' क्रिकेट वर्ल्ड कप पाण्यात जातोय : सोशल मीडियावर विनोदाची तुफान फटाके बाजी – InMarathi

क्रिकेट वर्ल्ड कप पाण्यात जातोय : सोशल मीडियावर विनोदाची तुफान फटाके बाजी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

२०१९ विश्वचषक हा स्पर्धेत भारत विरूद्ध न्यूझीलंड सामना अखेर पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे दोनही संघांना १-१ गुण देण्यात आला.

या १-१ गुणामुळे न्यूझीलंड ४ सामन्यांत ७ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे, तर भारतीय संघ ३ सामन्यांत ५ गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

सामना हा नॉटिंगहॅमच्या मैदानावर होणार होता. कालपासूनच या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार नाणेफेकीच्या नियोजित वेळेच्या आधीपासूनच पावसाने जोर धरला होता.

भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वा. ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणी आणि पावसाचा अंदाज घेण्यात आला.

पाऊस हा कमी जास्त होत होता पण ढगाळ वातावरण व अपुरा सूर्यप्रकाश यासर्व गोष्टी लक्षात घेता सामना काय नाणेफेक देखील झाले नाही, अखेर पावसाचाच जय झाला.

यंदाचा विश्वचषक हा  कोणत्या खेळाडू पेक्षा पावसानेच जास्त गजवाला आहे. आतापर्यंतचा सर्वात ख़राब विश्वचषकाचे आयोजन म्हटलं  तरी हरकत नाही.

हा विश्वचषक राऊंड रॉबिन फॉरमॅट नुसार खेळाला जाणार असून यामुळे स्पर्धेचा कालावधी जास्त आहे. त्यामुळे राखीव दिवस ठेवू शकत नाही आयसीसी म्हणणं आहे.

पाऊसाचा फटका हा दोन्ही संघाना पडतो स्पर्धेच्या शेवटी १ गुणामुळे देखील संघ हे उपांत्यपूर्व फेरीत पोहचू शकत नाहीत.

पावसाचा मुले १-२ नव्हे तर तब्बल ४ सामने पाण्यात गेले आहेत. यापैकी २ सामने हे श्रीलंकेच्या वाट्याला आले. तर भारत, न्यूझीलंड, बांगलादेश, आफ्रिका या संघाना एका सामन्यात पावसाचा फटका बसला आहे.

नॉटिंगहॅमच्या मैदानावर पाऊस सुरु असताना इंटरनेट वरती मात्र मिम्सचाच पाऊस पडत होता.

काही लोकांनी इंग्लंड क्रिकेट बोर्ड ला भारतीय क्रिकेट बोर्डाकडून काहींतरी आदर्श घ्यावा म्हणत नॉटिंगहॅम आणि ईडन गार्डनचा पावसावेळी मैदान झाकलेला फोटो पोस्ट केला आहे.

काही लोकांनी तर आयसीसी वर आपला राग व्यक्त करत आयसीसीला स्पर्धेच्या ठिकाणांपेक्षा धोनीचा ग्लोज महत्वाचा वाटतो असे टोमणे मारले आहेत.

पाहुयात असेच काही गमतीदार मिम्स, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाहीं हे मात्र नक्की !

 

 

https://twitter.com/SirJadeja/status/1139108376489730048

 

 

 

 

 

 

 

 

https://twitter.com/vishy_vishal/status/1139388669897297920

 

रविवारी होणारा भारत- पाकिस्तान हा सामना तरी पाउसामुळे रद्द होऊन पाण्यात जाऊ नये, हीच अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?