नारळ, ‘किलर फ्रूट’ की कल्पवृक्ष? काय खरं, काय खोटं?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एक असा वृक्ष आहे की, ज्याचा आपण सर्वतोपरी उपयोग करून घेतो, म्हणूनच या वृक्षाला कल्पवृक्ष म्हणतात. अगदी बरोबर- नारळाचे झाड. नारळ हा हिंदू संस्कृतीतील अविभाज्य भाग आहे.
सण, समारंभ, जेवण, विस्तव सगळ्यासाठी आपल्याला एक वस्तू लागतेच ती म्हणजे नारळ. नारळ हे एक फळ आहे. झाडावर जो नारळ तयार होतो त्याला वरती खूप आवरण असतं. त्याला असोला नारळ म्हणतात.
तो सोलला की आपल्याला एक टणक पृष्ठभागाचं फळ दिसतं. तो सोललेला नारळ फोडला की, त्यात पाणी पण असते आणि छान चवदार खोबरं पण असतं आणि वरच्या टणक पृष्ठभागाला करवंटी असं म्हणतात.
नारळ तयार होण्याच्या आधी म्हणजे त्याच्यात खोबरं तयार होण्यापूर्वी जो काढला जातो त्याला शहाळं म्हणतात.
आजारी लोकांसाठी हे शहाळ्यातलं पाणी अतिशय उपयुक्त असतं. या नारळाच्या झाडाच्या फांद्यांचाही खूप उपयोग केला जातो.
केरसुणी बनविण्यासाठी, टोपल्या करण्यासाठी. करवंटी किंवा वरचं सोडणं याचा उपयोग जळण म्हणून केला जातो. खोबरं आपण स्वयंपाकात वापरून त्याची लज्जत वाढवतो. तसेच मोदक, सोलकडी आणि अनेक खायचे प्रकार खोबर्याशिवाय बनूच शकत नाहीत.
या वृक्षाचं इवलासा भाग सुद्धा वाया जात नाही. म्हणूनच याला कल्पवृक्ष असे म्हणतात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
जसं की प्रत्येक गोष्टीचे फायदे-तोटे असतातच तसं या नारळाच्या बाबतीत एक भीती नेहमीच असते की, नारळ डोक्यात पडला तर? कारण नारळाचे झाड उंच असते. नारळ अतिशय टणक असतो.
जर हा नारळ डोक्यात पडला तर माणसाचे काय होईल सांगता येत नाही, पण काही ठिकाणी अशीही अंधश्रद्धा आहे की, नारळ कधीच मनुष्याच्या डोक्यावर पडत नाही. पाहुया खरा काय प्रकार आहे तो.
नारळ जर झाडावरून माणसावर पडला तर पाठ, मान, खांदा आणि डोकं यावर मोठ्या प्रमाणात मार बसू शकतो. हे प्राणघातक सुद्धा होऊ शकते. कारण नारळ अतिशय टणक असतो.
१९८४ मध्ये नारळ गळून पडण्यामुळे होणार्या मृत्यूबद्दल खूप अफवा पसरवल्या गेल्या. शहरी आख्यायिकेनुसार नारळ डोक्यात पडून वर्षातून काही लोकांचे मृत्यू होतात.
२००२ मध्ये शार्क हल्ल्यानंतर या दंतकथेला वेग आला. असे म्हटले गेले की, दरवर्षी संपूर्ण जगातील एकूण १५० लोकं नारळ डोक्यावर पडून मृत्यू पावतात. शार्कच्या हल्ल्यांपेक्षाही हा आकडा खूप जास्त आहे असे नमूद केले गेले.
कारण शार्क हल्ल्यातून दरवर्षी मरण पावणार्यांची संख्या फक्त ५ आहे.
गुरुत्वाकर्षणामुळे नारळामुळे मृत्युमुखी होणार्या धोक्याविषयी चिंता व्यक्त केल्यामुळे २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड या ऑस्ट्रेलियातील स्थानिक अधिकार्यांनी नारळाची झाडे समुद्रकिनार्यावरून काढून टाकली.
–
- शहाळ्याच्या पाण्याचे हे “सर्वात मोठे” फायदे आपल्याला माहीतच नसतात!
