' लॉकडाऊननंतर राजस्थानला फिरायला जाणार असाल तर ही १० ठिकाणे चुकवू नका – InMarathi

लॉकडाऊननंतर राजस्थानला फिरायला जाणार असाल तर ही १० ठिकाणे चुकवू नका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

परीक्षा आटोपल्यावर वेध लागतात सहलींचे. अशा वेळेस आयोजन महत्वाचे.

प्रवास दूरचा असेल तर विमान किंवा रेल्वेने जाणे सोयीचे ठरते. रेल्वेसाठी ९० दिवस आधी बुकिंग करावे लागते. विमानप्रवास असेल तर ऍडव्हान्स बुकिंगवर डिस्काउंट मिळते.

राजस्थान सारखे दूरचे ठिकाण पक्के केले असेल तर ९० दिवस आधीच रेल्वे किंवा विमानाचे बुकिंग करून ठेवायचे.

“रंगीलो राजस्थान” पहायचा असेल तर ही काळजी घेणे आवश्यकच. ऐनवेळी तिकिटे मिळणे कठीणच.

“आवोजी, पधारो म्हारो देश” म्हणत राजस्थान दोन्ही बाहू फैलावत आपले स्वागत करण्यास उत्सुक असतो कायमच. राजस्थान म्हणजे भव्यदिव्य राजमहाल, पुष्करण्या, भव्य किल्ले वाळवंट, उंट आणि कला व संगीताचा अजोड मिलाफ.

 

rajasthan inmarathi

 

राजस्थान म्हटलं की आठवतो चितोडगड आणि महाराणा प्रताप. राजस्थान शौर्याची कहाणी तर आहेच पण आपल्या वेगळ्या राजस्थानी बांधकाम शैलीसाठी देखील प्रसिद्ध आहे.

राजस्थान जितका त्याच्या रंगबिरंगी पोशाख आणि पगडी साठी प्रसिद्ध आहे तितकाच राजस्थानी संगीतासाठी देखील प्रसिद्ध आहे.

अशा या रंगीलो राजस्थान मधील दहा अशी ठिकाणे आहेत जी चुकवून चालणारच नाही. प्रत्येक ठिकाणचे आपले असे वैशिष्ट्य आहे.
चला तर बघुया, कोणती ठिकाणे आहेत ही आणि तेथील वैशिष्ट्ये काय आहेत ती.

(१) जयपूर

जयपूर शहर प्रसिद्ध आहे ते गुलाबी दगडातील बांधकामामुळे. त्यामुळेच या शहराला “पिंक सिटी” म्हटले जाते. जुने शहर खरोखरच तेथील मोठ्या हवेल्यांच्या गुलाबी भिंतीमुळे गुलाबी शहर म्हणूनच ओळखले जाते.

 

amber fort inmarathi

 

येथील अंबर फोर्ट खूपच प्रसिद्ध. साधारणपणे अर्ध्यातासाच्या प्रवासानंतर आपण इथे पोचतो. जयपूर शहर बांधून होईतो अंबर फोर्ट हेच जयपूरच्या शासकांचे रहाण्याचे ठिकाण होते.

टोलेजंग हवेल्या, मोठमोठे दरबार, सुंदर बगीचे, हवेल्यांमधील कचकामाची कलाकुसर, हे सर्व बघून थक्क व्हायला होते. जयपूर पासून इकडे यायला बस मिळतात.

प्रवेश फी १००रुपये आहे. परदेशी प्रवाशांसाठी ५०० रुपये आहे.सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत बघता येतो. हत्तीवरून जायचे असेल तर सकाळी ११ चा आतच यावे लागते.

सिटी पॅलेस

राजस्थानचा शाही महल प्रसिद्ध आहे तो राजस्थानी आणि मुगल शैलीच्या एकत्रीकरण मधून बांधल्या गेलेल्या इमारतींमुळे. येथील चंद्रमहालात अजूनही राजवंशाचे वारसदार रहात आहेत.

 

city palace inmarathi

 

अतिशय सुरेख वैभवी वास्तू जलीय ती मोठ्या ऐसपैस अंगण आणि बागांनी.

हवामहाल

 

hawa mahal inmarathi

 

ही वैशिष्ट्यपूर्ण वास्तू त्याच्या हवेशीर खिडक्यांमुळे आणि अजोड बांधणीमुळे जयपूरचे ठळक वैशिष्ट्य बनली आहे. सिटी पॅलेसच्या समोरच ही वास्तू आहे. राजवंशातील स्त्रियांना इतरांच्या दृष्टीस न पडता शहराचे अवलोकन करता यावे यासाठी हिची निर्मिती झाली.

