' हजारो वर्षापूर्वीचे आपले पूर्वज कडक गांजा फुंकायचे! : अभ्यासकांचा निष्कर्ष – InMarathi

हजारो वर्षापूर्वीचे आपले पूर्वज कडक गांजा फुंकायचे! : अभ्यासकांचा निष्कर्ष

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

धक्का बसला ना? आजकालच्या पोरांच्या नशेडीपणावर टीका करतात. ही पिढी बिघडली आहे..ड्रग्ज आणि नशेच्या विळख्यात सापडले आहेत पब संस्कृती, ड्रिंक घेणं या व्यसनांनी आताच्या पिढीला जरा जास्तच नादाला लावलं आहे अशी संस्कृती रक्षकांनी ठोकलेली आरोळी आहे.

वाढता दारुचा खप हा चिंतेचा विषय बनला आहे. आमच्या वेळी कसे लोक सज्जन होते आणि आता कसे डांबरट झाले आहेत हा गजर सारखा कानावर पडतो.

पण मित्रांनो अभ्यासकांनी लावलेला हा नवा शोध समजला तर तुम्ही थक्क व्हाल…

अभ्यासकांनी काढला आहे हा निष्कर्ष…२५०० वर्षांपूर्वी सुध्दा आपल्या पूर्वजांनी नशेसाठी अतिशय कडक गांजा सेवन केला होता..पडलात ना चाट? पण हे खरं आहे…

 

ganja inmarathi
Old man smoking

मध्य आशियाई पर्वतरांगा मधील एका कबरीच्या मानवी अवशेषांमध्ये अत्यंत कडक गांजा सापडला आहे. त्या प्रेतासोबत दफन करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये हा गांजा सापडला आहे.

त्याकाळी प्रेतासोबत त्याच्या आवडीचे विविध प्रकारचे पदार्थ ठेवण्याची पद्धत होती. त्यामुळे त्या व्यक्तीच्या अवशेषांसोबत हा गांजाही पुरलेला सापडला आहे.

संशोधक हे पाहून थक्क झाले. त्या अवशेषातील सापडलेला गांजा ख्रिस्तपूर्व ५०० वर्षाचा कालावधीतील आहे असं चाचण्या सांगतात.

नविन अभ्यासकांनी सांगितले आहे की, या गांजामध्ये मन धुंद करणारा घटक जास्त प्रमाणात आहे. चीनमधील पामीर पर्वतरांगा मधील एका कबरीत हे अवशेष सापडले आहेत.

या अवशेषांचे रासायनिक पृथक्करण करून अभ्यासकांनी असे मत मांडले आहे की, या गांजाची पाने ही मूड सांभाळणे, मन आनंदी ठेवणे हे करायला उत्तम आहेत.

दुःख कमी करण्यासाठी याची मात्रा उपयुक्त आहे हे त्या रिपोर्टमधून समजले.

 

merijuana inmarathi
puffpost.com

पुरातन वनस्पतीशास्त्रज्ञ श्री. राॅबर्ट स्पेंगलर म्हणतात,”गांजाचा इतिहास फार फार जुना आहे. आता जरी त्याचं कलम बनवलं असलं तरी हे पीक फार जुनं आहे.” यांनी या झाडाचा फार बारकाईने अभ्यास केला आहे.

ओंजळभर गांजाची देठं आणि बिया युरेशियातील कितीतरी ठिकाणी माणसांच्या कबरीमध्ये सापडली आहेत.

पण पामीर पर्वतावरील कबरीमध्ये सापडलेल्या गांजामुळं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, पूर्वी दफनविधी करताना गांजाचा जास्तीत जास्त वापर केला जात असे. आशियाई भौगोलिक टापू मध्ये या वनस्पतीचा उपयोग जास्त प्रमाणात केला जात होता.

डॉ. मार्क मर्लिन हे हवाई विद्यापिठात वनस्पती शास्त्राचे प्रोफेसर आहेत. ज्यांनी अत्यंत बारकाईने निरीक्षण करून हा निष्कर्ष मांडला आहे.

“गांजाचा वापर सोयिस्करपणे केला जात होता. इतकेच नव्हे तर माणूस मेल्यानंतर त्याच्या प्रेतासह गांजा, रेशमी वस्त्र, काचेचे मणी, वीणेसारखे तंतूवाद्य, लाकडी वाट्या, ताट, हे सुध्दा कबरीत ठेवलं जाई.”

