ब्लॅक टी पाहून नाकं मुरडताय? वाचा ब्लॅक टी चे हे फायदे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ब्लॅक टी म्हटलं की बहुतेकांची तोंड वाकडी होतात. कारण त्यात चव नसते आणि चवीशिवाय चहाला मज्जा नाही असे आपले मत! त्यामुळे बहुतेक जण ब्लॅक टी च्या वाट्याला जात नाही. तर काही जणांना उत्तम आरोग्य राखण्याच्या नावाखाली ब्लॅक टी पिणे म्हणजे नाईलाज वाटतो. पण तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की भले ब्लॅक टी चवीला वाईट असली तरी ब्लॅक टी शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. कदाचित तुम्हाला देखील ब्लॅक टी चे हे फायदे माहित नसावेत म्हणून तुम्ही ब्लॅक टी ला पाहून नाक मुरडत असाल पण एकदा का तुम्हाला हे फायदे लक्षात आले तर तुम्ही देखील ब्लॅक टी च्या प्रेमात पडाल आणि तेव्हा तुम्हाला समजेल की काही लोक सतत ब्लॅक टी का पितात!
चला तर मग जाणून घेऊया या गुणकारी ब्लॅक टी चे अतिशय उपयुक्त फायदे !
अन्य पेयांच्या तुलनेत ब्लॅक टीमध्ये कॅफीनची मात्रा कमी असते. ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राखला जातो.
ब्लॅक टीमध्ये पॉलिफिनॉल्स असते ज्यामुळे तंबाखू आणि इतर विषारी पदार्थांमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो.
ब्लॅक टी चे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
ब्लॅक टी मध्ये असलेले पॉलिफिनॉल्ससारखे अँटी ऑक्सिडंट्स कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत होते.
तणावापासून बचाव होतो. दिवसभराचा थकवा घालवण्यास ब्लॅक टी फायदेशीर आहे.
ब्लॅक टी मधील तत्वामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते आणि डायबिटीजचा धोका कमी होतो. तसेच पाचनक्रिया मजबूत होते.
टी ट्रेड हेल्थ रिसर्च असोसिएशनच्या माहितीनुसार ब्लॅक टी मुळे तोंडात कॅव्हिटी निर्माण होत नाही तसेच दातांचे नुकसान होण्यापासून बचाव होतो आणि ब्लॅक टीमुळे हृद्याचे आरोग्यही चांगले राहते.
एकाच गोष्टीतून एवढे फायदे होत असताना त्या गोष्टीला नकार तरी का बरं द्यायचा ?!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.