मराठा आरमार उभारणारा, इंग्रजांकडून खंडणी वसूल करणारा मराठा शूरवीर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती? शांता शेळके यांनी लिहिलेल्या आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं तरी आपल्याला स्फूर्ती येते. पण खरंच अशा प्रकारचे सरदार आपल्या शिवाजी महाराजांच्या काळात होते.
शिवाजी महाराजांच्या सैन्यातील लोकांना इंग्रज सुद्धा घाबरत असत.
असेच एक वीर पुरुष कान्होजी आंग्रे ज्यांनी १७०० च्या दशकात युरोपियन शक्तींचा प्रतिकार केला आणि मराठा साम्राज्याचे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील कराधन आणि सार्वभौमत्वाचे अधिकार यावर जोर दिला.
मराठा नौसेनेचे प्रमुख कान्होजी आंग्रे होते. त्यांचा वचक इंग्रज आणि पोर्तुगिजांना होता. या दोन्ही सैन्यात प्रचंड सैन्य असूनसुद्धा कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्यच राहिले. पाहू या वीर सैनिकाचा पराक्रम.
–
- महाराजांचे असेही शूर-वीर – येसाजी कंक नामक एक रांगडी हिंमत!
- बलुचिस्तानमध्ये आजही ‘मराठा’ ताठ मानेनं वावरतो आहे, थक्क करणारं सत्य!
–
कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६९६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे या गावी झाला.
मराठ्यांचा इतिहास घडविणार्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे हे एक, पुणे जिल्ह्यातील कोळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव, परंतु आंगरवाडी या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांना आंग्रे हे नाव प्राप्त झाले.
कान्होजींच्या आधीच्या पिढ्या शिवाजी महाराजांच्या पदरी होत्या. १६८० मध्ये त्यांचे वडील तुकोजी आंग्रे यांचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी आंग्रे यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. आंग्रे घराण्यातील तेच सर्वांत कर्तबगार पुरुष होते.
१६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कोकणच्या किनारपट्टीवर विजय मिळवला तेव्हा सुवर्णदुर्ग किल्ल्याचा संरक्षक म्हणून कोन्होजीच्या पित्याची नेमणूक शिवाजी महाराजांनी केली.
कान्होजींचा जन्म याच किल्ल्यावर झाला आणि पुढे त्यांनी या समुद्रकिनार्याचे संरक्षणही केले.
२० व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश साम्राज्याने समुद्री साम्राज्य उभे केले होते, तेव्हापासून आजच्या काळात सामु्रदी राजकारणात जागतिक राजकारणाचा प्रभाव आहे.
आजच्या डिजिटल युगातही जेव्हा व्यापार तत्काळ आणि समोरासमोर होतो तरीही मोठ्या प्रमाणात समुद्र पर्यटन, समुद्री सुरक्षा आणि परराष्ट्र प्रभुत्व यांच्यावरील वादविवाद पुन्हा राष्ट्रांमध्ये संवाद साधतात.
आज विसाव्या शतकातही त्याला तितकेच महत्त्वाचे आहे.
भारताच्या महान राजांनी व्यापार आणि समृद्धीसाठी समुद्राचा उपयोग केला. १७ व्या आणि अठराव्या शतकाच्या सुरुवातीस युरोपियन उपनिवेशवादांच्या उद्रेक काळात कोकण किनार्यावर कोकण किनारपट्टीवर १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे यांना मराठा नौसेनेचे प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले.
कान्होजींनी कोळी आणि मच्छीमार समुदायाशी मैत्री केली. ज्यांनी त्यांना समुद्राचे कौशल्य शिकवले. कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा यांची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही स्वपराक्रमाने स्वत:चा एक ठसा त्यांनी इतिहासात उमटविला.
त्यांचा पराक्रम लक्षात घेऊन त्यांना ‘सरखेल’ हा किताब देण्यात आला.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १८ वर्षांनी आणि ताराबाईंच्या शासनकाळात कान्होजी यांच्याकडे केवळ १० जहाजे होती. त्यांनी त्या शक्तीतून आपली नौसेना विकसित केली. कोकणमधील जंगल आणि मच्छीमारांच्या कौशल्याचा वापर करून जहाजनिर्मिती केली.
