तुमच्या शरिरासह मनालाही सुगंधीत करणा-या या सौंदर्यप्रसाधनाची निर्मिती नेमकी होते कशी? वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
परफ्युम म्हणजे आपल्या नट्टापट्टा करण्याच्या संचातील अविभाज्य भाग! जसं हृदयाशिवाय शरीर अपूर्ण तसं परफ्युम शिवाय नटणं अपूर्ण असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
परफ्युम तुमच्या नखशिखांत नटण्यावर हलकासा सुवासाचा साज चढवतं, जो गरजेचा आहे म्हणा आणि त्यामुळेच की काय जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत हा परफ्युम मनुष्य शरीराची सोबत करतो आणि मनुष्य देखील त्याच्या सोबतीशिवाय सौंदर्याची कल्पना करू शकत नाही.
सकाळी सकाळी अंघोळ करून बाहेर आलं की परफ्युम किंवा डिओडरण्ट वापरल्याशिवाय तयारी पूर्ण होत नाही आणि तोवर दिवसाची सुरुवात होत नाही. तर हे अतिमहत्त्वपूर्ण परफ्युम नेमके बनवले कसे जातात याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? नाही ना? चला तर मग आज जाणून घ्या.
कोणतीही गोष्ट बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे कच्चा माल! परफ्युम बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे सुवासिक पाने, फुले, झाडांच्या साली, झाडाची सुवासिक खोडे, सुवासिक वनस्पती अर्थात Herbs आणि प्राण्यांचे सुवासिक अवयव इत्यादी.
हा कच्चा माल गोळा करून त्याचा साठा केला जातो. या कच्च्या मालापासून सुवास वेगळा करण्याच्या विविध पद्धती आहेत. कच्च्या मालाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार आवश्यक ती पद्धत वापरली जाते.
उर्ध्वपतनाने अर्क काढणे (Distillation)
यात कच्चा माल एका भट्टीमध्ये (कंटेनर) टाकून त्याला उकळवलं जातं. उकळवण्यासाठी गरम वाफेचा उपयोग होतो. त्या उष्णतेने त्या कच्च्या मालातील सुगंधी द्रव्याचे बाष्प म्हणजे oil तयार होते.
मग एका नळीवाटे हे बाष्प एका बंद भांडय़ात साठवून त्याला थंड करून त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर केले जाते. हा द्रव म्हणजेच सुगंधी तेल अर्थात concentrated oil !
द्रावकामध्ये विरघळणे म्हणजे (Mixing)
पेट्रोलियमजन्य द्रावक किंवा बेंझिन असलेल्या मोठया फिरत्या भांडयात कच्चा माल टाकून तो घुसळला जातो. तो कच्चा माल त्या द्रावकात विरघळला की, एक मेणासारखा पदार्थ मागे उरतो. त्यात इथिल अल्कोहोल मिसळवले जाते व पुन्हा हे मिश्रण गरम केले जाते. त्या उष्णतेने मिश्रणातील अल्कोहोल उडून जाऊन मागे उरते सुगंधी तेल.
दाब देणं म्हणजे (Pressing)
या प्रकारात कच्च्या मालावर दाब देऊन त्यातून सुगंधी तेल काढलं जातं. अशा विविध पद्धतीने मिळालेली सुगंधी तेलं ठरावीक मापात घेऊन, त्यांच्या सुगंधाची जातकुळी ओळखून, ती एकत्रित केली जातात.
मग ही एकत्रित केलेली सुगंधी तेलं मुरवण्याची प्रक्रिया असते. त्यासाठी काही महिने वा वर्षे इतका कालावधी लागू शकतो. या सुगंधी तेलांमध्ये पुढे अल्कोहोल मिश्रित केला जातो. त्यामुळे त्याची घनता कमी होते.
अल्कोहोल मिश्रित या परफ्युममधल्या सुगंधी तेलाच्या प्रमाणानुसार त्याचे खालील वेगवेगळे प्रकार पडतात. वापरासाठी तयार होणारं ‘Finished Good परफ्युम हे तीन थरांचं असतं. त्या प्रत्येक थराला ‘नोट’ असं म्हणतात.
टॉप नोट- परफ्युम फवारताच जो गंध दरवळतो, तो! सेंट्रल वा हार्ट नोट- परफ्युम फवारल्यानंतर काही काळाने जो गंध दरवळतो, तो! बेस नोट- परफ्युम फवारल्यानंतर बराच काळ दरवळणारा गंध असतो, तो!
बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येत असेल की परफ्युम आणि डिओडरण्ट मध्ये फरक काय?
परफ्युम आणि डिओडरण्टमधला नेमका फरक म्हणजे परफ्युम हा फक्त सुगंध देणारा आहे. परफ्युममध्ये घामाचा स्त्राव रोखण्यासाठी आवश्यक असलेले काही गुणधर्म नसतात. शरीराला सुवास देणं इतकंच त्याचं कार्य!
तर शरीरातील घामाचा स्त्राव रोखण्यासाठी डिओडरण्ट काम करते. घामामध्ये असलेल्या जीवाणूंमुळे घामाला एक दुर्गंधी येते. त्या घामाचा स्त्राव रोखून त्या दरुगधापासून मुक्ती मिळवून देण्याचं काम डिओडरण्ट करतात.
त्यामुळे जिथे घाम येतो तिथे शरीरावर डिओडरण्ट फवारले जातात. बरेच डिओ हे सुगंधरहितसुद्धा असतात. त्यांचं काम घामाचा स्त्राव रोखणं इतकंच असतं.
बापरे! एवढासा परफ्युम पण तो बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते..! म्हणूनच परफ्युम इतके महाग असावेत!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.