' व्हॅट्सऍपने एकही जाहिरात नसताना तब्बल १३ मिलियन डॉलर्स कसे कमावले? जाणून घ्या.. – InMarathi

व्हॅट्सऍपने एकही जाहिरात नसताना तब्बल १३ मिलियन डॉलर्स कसे कमावले? जाणून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

काही लोकं गंमत म्हणून अॅप बनवतात तर काही जण पैसे कमवण्यासाठी अॅप बनवतात. तुम्हाला जर या टेक्नोलॉजीच्या गोष्टीत रस असेल तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक खास बातमी!

२००९ मध्ये ब्रायन ऍक्टन आणि जॅन कोम यांनी महागड्या एसएमएस सेवेला पर्याय म्हणून व्हॉटसअपची निर्मिती केली.

 

whatsapp founder inmarathi
nymag.com

ज्या कुणाकडे हा अॅप असेल त्यांना एकमेकांना टेक्स्ट मेसेज, कॉन्टॅक्ट, पिक्चर पाठवणे आणि मिळवणे सोपे जाऊ लागले तेही अगदी मोफत!

आयफोन्स, अँड्रॉइड्स, ब्लॅकबेरीज, विंडोज फोन्स, नोकिया फोन्स आणि अलीकडे डेस्कटॉपवर देखील हे अॅप वापरता येते.
व्हॉटसअप पूर्णतः फ्री कधीच नव्हते.

एसएमएस सर्विसला चांगला पर्याय देण्याच्या हेतूने ही कंपनी अस्तित्वात आली. जगभरात व्हॉटसअपची संदेश सेवा सुरु आहे. इमेल आणि गुगल करण्यासाठी आपण जो डाटा प्लान वापरतो तोच डाटा प्लान व्हॉटसअप देखील वापरतं.

तरीही ग्राहकांनी पाठवलेल्या किंवा त्यांना मिळालेल्या कोणत्याही मेसेज साठी व्हॉटसअप पैसे वसूल करत नाही.
मग १९ बिलियन डॉलर कमावले कसे?

फेसबुकला व्हॉटसअपसाठी एवढी किमत मोजावी असे वाटले कारण, व्हॉटसअपचे जगभरात सोशल नेटवर्क चांगले आहे. मार्क झुकेरबर्गच्या मते फेसबुकपेक्षा व्हॉटसअपच्या एंगेजमेंट्स जास्त आहेत.

 

mark-zuckerberg- inmarathi
mark.com

१९ बिलियन डॉलर! तेही फक्त एका अॅपसाठी? विचार करा एवढ्या पैशात तुम्ही काय काय विकत घेतले असते!

फेसबुकने फेब्रुवारी २०१४ मध्ये १९ अब्ज डॉलरला व्हॉटसअप विकत घेतले आणि नऊ महिन्यात व्हॉटसअपने १,२८९,००० डॉलर उत्पन्न मिळवून दिले. फेब्रुवारी २०१८ मध्ये व्हॉटसअपचे १.५ बिलियन वापरकर्ते होते आणि फेसबुकची ती दुसरी सर्वात मोठी प्रॉपर्टी होती.

फेसबुकचे मेसेंजर आणि इन्स्टाग्रामला देखील त्याने मागे टाकले.

व्हॉटसअप प्रत्येक डाऊनलोड मागे प्रत्येकी १ डॉलर इतकी किमत वसूल करत होते. अर्थात ही किंमत काही ठराविक देशातील नागरिकांसाठीच लागू होती.

त्यातही तुम्ही कोणते डिव्हाईस वापरता त्यावर देखील ही किमत अवलंबून होती. इतर देशात एका वर्षासाठी हे अप फ्री होते, त्यानंतरच्या प्रत्येक वर्षाला वापरकर्त्यांकडून १ डॉलर वसूल केला जात होता. २०१६ मध्ये वाटसपने हे सगळेच शुल्क रद्द केले.

२०१३ पूर्वी आयफोन वर हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी १ डॉलर इतकी किंमत मोजावी लागत असे.

जे अॅप फ्रीमध्ये डाऊनलोड होतात ते इतर मार्गांनी शुल्क आकारतात. जसे की, लीईव्ह्ज, पॉवर-अप्स, आणि इतर गेम रिसोर्सेससाठी ते आपल्याकडून पैसे वसूल करतात.

 

Whatsapp inmarathi
Google Play

तुमच्या एखाद्या आवडत्या अॅपवर जाहिरात तरी तुम्ही नक्कीच पहिली असेल. जसे, वृत्तपत्र, टीव्ही चॅनेल, मासिके, साप्ताहिके, जाहिराती देतात त्याचप्रमाणे आता अॅपवर देखील जाहिरात दिसते.

आपल्या कंपनीची उत्पादने अॅपवर दिसावीत म्हणून बड्याबड्या कंपन्या त्यासाठी देखील पैसे मोजतात.

व्हॉटसअपने मात्र कधीच यापद्धतीने पैसे कमवलेले नाहीत. व्हॉटसअप काही लोकांकडून अॅप डाऊनलोड करून घेण्यसाठी पैसे मोजते.

