सह्याद्रीचं मोहक रूप अनुभवायचं असेल, तर हे ८ किल्ले पावसाळ्यात फिरायलाच हवेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पावसाळा सुरू झाला की, एका वेगळाच उत्साह आपल्या अंगात संचारतो आणि एका चर्चेला सुरुवात होते ती म्हणजे पावसाळी सहल.
वर्षभरात कुठेही गेलो नाही तरी चालेल, पण पाऊस सुरू झाला की, मस्त पावसात भिजावं, धबधबा पाहायला जावा, गड चढावा असं वाटू लागतं.
पावसामुळे निसर्गसौंदर्य खुलून दिसत असतं. उन्हाने निस्तेज झालेली झाडं टवटवीत आणि हिरवीगार झालेली असतात, पावसाच्या सरी कोसळत असतात. भजी, वडे, कणसं यांचे खमंग वास नाकात शिरतात. जोडीला वाफाळलेला चहा असला तर काय भारीच.
पाऊस पडत असतो आणि वातावरण प्रफुल्ल असतं, सगळीकडे हिरवेगार वातावरण असतं, धबधबे वाहत असतात.
या सिझनमध्ये ट्रेक करायला पण भारी मजा येते. ट्रेकवर सर्वांत उचांवर जाऊन ढग पाहणे, ढग जणू आपल्या हाताशी आले आहेत असंच वाटतं. त्यात धुकं पण असतं. मग असं मनोहर दृश्य दिसतं की बघतच राहावं असं वाटतं.
सह्याद्रीचं रौद्ररूप बघायचं असेल अनुभवायचं असेल तर महाराष्ट्रातील या किल्ल्यांवर तुम्हाला गेलंच पाहिजे. धाडस आणि आपल्यातील शक्ती अजमावायची हीच तर वेळ आहे.
तर अशा या पावसाळी ट्रीपसाठी आपण जायचं असं ठरवतो, पण आयत्या वेळी कुठे जायचं ही ठिकाणंच लक्षात येत नाहीत किंवा त्याची माहिती नसते.
मग कुठे जायचं कुठे जायचं म्हणत काही ठिकाणच ठरत नाही आणि ट्रीप हमखास कॅन्सल होते तर तसं होऊ नये म्हणून खास पावसाळी ट्रीपसाठी कोणत्या किल्ल्यावर तुम्ही जाऊ शकता याची माहिती देण्यासाठी हा लेख..
१. राजमाची :
पावसाळ्यात राजमाची हा एक चांगला किल्ला आहे. लोणावळा येथून बाहेर पडल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी १८ कि.मी. अंतरावरून एक कच्चा रस्ता आहे. एक गोष्ट आहे की या रस्त्यावर फक्त बाईक किंवा मोठ्या गाड्याच जाऊ शकतात.
हा रस्ता तसा अवघड आहे. तुम्हाला जर स्वत:बद्दल खात्री असेल तरच या रस्त्याने जा. नाहीतर तुम्ही तुमचं स्वत:चं वाहन तिथेच लावून पायथ्यापर्यंत चालत जाऊ शकता.
मोठा धबधबा, किल्ल्याच्या सभोवती असणारी सगळीकडे हिरवीगार झाडे तुम्हाला आनंद देऊन जातात आणि स्वच्छ हवा, मोकळा श्वास याचा आनंद घेता येतो.
२. हरिश्चंद्र गड :
हरिश्चंद्रगड हा पावसाळी खडतर ट्रेक करणार्या लोकांसाठी छान आहे, त्यांना आनंद देणारा आहे. या किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम हंगाम हिवाळा असतो, परंतु पावसाळ्यात तिकडे जाण्याचा फायदा म्हणजे निसर्गसौंदर्य.
तिथून अप्रतिम निसर्गसौंदर्य दिसतं. किल्ल्यावर बर्याच गुहा आहेत. ज्यामध्ये आपण पावसाळ्यात निवारा घेऊ शकतो.
गुहेतून पाऊस बघण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. म्हणूनच जर पावसाळ्यात काहीतरी आगळंवेगळं करायचं असेल तर हरिश्चंद्र गडावर जायला हरकत नाही.
३. सिंहगड :
ज्यांना खडतर ट्रेक करायचा नसतो, पण ट्रेकींगचा अनुभवही घ्यायचा असतो. त्यांच्यासाठी सिंहगडची शिफारस केली जाते. सिंहगड चढायला तसा सोपा आहे. हिवाळा आणि पावसाळा हे दोन्ही ऋतू सिंहगडला भेट देण्यासाठी चांगले आहेत.