- हिंदू संस्कृतीत महिलांना नारळ का फोडू देत नाहीत? ही कारणं जाणून घ्या…
–
एका वृत्तपत्राने नारळाला ‘किलर फळ’ असे संबोधले. ज्याला आपण कल्पवृक्ष म्हणतो. दुसर्या महायुद्धात नारळाने प्राणघातक भूमिका देखील निभावली होती.
प्रकाशित केलेल्या अहवालानुसार जपानी सैन्याने उष्णकटिबंधीय फळांना अॅसिड आणि हँड गे्रनेडने भरले आणि ‘नारळ बाँब’ तयार केले.
नारळाचे झाड अतीव उंच असते. जास्तीत जास्त ९८ फूट इतके उंच नारळाचे झाड असू शकते. एका परिपक्व नारळाच्या झाडाकडून दरवर्षी ७५ नारळ मिळू शकतात. एका नारळाचे वजन १.४४ किलो इतके असते.
साधारणपणे ८० देशांत नारळाची झाडं लावली जातात. दरवर्षी एकूण उत्पादन होतं ६१ मिलिअन टन.
खरं तर नारळामुळे मृत्यू होतो ही आख्यायिका १९८४ साली डॉक्टर पीटर बार्स यांच्या ‘नारळ पडल्यामुळे होणारा अपघात’ या लेखामुळे पसरली. हा लेख ट्रॉमाच्या जरनलमध्ये प्रकाशित झाला. या लेखात त्यांनी पापुआ न्यू गिनी येथे केलेलं निरीक्षण लिहिलं होतं.
चार वर्षे कालावधीत नारळ पडून जखमी झालेल्या कमीत कमी दोन माणसांचा मृत्यू झाला होता. पण चुकून ती संख्या १५० अशी पसरली. त्यामुळे लोकांची अशी विचारधारणा झाली की, इतर ठिकाणीही नारळ डोक्यात पडून मृत्यू होतो.
मार्च २०१२ मध्ये बार्स यांना ‘आयजी नोबेल पुरस्कार’ मिळाला. संशोधनाच्या मान्यतेनुसार सुधारित संशोधनाची पुनरावृत्ती होऊ शकत नाही.
या संशयास्पद आकडेवारीवर बार्सने कॅनेडियन मेडिकल असोशिएशनला सांगितले की, ‘जर असे अपघात झाले तर ते भयानक आहेत.
ही काही मजा नाही.’ बार्सच्या या लेखाच्या प्रकाशनानंतर नारळामुळे झालेल्या मृत्यूच्या दंतकथेची बातमी सर्वत्र पसरली. वृत्तपत्रांच्या कथांमुळे शेवटी लोकांना समज दिली गेली ती शहरी दंतकथा आहे.
आणखी एक लेखक जोएल बेस्ट यांनी पसरलेल्या मृत्यूंच्या दाव्याचे समकालीन पौराणिक कथा असे स्पष्टीकरण केले. क्लब ट्रॅव्हल या युके मधील ट्रॅव्हल विमा कंपनीने अर्बन लेजंड पसरण्यास मदत व्हावी म्हणून शार्क रिसर्च इन्स्टिट्यूटचा एक अॅनालिसीस प्रेस समोर आणला.
पपुआ न्यू ज्युनिया येथील लोकांच्या ट्रॅवलिमग मध्ये ट्रॅव्हल विमाचा खप व्हावा या हेतूने प्रेस रिलीज मध्ये नमूद केले होते की नारळ शार्कपेक्षा दहापटीने धोकादायक आहेत.
२००२ मध्ये आंतरराष्ट्रीय शार्क अटॅक फाईल चे डायरेक्टर जॉर्ज बर्गेस यांनी दरवर्षी नारळ पडल्याने जगभरात १५० लोकं मरतात’ हे सांगितल्याने लेजंडला नवी गती मिळाली.
नारळाविषयी काहीही अफवा पसरविल्या जात आहेत. मार्च २००३ मध्ये अशी पेनिसेल्व्हेयाने अहवाल दिला की, ‘‘शार्कच्या हल्ल्याने झालेल्या मृत्यूच्या तुलनेत नारळ पडल्यामुळे झालेला मृत्यूची शक्यता जास्त आहे.
