' या नामांकित कंपनीच्या कर्मचाऱ्याने सिक्रेट फॉर्म्युला पेप्सीला विकण्याचा प्रयत्न केला! पण.. – InMarathi

या नामांकित कंपनीच्या कर्मचाऱ्याने सिक्रेट फॉर्म्युला पेप्सीला विकण्याचा प्रयत्न केला! पण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोका कोला आणि पेप्सी या जगातील आघाडीच्या फ्लेवर्ड कोल्ड ड्रिंक (शीत पेय) बनविणा-या २ कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने शीत युद्ध चालूच असते .

जगातील आघाडीच्या कोल्ड ड्रिंक्स कंपन्या असो फूड चेन्स असोत वा त्यांची रेसिपी अथवा फॉर्मुला कधीच जाहीर करत नाही. व्यापाराच्या दृष्टीने ते ट्रेड सिक्रेट असते.

 

coke pepsi inmarathi
Time Magazine

मात्र जेव्हा जेव्हा पेप्सी ला कोका कोला चा ट्रेड सिक्रेट फॉर्म्युला विकण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा पेप्सी ने तत्काळ आपल्या प्रतिस्पर्धी कोका कोला कंपनीला सावध केले.

कधी कधी कॉर्पोरेट कंपन्या मधील स्पर्धा भयंकर रूप घेते मात्र हि स्पर्धा नितीमत्ता आणि कायद्याला धरून असली पाहिजे याचा प्रत्यय पेप्सी ने आणून दिला.

२००६ मध्ये जोया विल्लीयम, तत्कालीन ग्लोबल ब्रंड डायरेक्टर ला काही महत्वाच्या फाइल्स, कागदपत्रे आणि अद्याप बाजारात न आलेले नवीन कोका कोला शीतपेयाची बॉटल च्या चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

 

coca cola 1 inmarathi

(वरील चित्रात डावीकडे एडमंड डॉउने, मध्यभागी जोया विल्लीयम तर उजवीकडे इब्राहीम डीम्सन कोर्टामध्ये सुनावणीसाठी बसलेले दिसत आहेत)

जोया वय ४१ वर्षे ,३० वर्षीय इब्राहीम डीम्सन, ४३ वर्षीय एडमंड डॉउने यांच्यावर आर्थिक फसवणूक , बेकायदेशीर रित्या कोक चा फॉर्म्युला चोरून विकणे हे आरोप ठेवण्यात आले.

या घटनेमागील पार्श्वभूमी अशी कि , २००५ च्या शेवटी जोया ची एडमंड डॉउने याच्याशी ओळख झाली , डॉउने नुकताच तुरुंगातून कोकेन बाळगल्या प्रकरणी शिक्षा भोगून बाहेर आला होता.

जोया ने त्याला सांगितले कि कोका कोला च्या अतिशय महत्वाच्या कागदपत्रांचा खजिना तिचाकडे आहे .

 

coca cola 2 inmarathi
thehustle.co

कोक चा मुख्य प्रतिस्पर्धी पेप्सिको साठी ते अतिशय उपयोगी असून त्याचे खूप पैसे आपल्याला मिळू शकतील, मात्र तिचा(जॉय चे) कोक सोबत गोपनीयता करार (non-disclosure agreement) असल्याने ती स्वतः सदर कागदपत्रे पेप्सी ला स्वतः देऊ शकत नसून , यासाठी तिला एका मध्यस्थाची गरज असल्याचे सांगितले .

एडमंड डॉउने याला नेमकी हे काम करू शकेल अशी व्यक्ती माहित होती इब्राहीम डीम्सन, एक पैशांची अफरातफर करणारा सफेद पोष ज्याची तुरुंगात भेट झाली होती.

डर्क या टोपण नावाने डीम्सन ने अधिकृत कोका कोला कंपनीच्या पाकिटात पेप्सी च्या वरिष्ठ उपाध्यक्षाच्या नावे पत्र लिहले, ज्यात त्याने सांगितले तो(डीम्सन) कोका कोला कंपनीचा उच्च अधिकारी होता आणि त्याच्याकडे काका कोला चे ट्रेड सिक्रेट्स आहेत.

