' क्रिकेटचे हे ७ नियम पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये लागू केले जाणार आहेत.. – InMarathi

क्रिकेटचे हे ७ नियम पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये लागू केले जाणार आहेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

क्रिकेट विश्वचषकाला येत्या आजपासून सुरुवात होत आहे. क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या इंग्लंडमध्ये यंदाचा विश्वचषक रंगत आहे.

क्रिकेट विश्वचषकासाठी आयसीसीद्वारे काही नियम बदलण्यात आले आहे. वनडे क्रिकेटसाठी हे नियम पूर्वीच लागू केले असून हे नवीन नियम पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये लागू होत आहेत .

 

world cup trophy inmarathi

वनडे क्रिकेट मध्ये याचा काय फरक पडणार हे पाहणं उत्सुक्याच ठरणार आहे. यंदाचा विश्वचषक हा इंग्लंडमध्ये जरी होत असला तरी तरी मागील तीन चार वर्षा पासून तेथील खेळपट्टी ही फलंदाजीला अनुकूल अशा स्वरूपाची तयार करण्यात येत आहे.

विश्वचषक सुरु होण्याच्या अगोदर सुरु झालेल्या सराव सामन्यात सुद्धा ३५०- ४०० पेक्षा जास्त धावसंख्या झालेली आपण बघितली आहे.

खेळपट्टी जरी फलंदाजासाठी अनुकूल असली पण जेव्हा ढगाळ वातावरण असेलं तेव्हा गोलंदाजांना तेव्हा बॉल काटा बदलेल हे मात्र नक्की आहे. हे बदल कोणासाठी लाभदायी ठरतील हे येणारी वेळच सांगेल

वर्ल्डकपमध्ये सात नवे नियम पहिल्यांदाच लागू होणार:- 

१. हेल्मेटला बॉल लागून झेल टिपल्यास बाद

या नियमा नुसार, जर फलंदाजाने मारलेला फटका क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला लागून उडाला आणि तो दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने झेलल्यास फलंदाजाला बाद ठरवलं जाईल.

 

ball hitting helmet inmarathi
India.com

मात्र हँडल द बॉलच्या स्थितीत फलंदाज नाबाद असेल. पूर्वी जर असा प्रकार घडला तर खेळाडू नाबाद दिला जात होता.

२. पंचासोबत हुज्जत घालणारे खेळाडू मैदानाबाहेर :-

कित्येकदा भर मैदानात अनेक खेळाडू पंचांचा नियम न पटल्याने त्यांच्याशी भांडण करतात. पंचाना वाईट बोलतात. मात्र यंदाच्या विश्वचषकादरम्यान पंचांशी वाद घालणाऱ्या खेळाडूंना पंच थेट मैदानाबाहेर काढू शकतात.

 

umpire arguments inmarathi
Sportskeeda

पंचांशी वाद घालणाऱ्या खेळाडूंना आयसीसीच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’ च्या १.३  नियमाद्वारे दोषी ठरवून पंच मॅचदरम्यान बाहेर काढू शकतात.
या नवीन नियमानुसार पंचाच्या हातात आणखी अधिकार आले आहेत.

आपण खूप वेळा पंचचा निर्णय न पटल्यामुळे खेळाडूंना पंचाशी वाद घालताना पाहिलं आहे.

हा नियम फुटबॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यापासूनच प्रेरणा घेत हा नियम लागू करण्यात आला आहे. खेळाडूंना पंचाशी वाद घालणं महागात पडू शकत.

३.रिव्ह्यू राहणार सुरक्षित

बऱ्याचदा मॅचदरम्यान दोन्ही संघ डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम अर्थात डीआरएस वापर करत रिव्ह्यू मागतात. अनेकवेळा आपण असं बघतो कि संघाने रिव्ह्यू घेतला जर पंचानी खेळाडूला बाद दिले असेल.

 

cricket review inmarathi
The Hindu

पण चेंडू चा काही भाग स्टंप ला लागून जात असेल तेव्हा खेळाडूला बादच दिले जाते तो निर्णय खेळाडूला मान्य करावा लागतो.
यावेळी कधीकधी पंचानी दिलेला निर्णय अंतिम ठेवला जातो. यामुळे संघांकडे असलेला रिव्ह्यू वाया जातो.

