' भाजपला टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जी आणताहेत माओवाद्यांची फौज – InMarathi

भाजपला टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जी आणताहेत माओवाद्यांची फौज

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

गेल्या काही दिवसांपासून म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुका झाल्यापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच विचलित झालेल्या आपल्याला रोजच्या बातम्यांमध्ये पाहायला मिळत आहेत.

हे राजकारण आहे, का दुसरं काही कारण आहे, का निष्कारण तापलेलं वातावरण आहे हे न कळायला आता भारतीय नागरिक काही इतके मागास राहिलेले नाहीत.

सत्ताकारण हे एकमेव कारण आहे हे गेल्या पाच वर्षात भारतभर आपल्याला पाहायला मिळाले आहे. इतके वर्ष मनमुराद सत्ता उपभोगलेल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची सत्तेची आसक्ती आपल्याला पाहायला मिळाली.

सत्तेसाठी वेगवेगळ्या थराला जाऊन आरोप, प्रत्यारोप करून केवळ मोदी सरकार ला प्रचंड विरोध करून पुन्हा तीच सत्ता मिळवण्याचे प्रयत्न ह्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसले.

अतिशय खालच्या दर्जाचे आरोप केले गेले, की ज्यामुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही.

 

fight for election
India Today

जनतेला भडकावून अनेक ठिकाणी दंगली घडवून आणल्या गेल्या, जाती जातीत तेढ निर्माण करून भांडणे निर्माण केली गेली. सगळ्यात मोठी गोष्ट ह्या निवडणुकीमध्ये दिसून आली की सगळेच विरोधी पक्ष एकत्र येऊन मोदी सरकार ला प्रचंड विरोध केला गेला.

गठबंधन, महा गठबंधन अशी नावे दिली गेली, सर्व शक्ती एकवटून सगळ्या पक्षांनी मोदी सरकारला न भूतो न भविष्यती असा विरोध केला.

हे गठबंधन करण्याचं काम ममता बॅनर्जी ह्यांनी पुढाकार घेऊन केलं, पण प्रत्येक पक्षात काहीतरी उणीव आहेच हे कळल्यावर ह्या गठबंधनातून काही पक्षांनी काढता पाय घेतला.

 

Modiji
WION

त्यामुळे बऱ्याच नेत्यांना त्यांच्याच अस्तित्वाची भीती वाटायला लागली, त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची तुलना व्हायला लागली, आणि ती भीती आता इर्षे मध्ये बदलली जायला लागली आहे.

आपली उरली सुरली सत्ता गेली तर आपली परिस्थिती काय होईल ह्याची दिवसा ढवळ्या स्वप्न डोळ्यासमोर दिसायला लागली. कारण हा सत्ता बदल अनेक वर्षांनी झाला. ह्या सत्ताबदलापूर्वी त्याच नेत्यांनी मनमुराद सत्ता भोगली होती.

आता त्या सत्तेला सुरुंग लागत चालले आहेत म्हणून मोदी सरकार पुन्हा येऊ नये यासाठी सगळ्यांचीच मोठी धडपड चालली होती.

लोकशाही आहे म्हणून जनतेला आता जाब द्यावा लागणार ह्याची सुद्धा भीती त्यांना आता वाटते आहे.

कोणत्याही थराला जाऊन मोदी सरकार आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाला विरोध करून सत्ता टिकवायची हाच हेतू आता शिल्लक राहिला आहे. राज्याची प्रगती, समस्या, जनतेचे प्रश्न , वगैरे सगळे बाजूला ठेऊन फक्त सत्ता वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत.

पश्चिम बंगालमध्ये तर मोदी सरकारने मोठी मुसंडी मारली आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्यांची मोठी पंचाइत झाली.

 

Mamata Banergi
CT

निवडणुकीनंतर त्या जास्तच अस्वस्थ झाल्या आणि त्यांच्या समर्थकांकडून भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ले चढवले, अनेक कार्यकर्त्यांचा मृत्यूही झाला, पण भाजप ची घोडदौड चालूच आहे , अनेक तृणमूल काँग्रेस चे नेते भाजप मध्ये सामील झाले.

ममता दीदी आणखीच अस्वस्थ झाल्यात. आता त्यांनी , भाजप ला टक्कर देण्यासाठी देश विरोधी कारवाया करणारे माओ वादी लोकांशी हातमिळवणी करायला सुरुवात केली असं काही मीडिया च्या मार्फत बातम्या येत आहेत.

म्हणजे ह्या आता देश विरोधी कारवायांच असणार ह्यात काही वेगळं सांगायला नकोच.

मिदनापूर, पुरुलिया, झाडग्राम, ह्या भागात माओवादी कार्यरत आहेत आणि त्यांच्या नेत्यांशी बोलणी करून ममता बॅनर्जी माओवाद्यांची एक फौज तयार करून भाजप च्या पश्चिम बंगाल मधल्या कार्यकर्त्यांना टक्कर देणार म्हणे.

आणखी काही कट्टरवादी लोकांशी लढणाऱ्या काही लोकांशी पण मैत्री करून त्या भागात तृणमूल ची दहशत निर्माण करणार असे ऐकले जाते.

पण हे सगळे सत्ता टिकवण्यासाठी करण्याची वेळ तृणमूल काँग्रेसवर आली, कारण त्यांनी सरळ मार्गाने सत्ता मिळवली नाही म्हणून दहशत निर्माण करून सत्ता टिकवणे भाग पडते आहे.

कदाचित ही अस्तित्वाची लढाई लढावी लागेल ह्या चिंतेने ग्रासून ममता बॅनर्जी यांना हे पाऊल उचलावे असे वाटले असेल. पण इथे जनतेला काय हवं आहे ह्याचा विचार नाही, म्हणून भाजपला तिथे एवढं यश मिळालं, आणि जनतेनेच तृणमूल ची सत्ता नाकारायला सुरुवात केली असं म्हणता येईल.

 

BJP
Jansatta

तृणमूल च्या एका नेत्याने म्हणजे अजित मैत्री ह्या नेत्याने सांगितले की भाजप सारख्या पलटण तयार करणाऱ्या पक्षाबरोबर टक्कर देण्यासाठी आम्हाला ही अशी माओवादी, आणि इतर लोकांची पलटण बनवायलाच पाहिजे.

कारण भाजप ने आमच्या बऱ्याच भागात घुसून आदिवासी लोकांना फसवून सत्ता बळकवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून आम्ही माओवादी लोकांना साथीला घेऊन भाजप ला आता टक्कर देणार आहोत.

म्हणजे तृणमूल काँग्रेस विघातक मार्गानेच सत्ता टिकवणार हा त्याचा अर्थ असेल तर जनता निश्चित सत्तापालट करेल आणि जनतेला जे पाहिजे ते सरकार सत्तेवर येईल.

विनाश काळ आला की अशी बुद्धी सुचते हे गेल्या काही वर्षात आपण बघितलंय.

अनेक राज्यातले मी मी म्हणणारे दिग्गज त्यांचं अस्तित्वच घालवून बसलेत. देव ह्या लोकांना सुबुद्धी देवो अशी आशा तरी आपण करू शकतो. बाकी दुसरं काही बोलण्यासारखं राहिलं नाही. आता ममता आणि त्यांचं नशीब.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?