 

coca cola 4 inmarathi
thehustle.co

२ आठवड्या नंतर डीम्सन ला एका जेरी नावाच्या कथित पेप्सी कर्मचा-याचा फोन आला आणि सांगितले ते (पेप्सी) इच्छुक आहेत आणि त्यासाठी पुरावा मागितला.

डीम्सन ने तत्काळ जेरी याला १४ पाने फॅक्स केली. प्रत्येक कागदावर गोपनीय मार्किंग होते आणि जेरी ला इच्छुक असल्याचे सिध्द करण्यासाठी डर्क उर्फ डीम्सन याने बँक अकौंट मध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. थोड्याच वेळात डीम्सन च्या खात्यात ५ हजार डॉलर जमा झाले.

एक विश्वासार्ह मध्यस्थ म्हणून जोया हि फक्त कागदपत्रांचा खजिनाच नव्हे(अंतर्गत इमेल,प्रेझेंटेशन, प्रस्ताव)पण अद्याप बाजारात न आलेल्या शीत पेयाचे नमुने देखील बाळगून होती.

एका रात्री उशिरा जॉय ने कोका कोलाच्या अटलांटा येथील मुख्यालयातून अद्याप बाजारात न आलेले सिक्रेट शीत पेय आणि काही गोपनीय कागदपत्रे बॅगेत भरली. जे डीम्सन मार्फत जेरी ७५ हजार डॉलर ला खरेदी करणार होता.

ज्यातील ३० हजार डॉलर लगेच आणि ४५ हजार डॉलर खात्री पटल्यावर देणार होता.

जून महिन्याच्या मध्यात हार्टस्फील्ड-जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ,अटलांटा जेरी आणि डीम्सन यांची भेट झाली. डीम्सन ने पैसे भरलेल्या कुकी बॉक्स च्या बदल्यात कागदपत्रांनी भरलेली अरमानी बॅग जेरी याला दिली.

 

armani bag inmarathi
uk.knomo.com

विमानतळाच्या बाहेर पडल्यावर डीम्सन ने पैशाची वाटणी केली त्यात २२ हजार डॉलर स्वतःला, ६ हजार डॉलर जॉय ला आणि , २ हजार डॉलर एडमंड डॉउने याला

१० दिवसा नंतर जेरी याने डीम्सन ला फोन करून उरलेल्या कागदपत्रांच्या बदल्यात १.५ दश लक्ष डॉलर देण्याची ऑफर दिली. परंतु इथेच खरी मेख होती जेरी हा कुणी पेप्सिको कर्मचारी नसून एफ बी आय चा सिक्रेट एजेंट गेराल्ड रीचार्ड होता

जेव्हा पेप्सिको ला या त्रई चे पत्र मिळाले होते तेव्हा पेप्सिको ने तत्काळ कोका कोला ला सूचित केले आणि कोका कोला ने एफ बी आय कडे चौकशी ची मागणी केली.

अशा प्रकारे ५ जुलै २००६ ला एडमंड डॉउने, जोया विल्लीयम, इब्राहीम डीम्सन यांना आर्थिक फसवणूक आणि बेकादेशीर पने ट्रेड सिक्रेट चोरून विकणे या आरोपाखाली अटक करण्यात आली.

एका वेगवान सुनावणी मध्ये एडमंड डॉउने आणि इब्राहीम डीम्सन यांना अनुक्रमे २ आणि ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

 

criminals caught
SA Breaking news

जॉय विल्लीयम ने सुरवातीला आरोप नाकारले आणि सांगितले सहका-यांनी फसवणूक करून तीला अडकवले मात्र कोर्टाने तिला ८ वर्षांची शिक्षा सुनावली.

पेप्सिको प्रवक्त्याने सांगितले स्पर्धा हि कायदेशीर आणि नितीमत्तेला धरून असली पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?