इथलं वातावरण पावसात खूपच छान असतं, खाण्यापिण्याची पण रेलचेल असते या गडावर. भजी, पिठलं-भाकरी गडावर खूप छान मिळतं.
पण पावसाच्या हंगामात शनिवार, रविवारी हा किल्ला भरलेला असतो. कदाचित तुम्ही ट्रॅफिकमध्येही अडकू शकता. त्यामुळे शक्यतो अधल्या-मधल्या वारी जाणे उत्तम.
४. लोहगड- पुणे
लोहगड आणि विसापूर हे दोन किल्ले लोणावळ्याजवळ आहेत. लोणावळा हे एक खूप सुंदर ठिकाण आहे पावसाळ्यात त्याचं सौंदर्य फारच छान दिसतं.
लोहगडवरून आपल्याला विलक्षण दृश्य पाहायला मिळतात कारण त्याची रचनाच सुंदर आहे.
तिथली मक्याची कणसे खूपच छान असतात. आणि येथे पार्किंगलापण जागा आहे, म्हणून दुचाकी किंवा चारचाकी नेली तरी काही प्रॉब्लेम नाही.
५. राजगड
येथे ट्रेेकिंगसाठी मान्सूनचा हंगाम हाच योग्य काळ आहे. आसपासच्या सुंदर दृश्यांमुळे, दरी-खोर्यांमुळे सगळ्यात वर पोहोचल्यानंतर जो काही आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे.
पावसात वर चढून दमल्यावर भजी, पिठलं, भाकरी खाण्यात तुम्हाला असा स्वर्गीय आनंद मिळेल की जो पंचतारांकित हॉटेल्सच्या जेवणातही मिळणार नाही.
या किल्ल्यावर शिबिरे ठेवता येतात आणि पावसाळ्यात मंदिरे चांगला आश्रय देतात.
६. तोरणा :
तोरणा हा किल्ला चढायला अवघड आहे. जे लोक नव्याने ट्रेक करत आहेत त्यांच्यासाठी हा किल्ला नाही. तोरणाच्या वरच्या भागाकडे जाणे जरा कठीण आहे त्यासाठी भरपूर सामर्थ्य आवश्यक आहे.
ट्रेकिंग करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण काही ठरावीक ठिकाणे अशी आहेत की जिथे पडलात तर मोठ्या प्रमाणावर दुखापत होऊ शकते.
पावसाळ्यादरम्यान आपणास भरपूर धबधबा दिसतील आणि त्यापैकी एक ट्रेक मार्गावर आहे. इथे शिबिर वगैरे घ्यायचे असेल तर कॅम्पिंग सामुग्री घेणे आवश्यक आहे. कारण किल्ल्यावर नैसर्गिक आश्रय नाही.
किल्ल्यावर एक मंदिर आहे, परंतु त्या मंदिराचे छत चांगल्या स्थितीत नाही. पण जर पावसाळ्यात खडतर पर्वतारोहण अनुभवण्याची इच्छा असेल तर पुण्याभोवती तोरणा हा सर्वांत चांगला किल्ला आहे.
७. कुलाबा किल्ला, अलिबाग :
कुलाबा किल्ला हा भारतातील काही पुरातन लष्करी तटबंद्यांपैकी एक आहे. अलिबागच्या समुद्र किनार्यापासून एक ते दोन किमी इतक्या कमी अंतरावर हा किल्ला आहे.
दक्षिण मुंबईपासून फक्त ३५ किमी असल्यामुळे प्रवासी लोकांसाठी हे एक खास आकर्षण आहे. जवळच असलेला समुद्र किनारा याच्या सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे पावसाळ्यात याची शोभा अजूनच वाढते.
८. घनगड :
हा एक किल्ला आहे ज्याचा शोध नव्यानेच लागला आहे. ताम्हिणी घाटाच्या मध्यभागी असलेल्या सर्वांत सुंदर किल्ल्यांपैकी हा एक आहे हे कोणीही मान्य करेल.
घनगड मध्यम पातळीवरील ट्रेकिंग अनुभव देते. पावसाळ्यात देखील इथलं वातावरण सुंदर असेल यात शंकाच नाही.
असे हे किल्ले आहेत, की जे आपण पावसाळ्यात ट्रेकसाठी जाऊ शकतो व एक थरारक अनुभव घेऊ शकतो. मोकळा भणभणता वारा, पावसाची भुरभुर आणि धुकं यांचा आनंद मनात साठवून घेतल्याने वर्षभर एनर्जी मिळते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.