ब्लड प्रेशर मोजणारं यंत्र नि स्टेथोस्कोप : डॉक्टरांच्या या फेव्हरेट गोष्टी कशा काम करतात?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
मंडळी डॉक्टर म्हंटलं की डोळ्यांसमोर काय येतं? पांढराशुभ्र कोट घातलेला आणि गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेला माणूस.
डॉक्टर आणि स्टेथोस्कोप हे नातं आपल्या डोक्यात इतकं घट्ट आहे की ग्राहकांना अपील होण्यासाठी दरम्यानच्या काळात टूथपेस्ट च्या जाहिरातीतला माणूस डॉक्टर वाटावा त्यासाठी त्याच्याही गळ्यात हा स्टेथोस्कोप दाखवण्यात येई.
अर्थात नंतर जाहिरात करणार्यांना डेंटिस्ट च्या गळ्यात स्टेथो कसा असणार ही चूक लक्षात आल्याने हल्ली आपण त्या मनोरंजनाला मुकलो आहोत.
हयातला विनोद बाजूला ठेवला तर खरंच, स्टेथोस्कोप हा डॉक्टरच्या कामात येणारा अतिशय महत्वाचा सहाय्यक घटक आहे. ह्याला आणखी एक सोबती आहे आणि तो म्हणजे बी पी एप्रेटस. म्हणजेच बी पी मोजण्याचे मशीन.
ह्या दोन्ही वस्तु कुठल्याही आजारचे निदान करण्यात मोलाची मदत करतात. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच आजच्या लेखाचा विषय काय आहे ते.
तर मित्रांनो, आज आम्ही ह्या लेखातून तुम्हाला डॉक्टरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणार्या स्टेथोस्कोप आणि बी पी एप्रेटस मशीन ह्या दोन उपकरणांबद्दल माहिती देणार आहोत. बघूया डॉक्टरांच्या या फेव्हरेट गोष्टी कशा काम करतात?
सर्वप्रथम स्टेथोस्कोपच्या कामाबद्दल जाणून घेण्यापूर्वी एक गम्मत ऐका. तुम्हाला माहिती आहे का की ह्या यंत्राचा शोध कसा लागला ? हा शोध लागला अवघडण्यामुळे. हो बरोबर ऐकलंत.
फ्रान्सच्या लिनेक नावाच्या वैज्ञानिकाने ह्या यंत्राचा शोध १८१६ साली पॅरिसमध्ये लावला मात्र तेव्हा त्याचे स्वरूप फार वेगळे होते. तर झालं असं की त्या काळी रूग्णाला तपासताना छातीचे ठोके ऐकायला डॉक्टर रूग्णाच्या छातीला कान लावत.
मात्र जेव्हा स्त्री रुग्ण येत त्यावेळी परिस्थिति बिकट होई आणि डॉक्टर अवघडून जात. त्यावर उपाय म्हणू लिनेक ह्यांनी एक उपकरण बनवले जे दिसयला सुरळी सारखे होते.
ह्या सुरळीच्या एका टोकाला मायक्रोफोन होता तर दुसर्या टोकाला इयरपीस बसवलेला होता आणि त्याला नाव स्टेथोस्कोप. हे उपकरण रुग्णाच्या छातीवर किंवा पाठीवर टेकवून, निदान करण्यास वापरले जाई.
स्टेथोस्कोप हे नाव देण्याचं कारण म्हणजे, स्टेथोस्कोप ग्रीकभाषेतला शब्द stethos (म्हणजे चेस्ट किंवा छाती) आणि scopos (म्हणजेपरीक्षण)ह्या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. म्हणजे छातीचे परीक्षण करण्याचे उपकरण.
अधिकाधिक अचूक निदान व्हावे ह्यासाठी कालांतराने ह्या उपकरणात बदल होत गेले. आणि तो स्टेथोस्कोप तयार झाला ज्याला आपण आज डॉक्टरांकडे बघतो. तर आता बघूया हा स्टेथोस्कोप काम कसे करतो?
आजकाल वापरले जाणारे स्टेथोस्कोप विलक्षण सोपे डिव्हाइसेस आहेत. त्यात तीन मुख्य विभाग आहेत.
१.चेस्टीस:
हा एक भाग आहे जो रुग्णाच्या थेट संपर्कात येतो म्हणजे आवाज ऐकण्यासाठी त्याच्या छातीला लावला जातो. चेस्टीसच्या दोन बाजू असतात. एका बाजूला डायाफ्राम म्हणजे एक फ्लॅट मेटल डिस्क असते ज्यामध्ये एक फ्लॅटप्लास्टिक डिस्क असते.
डायाफ्राम हा या चेस्टीसचा मोठा भाग आहे. दुसऱ्या बाजूला आहे बेल, म्हणजे एका पोकळ बेलच्या आकारावर एक लहान भोक असलेला मेटलचा तुकडा.
खालच्या पट्टीतला आवाज ऐकण्यासाठी ही बेल उपयुक्त ठरते तर हृदयाचे ठोके ह्या सारखा उच्च स्तरांतला आवाज ऐकण्यासाठी डायाफ्राम हा भाग उपयुक्त ठरतो.
