. तरीही हेमवती यांची राजकीय ताकद फार मोठी होती.

त्यांनी अमिताभ विरुद्ध प्रचार केला, त्याचे शब्द असे होते –

हेमवती नंदन इलाहाबाद का चंदन
दम नहीं है पंजे में, लंबू फंसा शिकंजे में
सरल नहीं संसद में आना, मारो ठुमका गाओ गाना

पण अमिताभच्या लोकप्रियतेमुळे असेल कदाचित हेमवती १ लाख ८७ हजार मतांनी पराभूत झाले. मग ते काँग्रेस सोडून लोकदलात आले, पण तेथील देवीलाल आणि शरद यादव यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे ते आतून तुटलेले होते.

 

amitabh-inmarathi

या पराभवानंतर हेमवती राजकारणातून निवृत्त झाले. पर्यावरण संरक्षणाचे काम त्यांनी सुरू केले. ३ वर्षांनंतर अमिताभ यांनी राजकारणातून संन्यास घेतला. पद सोडून दिले. आणि त्याच दरम्यानं हेमवती यांचे निधन झाले.

राजकारणापासून दूर राहिल्यामुळे ते मनातल्या मनात खचून गेले. त्यांची एक बायपास सर्जरी केली गेली होती. डॉक्टरनी त्यांना सांगितलं होतं, ‘दुसरी करण्याची गरज नाही, फक्त राजकारणापासून दूर राहा,’ तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं,

‘मी सामोसे खाण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी जन्माला आलो नाही, लागलं तर ऑपरेशन करीन, पण राजकारणापासून दूर राहणार नाही.’

पण अमिताभविरुद्धच्या पराभवामुळे ते राजकारणापासून दूर झाले आणि त्यांची राजकीय कारकीर्द संपली.  देश स्वतंत्र होण्याच्या आधीपासून ते राजकारणात सतर्क होते, पण हवं तसं यश त्यांना त्यांची कुवत असूनही मिळालं नाही हेच दुर्दैव.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?