मात्र यंदाच्या विश्वचषकादरम्यान संघाने डीआरएसचा वापर करत रिव्ह्यू मागितला, त्यावेळीही पंचांचा निणर्य म्हणजेच(Umpairs call ) कायम राहिल्यास संघांकडच्या रिव्ह्यूची संख्या कमी होणार नाही.

रिव्ह्यू सुरक्षित राहील. हा निर्णय सर्वच संघाच्या दृष्टीने फायेदशीर ठरेल.

४. चेंडू दोनदा बाऊन्स झाल्यास ‘नो बॉल’

कित्येकदा मॅचदरम्यान गोलंदाजाने चेंडू फेकल्यानंतर चेंडू दोनदा बाऊन्स होतो. मात्र यंदा विश्वचषकादरम्यान चेंडू दोनदा बाऊन्स होऊन फलंदाजाकडे गेल्यास तो नो बॉल देण्यात येणार आहे.

 

bouncer-inmarathi
The Cricket Paper

आयसीसीने याबाबतचा नवीन नियम लागू केला आहे. हा चेंडू फक्त नो बॉलच दिला जाणार नाही तर त्या सोबत फ्री हिट सुद्धा खेळाडूला भेटणार आहे.

५. क्रिजवरील रेषेवर बॅट असल्यास फलंदाज आऊट

बाद होण्याच्या भितीने अनेकदा धाव घेताना खेळाडू डाय मारुन धावपट्टीच्या रेषेवर बॅट ठेवतात. बॅट रेषेवर असल्याने खेळाडू नाबाद ठरतो.
मात्र आयसीसीच्या नव्या नियमावलीनुसार, खेळाडूची बॅट ऑन द लाईनवर असेल तर त्याला बाद ठरवलं जाणार आहे.

 

dhoni final run out inmarathi
Sportskeeda

मात्र जर बॅट किंवा फलंदाज ऑन द लाईनच्या आत असेल तर फलंदाज नाबाद असणार आहे.

हा निर्णय नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणारा आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात महेंद्र सिंह धोनी चा धावबाद याच नियमात येतो.

धोनीची बॅट ही त्या लाईन वर होती म्हणून धोनीला बाद देण्यात आले होते . या निर्णयावर वाद निर्माण झाला होता.

६. बॅटचे मापही निश्चित

कित्येकदा फलंदाजाच्या बॅटचे माप नियमानुसार नसल्याचा दावा केला जातो. मात्र यंदा विश्वचषकादरम्यान बॅटची लांबी आणि जाडी किती असावी याचे माप देण्यात आले आहे.

 

bat size inmarathi
Trophi Cricket

या नव्या नियमानुसार, बॅटची रुंदी १०८  मि.मी, जाडी ६७ मि.मी असावी असे सांगण्यात आले आहे. त्याशिवाय बॅटची कडा ४०  मि.मीपेक्षा जास्त नसावी असेही फलंदाजांना सांगण्यात आलं आहे.

तसेच बॅटच्या मापाबाबत पंचांना संशय आल्यास, पंच लगेचच माप तपासू शकतात. बॅट चे मॅप निश्चित करण्याचे कारण म्हणजे फलंदाज हे त्याच्या बॅट चे मॅप त्याच्या सोयी नुसार ठेवायचे.

काही फलंदाजाच्या बॅटची लांबी जास्त असायची तर काहींची जाडी याचा फटका गोलंदाजांना बसायचा. काही वेळा फक्त बॅट चा कट बसून सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेल्याचे आपण पहिले आहे.

गोलंदाजानसाठी हा नियम फायदेशीर ठरेल हे नक्की.

७. बाय आणि लेग बायच्या धावा वेगवेगळ्या असणार

गोलंदाजाने नो बॉल टाकल्यास फलंदाजाला बाय किंवा लेग बायद्वारे अतिरिक्त धावांमध्ये धरल्या जातात. मात्र विश्वचषकादरम्यान नो बॉलद्वारे मिळणाऱ्या अतिरिक्त धावा या वेगवेगळ्या ग्राह्य धरल्या जाणार आहे.

 

leg bye inmarathi
cricketeurope.com

म्हणजेच गोलंदाजाने नो बॉल टाकल्यानंतरच्या बाय किंवा लेग बाय अशा धावांची विभागणी करण्यात येणार आहे.

या नवीन नियमांचा फायदा कोणाला होईल आपल्याला येणाऱ्या वेळेत कळेलच.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?