' कुप्रसिद्ध गुन्हेगारांसाठीच्या दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या जेलबद्दलची रंजक माहिती… – InMarathi

कुप्रसिद्ध गुन्हेगारांसाठीच्या दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या जेलबद्दलची रंजक माहिती…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नाव ऐकूनसुद्धा गुन्हेगारांना घाम फुटतो अशा ‘तिहार जेलच्या’ काही रंजक गोष्टी!

जेल म्हटलं की आपल्याला शोलेमधलं जेल, कैदी आणि तो ‘अंग्रेज के ज़माने का जेलर’ आठवतोच, इतकं आपल्या मनावर सिनेमातल्या तुरुंगाने गारुड केलं गेलं आहे!

पण नेमका तुरुंग हा असाच असतो का?? तर नाही .. खरा तुरुंग हा सिनेमातल्या नकली तुरुंगापेक्षा खूप वेगळा आणि भयावह असतो!

कारण ती जागा अट्टल गुन्हेगारांसाठी असते त्यामुळे सिनेमात जे दाखवतात त्यातल्या फार कमी गोष्टी खऱ्या तुरुंगात पाहायला मिळत नाही!

 

sholay jail inmarathi

==

हे ही वाचा – अमाप संपत्ती ते स्वतःचा खास तुरुंग : विचित्र कृत्यांमुळे या ‘किंग ऑफ कोकेन’चं आयुष्य रहस्यच आहे

==

आज आपण अशाच एका सर्वात मोठ्या तुरुंगाविषयी माहिती घेणार आहोत! ते म्हणजे ‘तिहार जेल’!

तिहार जेल कोणाला माहित नाही? लहानपणापासून आपण तिहार जेलचं नाव वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीवर पाहत आलोय. त्यामुळे या जेलच्या भल्या मोठ्या भिंतीआडचं जीवन नक्की कसं असेल हे जाणून घेण्याची इच्छा आपल्या सर्वांचीच आहे.

या जेलमध्ये मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना, कुप्रसिद्ध व्यक्तींना डांबून ठेवतात म्हणे आणि याच गोष्टींमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला या तिहार जेलचं भारी अप्रूप!

अश्या या प्रसिद्ध तिहार जेलबद्दल काही अश्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या बहुतांश लोकांना माहित नाहीत. चला जास्त वेळ न लांबवता जाणून घेऊन तिहार जेलबद्दल काही रंजक गोष्टी!

तिहार जेलला तिहार आश्रम या नावाने देखील ओळखले जाते. दिल्लीच्या चाणक्यपुरीपासून ७ किमी अंतरावर तिहारा गाव स्थित आहे. तिहार जेल हे दक्षिण आशियामधील सर्वात मोठे जेल आहे हे विशेष!

 

tihar jail inmarathi

 

तिहार जेलमध्ये कैद्यांना डांबण्याची सुरुवात १९५७ सालापासून झाली. १९८४ साली तिहार जेलच्या आसपासचा परिसर देखील तिहार जेलशी जोडण्यात आला आणि संपूर्ण कॉम्पलेक्सला ‘तिहार जेल’ असे नाव देण्यात आले.

सध्या तिहार जेल हे दिल्ली कारागृह डिपार्टमेंटतर्फे चालवले जाते. या कारागृहाच्या आता ९ राष्ट्रीय कारागृह आहेत आणि हे दिल्ली क्षेत्रामधील दोन कारागृहांपैकी एक आहे. दुसरे एक जिल्हा कारागृह आहे ज्याला रोहिणी कारागृह कॉम्पलेक्स म्हणून ओळखले जाते.

 

tihar-jail-marathipizza02

 

कधी काळी किरण बेदी यांनी तिहार जेलच्या इन्स्पेक्टर जनरल म्हणून काम पहिले होते आणि त्यांच्या काळात त्यांनी तिहार जेलचे स्वरूप आणि नशीब दोन्ही पालटले होते.

त्यांनी तिहार जेलच्या आत विपश्यना करण्यास सुरुवात केली आणि त्याचे सुरुवातीचे वर्ग जी.ऐन. गोयंका यांनी घेतले होते. अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तिहार जेलमध्ये राहून एक कैद्याने आयपीएस परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली होती.