अरब सागरातील परकीय व्यापार कान्होजींसाठी चिंतेचा विषय नव्हता.
पोर्तुगीज, ब्रिटिश किंवा डच या देशांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध जिंकू शकले नसते, परंतु मग पोर्तुगिजांनी मराठा साम्राजाच्या सार्वभौमत्वावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला.
भारताच्या पश्चिमेकडील किनारपट्टीवरील व्यापाराच्या मार्गावरील व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी निराश युरोपियन शक्तींनी बहुतेक वेळा त्यांचा उल्लेख समुद्री डाकू म्हणून केला, तरी आंग्रे प्रत्यक्षात अर्ध स्वायत्त होते.
कान्होजी यांनी स्वत:च्या नेव्हीची स्थापना केली आणि ‘दस्तक’ नावाची त्यांची नोंदणी प्रक्रिया लागू केली.
त्यांनी पोर्तुगिजांप्रमाणेच नाममात्र बक्षिसे दिली आणि योग्य नोंदी कागदपत्रांशिवाय कोकण किनारपट्टीवर उतरलेले प्रत्येक जहाज जप्त केले.
भारतीय शक्तींनी समुद्रावर युरोपियन प्रभुत्व रोखण्याची ही पहिलीच वेळ होती, परंतु युयोपियनांनी मराठ्यांच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले होते आणि त्यांना योग्य धडा शिकवण्याची गरज होती.
इ. स. १६९४ ते १७०४ च्या दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मुघलांकडे गेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले, शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले व त्यांनी ‘आपण कोकणकिनार्याचे राजे’ अशी घोषणा केली.
मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणार्या-जाणार्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला.
१७ व्या शतकाच्या अखेरीस अलिबाग या गावाची स्थापना केली, त्यांनी अलिबाग रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली. अंदमान बेटांवरही कान्होजींचा तळ असल्याचा उल्लेख आहे. ही बेटे भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते.
–
- ‘शिवाजीचा मावळा मी, तुझा कौल हवाय कुणाला?’ वाचा ‘या’ योद्ध्याची शौर्यकथा
- खुद्द इंग्रजांना रणांगणात धूळ चारणाऱ्या मराठा वीराच्या शौर्याची अजरामर कहाणी
–
शिवाजी महाराजांच्या प्रादेशिक रणनीतीचा कान्होजींवर प्रभाव होता. मानव-शस्त्रास्त्रे यांच्यावर हल्ले करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा स्रोत नसल्यामुळे, कान्होजींनी आपली लढाई जिंकण्यासाठी गनिमी रणनीती वापरली.
४ नोव्हेंबर १७१२ रोजी कोन्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐलास्बी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला.
त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आली. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांमध्ये तह होऊन ३०,००० रुपये खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली.
या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले.
या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.
२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुबंईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले.
उलट कान्होजींनी १७१ मध्ये इंग्रजांची तीन जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले.
कान्होजींनी मुबंई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली.
१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्ल्यावर तोफांचा मारा केला, पण हा हल्ला अयशस्वी ठरला. इंग्रजांनी परत माघार घेतली.
१७२१ मध्ये पोर्तुगीज आरमाराने आणि इंग्रज आरमाराने मिळून ६००० सैनिकांसह आणि ४ मोठ्या जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली.
मंडळी विचार करा, एका आरमाराच्या विरुद्ध दोन आरमार एकत्र झाले. इतके शूर सैन्य होते कान्होजींचे.
कधीही नेता जर खंबीर असेल तर सैन्यपण तितक्याच ताकदीने त्याला साथ देते. तर कान्होजींनी हा पण हल्ला परतवून लावला. कान्होजींच्या मृत्यूपर्यंत सागरी किनार्यावर शांतता राहिली.
आंग्रेंनी आपल्या महासागरावरील व्यापाराला कधीही शक्ती दिली नाही, पण उपमहाद्वीपच्या स्थानिक शक्तीसाठी त्यांनी एक महत्त्वपूर्ण उदाहरण मांडले.
अशा या कान्होजींना इंग्रज आणि पोर्तुगीज आरमार सुद्धा घाबरून होते. शेवटपर्यंत त्यांनी समुद्र संरक्षण करण्यात आपले आयुष्य खर्ची केले.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.