२००१ मध्येही असाच रिपोर्ट केला गेला आहे की, शार्कच्या हल्ल्यापेक्षा नारळाचे झाड कोसळल्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे.
नोव्हेंबर २०१० मध्ये गार्डियनने वृत्त दिलं होतं की ओबामा जेव्हा भारत भेटीला आले तेव्हा मुंबईच्या गांधी मैदानातून नारळ काढून घेण्यात आले.
यासाठी बार्सचा अहवाल दिला गेला होता. त्यामुळे ओबामा यांची भेट नारळाच्या आघाताविना पार पडली. नारळ झाडावरून पडल्यामुळे मृत्यू होतो की, नारळ शस्त्र म्हणून वापरले गेल्याने मृत्यू होतो हेही विचार करण्यासारखं आहे.
एप्रिल १९९२ मध्ये मलेशियामध्ये ८१ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला नारळाच्या झाडाखाली ठार मारण्यात आले. त्याच्या कुटुबियांनी नमूद केले की तो ‘नारळ फोडणारा’ म्हणून कामावर ठेवला होता. यापूर्वी तो नारळाच्या झाडाच्या खाली बचावला होता, पण या वेळी मृत्यू झाला.
अशी अनेक उदाहरणे आहेत की नारळाचा शस्त्र म्हणून वापर करण्यात आला.
नारळ पडल्यामुळे होणारे मृत्यू आणि जखम कायदेशीर कारवाईचा विषय बनला आहे. ज्याच्या मालकीचे झाड असते त्याच्यावर दावा दाखल केला जाऊ शकतो.
१९६६ मध्ये मियामी शहरातील एका महिलेला नारळाच्या झाडामुळे दुखापत झाली तेव्हा ते झाड जिच्या मालकीचं होतं त्या महिलेला ३०० डॉलर नुकसान भरपाई द्यावी लागली. वकिलांनी असा दावा केला की, आपल्या झाडाचा धोका मालकाने लक्षात घेतला पाहिजे.
‘जेव्हा ते झाड तपकिरी होईल तेव्हा ते कोसळणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.’ १९७७ मध्ये एका पोलीस अधिकार्यावर फुटपाथवरून चालताना नारळ पडला होता. वृक्षांची देखभाल करण्यास मालक अपयशी ठरला आहे असा दावा केला होता.
तर मंडळी, असे काही अपवाद आहेत, पण तरीही आपल्या हिंदू संस्कृतीत नारळाला फार महत्त्व आहे. कोणत्याही देवाची पूजा नारळाशिवाय पुरी होऊच शकत नाही. शुभ कार्याचे प्रतीक नारळ हेच आहे.
रोज असंख्य नारळाचा वापर आपल्याकडे होतो आणि शिवाय नारळामुळे अपघात झाल्याचा किंवा माणूस मृत्युमुखी पावल्याचा प्रकार आपल्या देशात तरी फार कमी आहे. आणि शेवट तो एक अपघात आहे.
मंडळी, कशामुळेही अपघात होऊ शकतो, मग आपण घाबरून घरातच बसावं लागेल, पण कधीतरी घरातील एखादी वस्तूसुद्धा आपल्या अंगावर पडू शकते, गाडी चालवताना अपघात होऊ शकतो.
रस्त्यावर आपण पडू शकतो, शेवटी आपण कितीही पुढे गेलो तरी जे आपल्या नशिबात लिहिलंय ते टळणार नाही. तेव्हा असल्या दंतकथांना बळी न पडता आहे ते आयुष्य मजेत जगणे हेच उत्तम.
हा एक मात्र नक्की ज्यांच्याकडे नारळाचे झाड आहे त्यांनी वेळोवेळी त्याची मशागत करणे, नारळ योग्य वेळी काढून घेणे आवश्यक आहे. कोणतेही वृक्ष जर कमजोर झाले असतील त्यासाठी योग्य तो निर्णय घेऊन लोकांचं व आपलं नुकसान टाळणं योग्य.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.