भारतात गांजाचं पहिलं संग्रहालय तयार होतंय! तिथे नक्की काय असणार? वाचा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
राजस्थानात होतंय गांजाचं संग्रहालय…. आश्चर्य वाटलं ना वाचून? कारण गांजा घेणाऱ्या माणसांना गांजेकस…नशेडी…गांजेडी अशा बिरुदावल्या दिल्या जातात. याच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे.
कुणी सापडलाच गांजा घेताना तर त्याला तुरुंगात हवा खायला पाठवतात.
परदेशात तर मृत्यूदंडाची शिक्षा आहे या अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी. आपल्याकडे त्याच गांजाचं संग्रहालय…??? होय. हे सत्य आहे. अगदी शंकराला सुध्दा गांजा लागतो..
पूर्वापार चालत आलेल्या किती प्रथा ज्यात मृतदेहासोबत गांजा अफू असे नशिले पदार्थ सुद्धा ठेवले जात अस हे इतिहासात वाचायला भारी वाटत होतं…पण गांजाचं संग्रहालय!!!
कुठलीही गोष्ट विनाकारण नसते.
जर कृषी संशोधन केंद्र त्यात लक्ष घालत असेल तर समजून घ्या की काहीतरी महत्त्वाचं कारण आहे. नाहीतर जो गांजा निषिद्ध आहे आपल्या समाजात त्याचं संग्रहालय का उभं करतील ना?
पाहूया त्याचं कारण-
राजस्थान कृषी संशोधन केंद्र दुर्गापूर यांनी हे पहीलं अनोखं संग्रहालय उभारायचं ठरवलं आहे.
याचं कारण असं की.. गांजाची जी वाणं जतन करुन ठेवलेली आहेत ती सर्वसामान्य लोकांना पहायला मिळावीत आणि लोकांना ते पाहून पिकांच्या सुरक्षेच्या कृषी अधिकारी शास्त्रीय नांवाने.
दृष्टीने जाणिव व्हावी. कारण गांजा हा तणासारखा आहे. जो फार जलद वाढतो आणि जमिनीचा कस आणि पिकांतील जीवनरस शोषून घेऊन वाढतो. याचा परिणाम उत्पादनावर विपरीत होतो आणि जमिनीचा पोत बिघडतो.
हर्बेरीयमच्या म्हणजे सुकवलेल्या वनस्पतींची खोकी तयार करुन त्यात ही गांजाची वाणं ठेवली आहेत. त्याचप्रमाणे तक्ते तयार करुन त्यावर खरीप हंगामातील, रब्बी हंगामातील घेतली जाणारी पिके.
त्याच बरोबरीने त्यांच्या समवेत वाढून पिकांचं नुकसान करणाऱ्या गांजाच्या धोकादायक जाती ज्या त्या पिकांसाठी हानिकारक आहेत, या लोकांना माहिती व्हायला हव्यात.
कारण अजमेर,दौसा, जयपुर या भागात येणाऱ्या पिकांची नासाडी करणारी गांजाची वाणं ठेवली आहेत. जे तक्ते तयार केले आहेत त्यावर गांजाच्या झाडांची आकृती काढून गांजाची प्राथमिक माहिती लिहिली आहे.
आपल्याकडं जसं गाजर गवत म्हणजेच काॅन्ग्रेसनं उच्छाद मांडला होता तसंच राजस्थानात ही एक समस्या आहे.
गांजा ही तेथील शेतकऱ्यांसाठी असलेली बारमाही समस्या आहे. पिकांच्या बरोबरीने हे वाढतो आणि जमिन आणि पीक दोन्हींचे नुकसान करतो.जमिनीचा कस तर ही तणकटं खातातच शिवाय पिकं नीट येत नाहीत ते आणि वेगळेच.
त्यासाठी वेळोवेळी शेतकरी प्रयत्न करतात पण त्याचा फारसा उपयोग होत नाही हे दिसून आले आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे गांजाची ओळख न करता येणं.
हे गांजाचं तण ओळखताच येत नसल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही आणि अर्थातच त्याचा परिणाम पिकांवर आणि जमिनीचा पोत बिघडण्यावर होतो.
यात दुसरी अडचण अशी आहे की शेतकरी या गांजाच्या तणाला त्यांच्या बोली भाषेत जे नांव आहे त्याने ओळखतात तर कृषी अधिकारी शास्त्रीय नांवाने!!!
राजस्थान कृषी संशोधन केंद्र दुर्गापूर येथे कृषीशास्त्र शिकवणारे प्रोफेसर श्री. सुरेंद्र सिंह यांनी सांगितले, ” या काळात शेतीलाही विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आहे. तापमान वाढ त्यामुळे पिकांची लागवड आणि उत्पादन समस्या समोर आहेच.
टिकाऊ वाण विकसित करणं ही सुद्धा एक समस्या आहे.तापमानवाढीचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतच आहे शिवाय या गांजाच्या धोकादायक नव्या प्रजाती तयार होऊ लागल्या आहेत. त्यांची अजूनही ओळख पटली नाही.
हे एक नवं आव्हान समोर आलं आहे. या संग्रहालयामुळे शेतकऱ्यांना जागृत करायचं काम आम्ही सुरु केलं आहे. जयपूरच्या आसपास अजून अशी संग्रहालयं तयार करायचा त्यांचा संकल्प आहे.
श्वेता गुप्ता या त्याच कृषी संशोधन केंद्रामध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करतात. त्या म्हणतात या विविध प्रजातींचं संशोधन करणं आणि वर्गिकरण करणं हे फार किचकट आणि वेळखाऊ काम आहे.
१०० वाणांचे नमुने गोळा करायला त्यांना दिड वर्ष लागलं.
हे वाण शोधल्यानंतर हर्बेरीयममध्ये त्याचं जतन करायला आठ ते दहा दिवस लागतात. कधीकधी आर्द्रता जास्त प्रमाणात असली की ही वाणं कुजून जातात किंवा त्याला बुरशी लागते आणि ते खराब होतात.
मग पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते.असे प्रयत्न करुन हे सारं जमवून आणलं आहे.
आता पुढच्या महिन्यात हे गांजाचं संग्रहालय लोकांसाठी खुलं केलं जाणार आहे.
कीड नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याचवेळी हा गांजा जो पिकांची नासाडी होण्यासाठी कारणीभूत आहे त्याचं उच्चाटन करुन जनजागृती व्हावी यासाठी हे आगळंवेगळं संग्रहालय सुरु केलं जाणार आहे.
खरोखरच आपल्या देशाला अशाच संशोधकांची गरज आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती!
हे जनकल्याणाचं असं वेगळं कार्य करणारे संशोधक म्हणजे आधुनिक संतच! मानव्याचा विचार करुन त्यांनी चालू केलेलं हे काम जनसेवा हीच ईश्वरसेवा हाच मंत्र सांगतं!!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.