' आंतरराष्ट्रीय माध्यमांनी निकालांची घेतलेली अशी दखल भारताचं जगातलं स्थान अधोरेखित करते – InMarathi

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी निकालांची घेतलेली अशी दखल भारताचं जगातलं स्थान अधोरेखित करते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या अद्वितीय यशामुळे, सबंध देश ढवळून निघाला आहे. देशभरात यामुळे उत्साहाचं वातावरण आहे.

कॉंग्रेसचा ह्या निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला  असून मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर काय चमत्कार घडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोदींनी मागच्या वेळी पेक्षा २० जागा  जास्त मिळवल्या असल्याने सर्वत्र मोदीलाट कायम असल्याची भावना वक्त केली जात आहे.

भारतीय मिडीयाने निकालाच्या दिवशी दिवसभर मोदी विजयाचं लाईव्ह कव्हरेज केलं आहे.

मोदींच्या या विजयाची दखल आंतरराष्ट्रीय मीडीयाने देखील घेतली असून जगभरातल्या मिडीयाने मोदींच्या अद्वितीय विजयाचे वार्तांकन केले आहे.

अंतरराष्ट्रीय मिडियाने मोदींच्या विजयाचे केलेले वार्तांकन …

१) डेलीमेल 

डेलीमेल ह्या ब्रिटीश वृत्तसंस्थेने केलेल्या वृतांकना नुसार ६८ वर्षीय नरेंद्र मोदींनी आपली प्रतिमा हि लोकांचा सेवक म्हणून निर्माण केली आणि ह्या  संन्याशासारखी प्रतिमा निर्माण करून आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांवर होणारी व्यक्तिमत्व केंद्रित करण्यात यश मिळवले आहे.

 

dailymail inmarathi
Dailymail

 

२) अल झझिरा

अल झझिरा ह्या अंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृतांकनाच्या हवाल्यानुसार ….

मोदी हे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत ज्यांनी पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर पुन्हा  पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे.

 

al jajeera inmarathi

 

३) BBC 

BBC ह्या अंतरराष्ट्रीय वृत्तांकन संस्थेने मोदींच्या विजयाचे वृत्तांकन अश्या प्रकारे केले आहे ..

भारतात सध्या सत्ताधारी असलेल्या नरेंद्र मोदींच्या भाजपाने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला निवडणुकीत धूळ चारली आहे जो दीर्घकाळ सत्तेत राहिला आहे.

bbc inmarathi

 

४) द गार्डियन 

द गार्डियन ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे कि, ” आता हे  काचेसारखं सुस्पष्ट झालं आहे कि भारतीय राजकारण हे हिंदू वर्चस्ववादाच्या नव्या युगात प्रवेश करत असून त्याला नरेंद्र मोदी हा चेहरा लाभला आहे”

 

the guardian inmarathi

 

५) न्यूयॉर्क टाईम्स  

न्यूयॉर्क टाईम्स ह्या प्रसिद्ध वृत्तपत्राने वृतांकन करताना म्हटलं आहे कि या विजयासोबत नरेंद्र मोदी हे गेल्या अनेक दशकात भारतात तयार झालेले सर्वात शक्तिशाली आणि विभाजनवादी नेते आहेत.

nytimes inmarathi

६) CNN 

CNN ह्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केलेल्या वृतांकना नुसार नरेंद्र मोदी हे मोठ्या विजयाकडे आगेकूच करत असून, त्यांच्या स्वपक्षीय लोकांच्या अपेक्षे पेक्षा उत्तम कामगिरी त्यांनी ह्या निवडणुकीत करून दाखवली आहे.

 

CNN inmarathi

 

७) गल्फ न्यूज 

गल्फ न्यूज ह्या आखाती देशातील वाहिनीने आपल्या संकेतस्थळावर आकर्षक माथळ्याखाली मोदींच्या विजयाचे वर्णन केले आहे.

 

gulf news inamarthi

 

८) वॉशिंग्टन पोस्ट    

वॉशिंग्टन पोस्ट ने मोदींच्या विजयाचं वर्णन करताना म्हटलं आहे कि मोदींच्या सशक्त सक्षम हिंदू भारताच्या कल्पनेला मतदारांनी साथ देत त्यांना प्रचंड बहुमत देऊ केली आहे.

मोदींच्या धार्मिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेतून आकारास येणाऱ्या हिंदुराष्ट्रासाठी हा कौल असून देशात धर्मनिरपेक्ष तत्वांचा पाया रुजवणाऱ्या नेत्यांना देशाने झिडकारले आहे.

 

WASHINGTON POST INMARATHI

भारतात हिंदु बरोबर मुस्लीम,सिख , ख्रिस्ति आणि बौध हे देखील धर्म संप्रदाय आहे.

भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या या निवडणूक निकालाचे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी अशा प्रकारे विश्लेषण केले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?