जंतरमंतर

दिल्लीतील जंतरमंतर प्रमाणेच ही वेधशाळा राजा जयसिंग २ याने १७२७ ते १७३४ या काळात बांधली.

 

jantar mantar inmarathi

 

इथे लहानमोठी १४ बांधकामे असून ती काळाचा वेध घेणारी होती. अजूनही व्यवस्थित आहेत.

नाहरगढ फोर्ट

टायगर फोर्ट म्हणून देखील हा किल्ला परिचित आहे. येथील शिल्पकला, वॅक्स म्युझियम बघण्यासारखे आहे.

 

Nahargarh-Fort-Jaipur- inmarathi

 

रात्री दिव्यांनी उजळून निघणारा किल्ला अप्रतिम सुंदर दिसतो.

जयगड फोर्ट

याच्या भव्यतेसाठी आणि जगातील सर्वात मोठ्या जयवाण तोफेसाठी प्रसिद्ध आहे.

 

jaigarh-fort-jaipur inmarathi

 

मार्केट

जयपूर प्रसिद्ध आहे ते रंगबिरंगी पोशाख, पगड्या, जयपूर चादर, दागिने, लाखेच्या नाक्षीकामातील बांगड्या आणि संगमरवरातील कलाकुसर असलेल्या वस्तूंसाठी. खरेदीसाठी इथे भरपूर वस्तू उपलब्ध आहेत .

 

market jaipur inmarathi

 

(२) उदयपूर

जयपूर पाठोपाठ महत्वाचे शहर.महालांचे शहर ही त्याची खास ओळख. “मोस्ट रोमँटिक सिटी ऑफ इंडिया” म्हणून देखील ओळखले जाते. उदयपूरचा महाल ऐश्वर्या साठी प्रसिद्धच. येथील म्युझियम राजवंशातील व्यक्तींचे फोटो व वस्तू यांनी सजलेले आहे.

 

udaipur inmarathi

 

उदयपुरमधील बहुतेक महालांचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आले असून चित्रसृष्टीतील तसेच औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचे विवाह सोहळे इथे राजसी थाटात संपन्न होतात.

उदयपूरमधे हवेल्यांच्या इतकेच येथील तलाव देखील प्रसिद्ध आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

जगदीश मंदिर, मान्सून महल, शिल्पग्राम, करणीमाता रोप वे ही काही प्रसिद्ध ठिकाणे आवर्जून पहावी अशी.

इथून जवळच चितोड शहर आहे आणि इथला प्रसिद्ध चितोडगड तर पाहायलाच हवा. मीराबाई, राणी पद्मिनी या इथल्याच. राणी पद्मिनीचे राजपुतांच्या मनातील स्थान अढळच. राणाप्रतापने याच चितोडगडसाठी मोगलांशी मोठा संघर्ष केला.

आपल्या मालकाला साथ देणारा त्याचा चेतक घोडा देखील कहाण्यांच्या केंद्रस्थानी आहे.

युनेस्कोने पहाडी किल्ल्यांच्या वर्गात जागतिक वारसा म्हणून घोषित केलेला कुंभलगड उदयपुरपासून जवळच आहे.

 

kumbhalgarh inmarathi

 

राणा कुंभाने १५ व्या शतकात हा किल्ला बांधला.याची तटबंदी ३८ किमी लांबीची आहे. चीनच्या भिंतीनंतर याच तटबंदीचा नंबर लागतो. राणा प्रतापचा जन्म याच किल्ल्यावर झाला होता.

(३) जैसलमेर

थरचे वाळवंट ही इथली खासियत. जगातील प्रसिद्ध वाळवंट त्यातील वाळूच्या टेकड्यांमुळे सुंदर दिसते. जैसलमेर राजवाडे, हवेल्या आणि मंदिरांसाठी प्रसिध्द आहे.

 

thar desert inmarathi

 

(४) जोधपूर 

जयपूर जसे पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध आहे तसेच जोधपूर प्रसिद्ध आहे “ब्ल्यू सिटी” म्हणून. निळ्या रंगात रंगवलेली घरे हे येथील वैशिष्ट्य.

 

jodhpur inmarathi

 

जोधपूरच्या आसमंतातील किल्ले हे व्यवस्थित जतन करून ठेवले आहेत. राजस्थानी आणि मुगल शैलीचा मिलाफ असलेले राजवाडे ही येथील खासियत आहे. राजवाड्यातील चित्रकला निव्वळ अप्रतिम…

येथील बहुतांशी राजवाडे हे हॉटेलमध्ये रुपांतरीत केले आहेत.