 

kiran-bedi inmarathi

 

२०१९ मध्ये एका घोटाळ्यामुळे आपल्या देशाचे भूतपूर्व अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना देखील तिहार जेलचा कारावास काही काळ भोगावा लागला होता, आणि त्यानंतर त्यांना जामिनावर सोडले सुद्धा गेले होते!

 

p chidambaram inmarathi

 

तिहार जेलमध्ये ६,२५० कैद्यांना ठेवण्याची सुविधा आहे. परंतु विद्यमान अहवालानुसार येथे जवळपास १४००० कैदी आहेत, जे अगदी दाटीवाटीने येथे आपली शिक्षा भोगत आहेत.

तिहार जेल हे कारागृह नसून ती मानवी वृत्ती बदलण्याची एक संस्था आहे असे तेथील प्रशासन सांगते. या जेलचा मुख्य उद्देश आहे कैद्यांना पुन्हा माणसात आणणे.

त्यांना नव्या जीवनाची सुरुवात करण्यास प्रोत्साहन देणे. कित्येक हाय प्रोफाईल गुन्हेगारांना त्यांच्या ट्रायल दरम्यान तिहार जेलमध्ये ठेवले जाते. परंतु त्यांना वेगळी वागणूक न देता एका सामान्य कैद्याप्रमाणेच वागवले जाते.

 

tihar jail inmarathi 2

==

हे ही वाचा – “अंडा सेल” म्हणजे काय रे भाऊ? तुरुंगाच्या भिंतीमागची भयानक दुनिया थरकाप उडवते

==

माजी केंद्रीय मंत्री ए.राजा यांना जेव्हा तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले होते तेव्हा त्यांच्या देखील कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आली नव्हती.

TJ’S हा तिहार जेलचा ब्रँड आहे. या ब्रँडच्या अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या वस्तू तिहार जेलमधील कैद्यांमार्फत बनवल्या जातात. TJ’S ब्रँड अंतर्गत खाद्यपदार्थ, हँडलुम, टेक्सटाईल,फर्निचर, कपडे, बॅग, हर्बल प्रोडक्ट आणि इतर अनेक वस्तू मिळतात.

 

tihar-jail-marathipizza05

 

तिहार जेलमधून देखील पलायन करण्याची योजना काही कैद्यांनी आखली होती. २०१५ मध्ये दोन कैद्यांनी रात्री भिंतीच्या खाली १० फुट सुरंग खोदला आणि त्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फोल ठरला.

चार्ल्स सोभराज हा कुख्यात इंटरनॅशनल सिरीयल किलर हा १६ मार्च १९८६ रोजी तिहार जेलमधून पलायन करण्यात यशस्वी झाला खरा पण पोलिसांच्या मेहनतीमुळे त्याला पुन्हा पकडून तुरुंगात डांबण्यात आले!

 

charles inmarathi

 

तिहार जेलमध्ये जवळपास २० क्रिमिनल गँग आणि ३ लहान सहान गँग कार्यरत आहेत.

या गँगचे प्रमुख असतात भयंकर गुन्हे करून आत आलेले गुन्हेगार! या गँगमुळे तिहार जेलचे प्रशासन मात्र आतून पोखरून गेले आहे. बहुतेक डॉन त्यांचा धंदा तिहारमध्ये बसून चालवतात.

 

tihar-jail-marathipizza06

 

परंतु आजही या तिहार जेलचे नाव ऐकून भल्या भल्या गुन्हेगारांना घाम फुटतो हे देखील तितकेच खरे !

त्यामुळे या जेलमध्ये कैद्यांना कितीही चांगली वागणूक मिळत असली तरी रोडावलेल्या गुन्हेगारांसाठी तिथे तशीच शिक्षा सुद्धा मिळते, त्यामुळे आजही तिहार जेलचे नाव ऐकून कित्येक गुन्हेगारांना नरकयातना होतात!

==

हे ही वाचा : जेल प्रशासनाने एक अनोखी शक्कल लढवलीय ज्यामुळे कैद्यांना चक्क नोकऱ्या मिळाल्या आहेत!

==

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?