२. ट्यूबिंग:
म्हणजे वाय आकार असलेला चेस्टपीस पासून कांनंपर्यंत जाणारा नळीसारखा भाग. छातीतील विविध आवाज ह्याच नळीद्वारे ऐकणे सहज साध्य होते.
ही नळी शेवटी दोन भागात विभागली जाते ज्यामुळे ऐकणारा नळीची दोन्ही टोकं आपल्या दोन्ही कानात घालून नीट ऐकू शकतो. ही स्टेथोस्कोप ट्यूबिंगसाधारणतः 18 ते 27 इंच (45 से68 सेंटीमीटर) एवढी लांब असते.
३. हेडसेट:
वर संगीतलेली रबर टयूबिंग ही धातूच्या नळीच्या एका सेट वर जाऊन थांबते.
जी आवाजाला ऐकणार्याच्या इयरपीस पर्यन्त नेण्याचे काम करते. ह्याचे टोक म्हणजे इयरटिप्स छातीचा आवाज नीट पोचवायला मदत तर करतातच शिवाय तपासणी दरम्यान येत असणार्या आजूबाजूच्या अनावश्यक आवजांपासूनही वाचवतात.
कानाला इजा होऊ नये आणि पकड व्यवस्थीत बसावी म्हणून हे इयर टिप्स नरम रबरापासून बनवलेले असतात.
आता बघूयात बी पी एप्रेटस कसे काम करते.
रक्तदाब तपासण्यासाठी वापरण्यात येणारी ही उपकरणे म्हणजे अॅनेरोईड डिव्हाइसेस, ही ऑस्कल्टेशनवर अवलंबून असतात आणि ती लोकप्रिय आहेत,
ऑस्केलेटरी डिव्हाइसेस डिजिटल रीडआउट तयार करतात आणि सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दबावांच्या दरम्यान धमनीद्वारे वाहणार्या रक्तामुळेधमनीच्या भिंतीमध्ये कंपन तयार होते.
जे शोधता येऊ शकतील एवढे तीव्र असते आणि विद्युत सिग्नलमध्ये पाठविले जाऊ शकते.
ह्या ओस्किलेटरी उपकरणाने हाताचा वरचा भाग म्हणजे दंड किंवा मनगटावरएक कफ फुगला जातो. कोणत्याही व्यक्तीसाठी सिस्टोलिक दाबापेक्षा 20मि.मी.
एचजीच्या दाबापर्यंत पोचण्यासाठी कफ चा दाब किती प्रमाणात वाढवायचा हे ठरवण्यासाठी एक अस्पष्ट तर्क वापरला जातो. जेव्हा हा कफ पूर्णपणे फुगतो तेव्हा धमनीतून रक्त प्रवाह होत नाही.
कफ सिस्टोलिक प्रेशरच्या खाली विक्षेपित होत असल्याने धमनीवर आलेला दाब कमी केल्याने रक्त वाहायला लागते. आणि धमनीच्या भिंतीवर ओळखता येण्याजोगे कंपन निर्माण करते.
जेव्हा कफ चा दाब रुग्णाच्या डायस्टोलिक प्रेशरच्या खाली येतो रक्त धमनीच्या माध्यमातून सहजतेने वाहू लागते. तेव्हा हे प्रवाही रक्त धमनीवर कुठलेही कंपन निर्माण करीत नाही.
रक्तवाहिन्यामधून रक्त वेगाने वाहून धमनीत कंपन निर्माण करण्यासाठी कफद्वारे असा उच्च दाब दिला जातो. ज्यामुळे स्पंदने निर्माण होतात.
ही कंपनेधमनीच्या भिंतीमधून कफच्या आत हवेवाटे ट्रान्सड्यूसरमध्ये हस्तांतरित केली जातात जी विद्युत सिग्नलमध्ये रूपांतरितहोतात आणी आपल्याला मापाचे आकडे दिसतात.
हे नवे डिजिटल डिव्हाइसेस कधीकधी अॅस्कल्टेटरी अॅनेरोइड डिव्हाइसेसपेक्षा वापरण्यास संथ वाटतात परंतु ते अधिक अचूक असतात.
जुन्या उपकरणांमध्ये पारा वापरला जाई.
अलीकडे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्येपार्याचा वापर बंद व्हावा असा दबाव पर्यावरणविदांकडून येत आहे आणि युरोपमधील इतर देशांच्या बरोबरीने, रक्तदाब मोजण्यासाठीची ही पारा असलेली उपकरणे तयार होणे लवकरच जगभरात थांबविले जाण्याची शक्यता आहे.
तर ही होती डॉक्टरांच्या आवडत्या आणि मुख्य सहाय्यक उपकरणांची माहिती. ह्या उपकरणांच्या मदतीने डॉक्टर आजारचे निदान कसे करतात हे आता तुम्हाला कळले असेलच.
आता पावसाळा सुरू झालाय म्हणजे साथीचे आजार येणार आणि त्यासाठी दवाखान्यात एक तरी फेरी होणारच. तेव्हा डॉक्टरांकडे गेल्यावर वरील माहितीच्या आधारे सहज म्हणून ह्या उपकरणांचे निरीक्षण जरूर करा. बाकी काळजी घ्या. स्वस्थ रहा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.