हा साद्यंत अभ्यास चीनमधील समाजशास्त्र विभागाने आणि शास्त्र विभागाने प्रसिद्ध केला आहे. हा अभ्यास मानवी कवटीच्या हाडाचे तुकडे व कवटीला असलेली छिद्रं‌ यांच्यावरुन शक्य झाला.

 

merijuna inmarathi
nytimes.com

हा अभ्यास करताना अभ्यासकांनी कबरीतील सर्व तुकडे संगतवार एकत्र लावले. आणि दफनविधीचे सारे सोपस्कार केले.

ते करत असताना ते विशिष्ट प्रकारचे संगीत, तो भ्रम निर्माण करणारा धूर निर्माण केला. पूर्वी तो धूर शेगडीवर कोळसे पेटवून केला जात होता.

पेटत्या कोळशांवर गांजा टाकला जाई आणि वातावरण धुंद होऊन जाई. एका कबरीत तसल्या १० शेगड्या सापडल्या आहेत. ही कबर जिरझंकाल कबर म्हणून ओळखली जाते. हीचा कालावधी सुमारे २५०० वर्षांचा आहे असे अभ्यासकांना आढळले आहे.

रासायनिक पृथक्करण करून अभ्यासकांनी ही पण एक गोष्ट मांडली आहे, की या कबरींमध्ये एकतर मुद्दाम बिया नसलेला गांजा ठेवला होता किंवा जर त्या बियांसमवेत ठेवला असेल तर तो जाणूनबुजून तिथून नंतर नाहीसा केला.

आता एक प्रश्न पडतो तो असा की, मृतकाच्या प्रेतयात्रेत सामिल झालेल्या लोकांनी हे गांजाचे भाग सुटे कसे केले असतील?

कारण जंगली गांजा हा सहजासहजी उगवत होता. आणि हा जो पर्वतरांगांचा भाग आहे तिथं पाणी पाऊस मुबलक प्रमाणात होता. पण आशियाई भौगोलिक टापू मध्ये गांजाचं प्रमाण हे अत्यल्प होतं.

 

cannabis inmarathi
cannabis.com

मग एकच दाट शक्यता उरते ती म्हणजे हे लोक गांजाची लागवड करत होते. आणि काही खास माणसांच्या कार्यक्रमाच्या वेळीच वापरत असावेत. त्याशिवाय अजून एक शक्यता अशी की व्यापारी लोक जेंव्हा गांजा वाहून नेत तेंव्हा त्याच्या बिया पडून ही गांजाची झाडं उगवली असावीत.

तो जो पामीर पर्वताचा भाग आहे तो आता चीन, अफगाणिस्तान आणि कजाकिस्तान म्हणून ओळखला जातो.

या थडग्यांचा अभ्यास करताना अभ्यासकांनी एक गोष्ट मांडली ती अशी, की या सर्व कबरीत समाजातील गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष अगदी धर्मगुरु सुध्दा होते आणि सर्व कबरींमध्ये कमी अधिक प्रमाणात गांजा ठेवलेला होता.

गोलाकार बनवलेल्या या कबरी काळ्या आणि पांढऱ्या दगडापासून बनवल्या आहेत. या दगडांच्या फरकाचे कारण काय असावे हे मात्र अभ्यासक सांगु शकले नाहीत.

या कबरींमध्ये भांडी, शीडाचे कापड, तेलबिया, यांचा समावेश आहे. जपानमधील अशा कबरींमध्ये भांड्याच्या आत अशा बिया होत्या त्यांचं वय अंदाजे १० हजार वर्षे असावं. तर या कबरीतील बिया ४ हजार वर्षे वय सांगतात.

 

old ganja
cnbs.org

गांजाच्या बिया, खसखशीच्या बिया यांचा वापर पूर्वी सर्रास औषधं आणि दफनविधी करताना केला जात होता.

रशिया, ग्रीक, मंगोलिया, सायबेरिया आणि पामीर पर्वतावरील कबरीमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे अवशेष या सर्वांची एकच गोष्ट…

बहुतांश कबरीच्या आत मृतदेहासोबत गांजा ठेवला जात होता. एका सहा फूट उंच प्रेताच्या छातीशी फुलांच्या गुच्छासारखा गांजा ठेवला होता. एकंदरीत गांजाचे झाड हे देवप्रिय आहे असाच समज तेंव्हा असावा…

हे सारं वाचून जुनं ते सोनं असं म्हणताना क्षणभर विचार करावा लागेल.. मैं नशे में हूं म्हणत किती जणांनी गांजा सह देवाघरचा रस्ता धरला आहे!!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?