उमेदभवन तसेच अजितभवन हे राजवाडे हॉटेल मधे रुपांतरीत केल्याने लग्न सोहळ्यासाठी यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. कोरीवकाम केलेले फर्निचर हे देखील येथील वैशिष्ट्य.येथील मार्केट हे प्रवाशांचे मुख्य आकर्षण.

(५) पुष्कर

हे राजस्थानमधील शांत शहर. परंतु इथे ट्रेकर्स आणि हिप्पींची वर्दळ चालू असते.

 

pushkar inmarathi

ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमधे इथे उंटांचा मेळावा असतो. त्यावेळी राजस्थानच्या पारंपरिक चालीरीती, नृत्य, गायन वादन बघायला मिळते. यंदा मात्र हा मेळावा भरणं अशक्यच दिसतंय…

(६) रणथंबोर

रणथंबोर नाव उच्चारलं की डायरेक्ट वाघांचा गुरगुराट कानी पडावा इतकं हे नाव प्रसिद्ध झालंय ते इथल्या नॅशनल पार्क मुळे. भारतातील वाघांची संख्या रोडावत चाललेली असताना इकडे मात्र वाघांची संख्या वाढत आहे.

 

ranthambore inmarathi

 

मुळात हा १० व्या शतकात बांधलेल्या किल्ल्याचा परिसर आहे. जिथे तिथे भग्नावस्थेतील किल्याच्या तटबंदीचे किंवा इमारतींचे अवशेष दृष्टीस पडतात. अनेक घनघोर लढायांचा साक्षीदार असलेला हा परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला.

पर्यटकांची मोठी पसंती आहे या भागाला.

(७) शेखावटी

खास राजस्थानी कलेचे केंद्र म्हणून हा भाग ओळखला जातो. तुम्हाला कलेत रुची असेल तर जरूर या भागाला भेट द्या.

 

shekhawati inmarathi

 

महालांच्या किंवा हवेल्यांच्या भिंतीवरील पेंटिंग्ज आणि त्यांचे रंगकाम जे अजूनही टिकून आहे ते बघणे म्हणजे आर्ट लव्हर्स साठी पर्वणी आहे.

(८) बिकानेर

वाळवंटातील एक शहर.. हवेल्यानी सजलेले … इथल्या “नमकीन” पदार्थांनी खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारे. पण एवढीच ओळख नाही या शहराची.

 

bikaner inmarathi g

 

राजपुतांची देवी करणीमाता हिचे उंदीर मंदिर खुप प्रसिद्ध आहे. या मंदिरात उंदरांचा मोठा वावर असूनही त्यांचा कोणालाच त्रास होत नाही.

इथे करणीमाता यात्रेचे आयोजन होते. भाविक प्रचंड प्रमाणात येतात.

दरवर्षी जानेवारी महिन्यात “कॅमल फेस्टिवल”चे आयोजन केले जाते,तेव्हा पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.

(९) बुंदी

बुंदी शहर प्रसिद्ध आहे ते इथले तलाव, मंदिरं आणि बाजारांसाठी! खास राजस्थानी कलाकुसरीच्या वस्तू,कपडे यांच्यासाठी पर्यटक मार्केटमध्ये गर्दी करतात. बुंदीचा राजवाडा कलाकुसर आणि पेंटिंग्जसाठी प्रसिद्ध आहे.

 

Bundi-Rajasthan inmarathi

 

जुन्या शहरातील हवेशीर गल्ल्या पायी भटकण्याची हौस भागवतात. जोधपूर प्रमाणेच बुंदी शहर “ब्ल्यू सिटी” म्हणून प्रसिद्ध आहे.

(१०) ग्रामीण राजस्थान

राजस्थानचा ग्रामीण भाग शहरी भागापेक्षा जास्त वेधक आहे. अतिशय साधे लोक, परंपरा जपणारा वैष्णोई समाज हा इथला निसर्गप्रेमी आणि निसर्गसंरक्षक समाज. याच समाजाने वृक्षतोडी विरोधात चिपको आंदोलन सुरू केले ते पुढे जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले.

 

rajasthan village inmarathi

 

पाली हे देखील ठिकाण प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला शेती आणि शेतीपूरक व्यवसाय बघता येतील. ग्रामीण जीवनाची ओळख करून घेता येईल. खास राजस्थानी पदार्थ खाता येतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राजस्थानी संगीत आणि लोककला बघायला मिळतील.

राहण्यासाठी घरगुती सोय होते तसेच रॉयल हॉटेलमधे मुक्काम घेता येईल. कोणत्याही राज्याची खरी ओळख तेथील ग्रामीण भागामुळे होते.

तर राजस्थानला जाणार असाल तर ही ठिकाणं अजिबातच चुकवू नका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?