Live Telecast करण्यामागचं तंत्रज्ञान “असं” असतं
टीव्हीवर घरी बसून एखादा कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची जी सोय उपलब्ध झाली आहे ती मनुष्य जीवनातील सर्वात उपयुक्त शोधांपैकी एक मानली गेली पाहिजे. अहो या लाईव्ह प्रक्षेपणामुळे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी घडत असलेली गोष्ट थेट घर बसल्या पाहायला मिळते. मग तो क्रिकेटचा सामना असो किंवा बातम्यांच्या वाहिन्यांवर सुरु असलेला लाईव्ह रिपोर्ट असो, जास्त कष्ट न घेतना आपल्याला जे पाहायचं आहे ते आपल्या समोर सादर केलं जातं. अश्या या लाईव्ह टेलिकास्टच्या नाविन्यपूर्ण शोधाचं तुम्हाला देखील कुतूहल असणारच!
लाईव्ह टेलिकास्ट कसं काम करतं? दुसरीकडे सुरु असणारी गोष्ट नेमकी त्याच क्षणी आपल्याला टीव्हीवर कशी काय दिसते? ही गोष्ट कोणत्या माध्यमातून सक्रिय होते? अश्या तुमच्या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत.
चला तर जाणून घेऊया लाईव्ह टेलिकास्ट शोधाबद्दल इत्यंभूत माहिती!
लाईव्ह टेलिकास्ट काम करतं खास उपग्रहांच्या (Satellites) माध्यमातून! जगाच्या एका कोपऱ्यातून संपूर्ण जगभर दृश्य रुपात संवाद साधण्यासाठी या खास उपग्रहांची निर्मिती करण्यात आली आहे. हे उपग्रह प्रत्येक देशाच्या अवकाश संशोधन केंद्रांमार्फत आकाशात सोडले जातात. या उपग्रहांमार्फत लाईव्ह टेलिकास्टचं सगळं कार्य नियंत्रित करण्यात येतं.
जगामध्ये कुठेही एखादी घटना घडली की त्याच कॅमे-याद्वारे शुटींग करून त्या कॅमे-याला जोडलेल्या खास सिस्टमद्वारे हे संदेश संबंधित उपग्रहापर्यंत विशिष्ट कोड लँग्वेजमध्ये लहरींच्या स्वरूपात पाठवले जातात. त्यानंतर आकाशात फिरत असलेले उपग्रह पृथ्वीवरून आलेल्या कोड लँग्वेज लहरींच्या स्वरूपातील संदेश दुस-या ठिकाणच्या अॅन्टिनाकडे परावर्तित करतात. या अॅन्टिनामध्ये या संदेशाचं वाचन करणा-यासाठी खास प्रणाली बसवलेली असते.
या यंत्रणेद्वारे कॅमे-याने चित्रित केलेली दृश्यं मशिनमध्ये सेव्ह झाली की त्याचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू होतं. उपग्रहांकडे पाठवले जाणारे संदेश आणि टेलिव्हिजनवर दिसणाऱ्या दृश्यांमध्ये काही सेकंदांचा फरक पडतो. याच तंत्रज्ञानामुळे आपल्याला दररोजच्या बातम्यांपासून ते खेळांच्या सामन्यापर्यंतचे सर्व कार्यक्रम थेट आपल्या घरी बसून पाहायला मिळतात.
सुलभ कम्युनिकेशनसाठी लाईव्ह टेलिकास्टचा उपयोह इतरही अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो.
जसे की अतिशय खोल समुद्रात टेहळणीसाठी तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या नौकांशी आणि पाण्याखाली असलेल्या पाणबुडयांमधील सैनिकांसोबत संवाद साधण्यासाठी लाईव्ह टेलिकास्ट सॅटेलाईट कम्युनिकेश सिस्टमचाचं वापर होतो. दररोज ऐकायला येणा-या रेडिओवर प्रसारित होणारे कार्यक्रम देखील याच उपग्रहांची देणं आहेत. सध्या बहुतांश घरांमध्ये पाहायला मिळणाऱ्या डायरेक्ट टू होम म्हणजेच डिश टी.व्ही.द्वारे वाहिन्यांची सेवा पुरवणा-या कंपन्या देखील लाइव्ह टेलिकास्ट करणा-या उपग्रहांचाचं वापर करतात.
२१ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट शोधांपैकी एक शोध म्हणून लाईव्ह टेलिकास्टकडे पाहिले जाते.
—
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.
—
Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.