' टिक टॉक चा फायदा – ३ वर्षानंतर तिला हरवलेला पती सापडलाय!😃 – InMarathi

टिक टॉक चा फायदा – ३ वर्षानंतर तिला हरवलेला पती सापडलाय!😃

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हे विज्ञान आणि टेक्नॉलॉजीचे युग आहे. आपले संपूर्ण आयुष्यच विविध मशिन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाने व्यापले आहे. अर्थात ह्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. तंत्रज्ञान हे एखाद्या दुधारी तलवारीप्रमाणे आहे. त्याचा आपण करू तसा उपयोग आहे.

नीट जपून वापरले तर टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटचे असंख्य फायदे आहेत.

आणि ह्या इंटरनेटच्या, स्मार्टफोन आणि विविध ऍप्सच्या आहारी गेलो तर वेळ वाया जातोच आणि शिवाय त्याचे विचित्र प्रकारे व्यसन लागून मानसिक आरोग्यावर परिणाम होतात.

तर ह्याच ऍप्सपैकी एक असलेले टिक टॉक हे ऍप तर बहुतांश लोकांना माहितीच आहे. बरेच असेही लोक आहेत ज्यांनी अजून टिक टॉक डाउनलोड करून त्यावर व्हिडीओ बनवले नाहीत.

असेही काही टिक टॉक कलाकार आहेत जे नेहमी कसले ना कसले व्हिडीओ बनवून टिक टॉकवर टाकून इतरांना बेजार करीत असतात.

 

Tik tok
Maharashtra Times

ह्या टिक टॉक व्हिडीओ मुळे अनेक लोक वैतागले आहेत. टिक टॉक पोर्नोग्राफीसाठी वापरले जात असल्याच्या तक्रारीवरून तसेच त्यामुळे लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याच्या कारणावरून टिक टॉकवर मध्यंतरी हायकोर्टाने बंदी आणली.

प्ले स्टोअरवरून सुद्धा टिक टॉक काढून घेतल्यानंतर टिक टॉक स्टार्स फारच नाराज झाले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

फुकटात स्वतःचा व्हिडीओ बनवून प्रसिद्ध होण्याचे त्यांचे साधनच त्यांच्या हातून हिरावून घेतल्यामुळे त्यांना फारच मनापासून दुःख झाले होते. तर ट्विटराटींनी मात्र ह्या संधीचा चांगलाच फायदा घेत टिक टॉक फॅन्सची चांगलीच खेचली.

ट्विटरवर असंख्य मिम्सचा पाऊस पडला. ते ट्विट्स वाचून नेटकऱ्यांची चांगलीच करमणूक झाली.

पण काही काळाने ही बंदी उठवण्यात आली आणि वैतागलेल्या नेटिझन्सच्या भाषेत “रिकाम्या लोकांचे टिक टॉकवर” मुजरा करणे परत सुरु झाले.

 

Tik tok banned
Gizbot Hindi

ह्या टिक टॉक मुळे प्रसिद्धीसाठी आसुसलेले अनेक स्त्रीपुरुष, तरुण मुलेमुली, टिनेजर्स प्रसिद्धीच्या झोतात आले. काहींनी तर इतके विचित्र वाट्टेल ते व्हिडीओ बनवून नेटवर व्हायरल केले की अरे ह्यांना कुणीतरी आता आवरा असे नेटकऱ्यांना वाटू लागले.

काही क्रिएटिव्ह नेटकऱ्यांनी अश्या “प्रसिद्धीच्या शिखरावर” असलेल्या स्टार्सना यथेच्छ ट्रोल केले. त्यांच्यावर प्रसंगानुरूप शेकडो मिम्स बनवले.

टिक टॉकची अशी कीर्ती असताना मात्र एका महिलेला टिक टॉकचा चांगलाच उपयोग झालेला आहे. तामिळनाडू मधील ह्या स्त्रीचा नवरा तिला व मुलांना सोडून निघून गेला होता तो तिला तीन वर्षांनी चक्क टिक टॉकवर सापडला.

तामिळनाडू मधील कृष्णगिरी येथे राहणारा सुरेश नामक एक इसम २०१६ साली त्याच्या बायको मुलांना सोडून घर सोडून निघून गेला होता. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता.

tiktok-trangender-inmarathi
IndiaGlitz

पण नुकतेच त्याच्या पत्नीला तो टिक टॉक वर व्हिडीओ शेअर करताना आढळून आला आहे. टिक टॉकवर सापडल्यानंतर त्याच्या पत्नीने अर्थातच त्याला मोकाट राहू न देता घरी परत येण्यास भाग पाडले.

सुरेशचे जयाप्रदा नामक स्त्रीशी लग्न झाले. आणि त्यांना दोन मुलेही झाली. त्यानंतर २०१६ साली सुरेश त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून अचानक घरातून निघून गेला आणि परतलाच नाही. तो जणू गायब झाला.

जयाप्रदाने नातेवाईक आणि मित्रमंडळीकडे चौकशी करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडलाच नाही. मग तिने पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली पण त्या तपासात पुढे काहीच प्रगती झाली नाही.

काही आठवड्यांपूर्वी जयाप्रदाच्या एका नातेवाईक महिलेला एका टिक टॉक व्हिडीओमध्ये सुरेशशी साधर्म्य असलेला एक इसम आढळला. तिने तातडीने जयप्रदाला ह्याविषयी सांगितले.

जयाप्रदाने तो व्हिडीओ बघून त्या व्हिडीओमध्ये तिचा पती सुरेशच असल्याची खात्री केली.

 

Couple
The Hush Post

जयप्रदाने तातडीने सूत्रे हातात घेऊन पोलिसांना ह्या सर्वांची माहिती दिली आणि पोलिसांनीही त्वरित हालचाल करून सुरेशचा माग काढत त्याला होसूरमधून शोधून काढले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्यातरी समस्येत अडकल्यामुळे सुरेश घर सोडून निघून गेला होता. त्याने घर सोडल्यानंतर तो होसूर येथे गेला आणि त्याने एका ट्रॅक्टरच्या कंपनीत मेकॅनिक म्हणून काम करणे सुरु केले.

तसेच त्याचे एका ट्रांसवुमन (तृतीयपंथी महिला)बरोबर संबंध देखील होते. ही महिला सुरेशबरोबर त्याच्या टिक टॉक व्हिडीओमध्ये देखील आहे.

पोलिसांनी तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या एका एनजीओच्या मदतीने विल्लूपुरम जिल्ह्यात वास्तव्याला असलेल्या सुरेशचा ठावठिकाणा शोधून काढला.

TikTok-inmarathi
india.com

सुरेशने सांगितले की त्याला घरात झालेल्या नव्या बदलांचा त्रास होत होता, घरात घडलेल्या काही घटनांमुळे तो खुश नव्हता आणि म्हणूनच तो घरातून निघून गेला.

पण पोलिसांनी त्याच्याशी बोलून व त्याची समजूत काढून त्याला परत त्याच्या घरी पाठवले आहे.

अखेर तीन वर्षांनी जयाप्रदाच्या प्रयत्नांनी व पोलिसांच्या सहकार्याने सुरेश घरी परतला. अर्थात सुरेशच्या घरी परतण्याचे श्रेय टिक टॉकला सुद्धा द्यायला पाहिजे म्हणा!

टेक्नॉलॉजीचा असा उपयोग झाल्याची ही बहुतेक एक दुर्मिळ घटना असावी. ऐकावे ते नवलच! 😃 😃 😃

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?