अगदी त्यांचे लाखो वापरकर्ते आहेत असे गृहीत धरले तरी, ही रक्कम फारफार तर काही लाख डॉलर इतकीच असू शकते. मग फेसबुकला अब्जावधी डॉलर इतके पैसे मोजण्याची गरजच काय होती?

मग फेसबुकने इतके पैसे नेमके कशासाठी मोजले, हे जाणून घेणे खरेच फार गरजेचे आहे. कारण त्यावरूनच हे अॅप फेसबुकसाठी का आणि किती महत्वाचे आहे ते कळते.

फेसबुकने हे अॅप खरेदी केले तेंव्हा त्याचे ४५० मिलियन वापरकर्ते होते, त्यात आणखीन वाढ होण्याची संधी आहे.

इतक्या वापरकर्त्यांचा बिहेवियरल डाटा, कॉन्टॅक्ट लिस्ट मिळवणे आणि इतर स्पर्धकांच्या हाती हे अॅप जाऊ नये कारण, याला चांगले भविष्य असण्याची शक्यता अधिक आहे, म्हणून फेसबुकने हे अॅप विकत घेतले.

 

whatsapp users inmarathi
ProPakistani

ज्या अॅपचे लाखो वापरकर्ते आहेत, त्याचा वर्तमानात किंवा अगदी नजीकच्या भविष्यात काही फारसा फायदा नसला तरी, पुढे जाऊन कधीतरी त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. जेंव्हा कधी कमाई करण्याची योग्य संधी येईल तेंव्हा या अॅपचा वापर केला जाऊ शकतो.

जेंव्हा वेळ येईल तेंव्हा फेसबुक या अॅपच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची कमाई करू शकते.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे भविष्यात यामधून पैसे कमवण्याची चांगली संधी निर्माण होण्याची शक्यता फार आहे. कारण, एखाद्या ग्रुपमधल्या एका व्यक्तीने जरी मेसेजिंग अॅप डाऊनलोड केला तरी, त्याच्या संपर्कातील आणखीन काही व्यक्ती हे अॅप डाऊनलोड करतात.

त्या व्यक्ती आणखीन काही व्यक्तींना अॅप डाऊनलोड करण्यास प्रोत्साहन देतात. अशा पद्धतीने कमी वेळेत कित्येक पटीने याचे वापरकर्ते वाढू शकतात.

ज्यापद्धतीने व्हॉटसअपचे वापरकर्ते वाढत आहेत हे पाहता व्हॉटसअप पुन्हा एकदा फायदा मिळवण्याचे प्रमुख साधन बनू शकते.

सध्या जरी व्हॉटसअपवर जाहिराती दिसत नसल्या तरी, तुम्ही व्हॉटसअपच्या सहाय्याने तुमच्या व्यवसायाची किंवा संस्थेची माहिती इतरापर्यंत पोचवू शकता. असे फिचर व्हॉटसअपने आणले आहे, ज्यामुळे लोकांना त्यांना हवा असलेल्या वस्तू आणि सेवा ते मिळवू शकतात.

 

whatsapp buisness
KLGadgetGuy

बँक किंवा एअरलाईनसारख्या सेवांशी थेट संपर्क साधू शकतात.

व्हॉटसअपने आपली आर्थिक गणिते अजूनही सार्वजनिकरित्या जाहीर केली नसली तरी, फोर्ब्जच्या मते, व्हॉटसअपचे एकूण उत्पन्न ५ बिलियन डॉलर इतके असेल आणि २०२० पर्यंत प्रत्येक वापरकर्त्यामागे याचा खर्च ४ डॉलर इतका असू शकतो.

फेब्रुवारी २०१८ पर्यंत व्हॉटसअपचे १.५ बिलियन  इतके वापरकर्ते होते आणि दिवसाला जवळपास ६० बिलियन मेसेजेसची देवाणघेवाण होते, अशी माहिती मार्क झुकेरबर्ग यांनी दिली.

व्हॉटसअपच्या वापरकर्त्यांमध्ये दररोज लाखो लोकांची भर पडत आहे. विशेषतः अमेरिका, भारत आणि युरोपमध्ये याचे सर्वात जास्त वापरकर्ते आहेत. व्हॉटसअपच्या माध्यमातून लोकांची वैयक्तिक माहिती मिळवणे फेसबुकसाठी सोपे जाणार आहे.

 

Whatsapp users 2 inmarathi
Independent.ie

मार्क झुकेरबर्गने जरी, याचा वापर फेसबुक वरील जाहिराती नियंत्रित करण्यासाठी होणार नाही, असा शब्द दिला असला तरी, आपली माहिती फेसबुकशी शेअर करायची नाही असा विकल्प जोपर्यंत ग्राहक निवडत नाहीत तोपर्यंत तरी ते शक्य नाही.

व्हॉटसअपच्या एंड टू एंड एन्क्रिप्शनच्या सेटिंग वरून देखील वाद झाला होता. व्हॉटसअपवरील मेसेजेसची देवाणघेवाण कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला, संस्थेला किंवा खुद्द व्हॉटसअपला देखील पाहता येत नाहीत.

यामुळे दहशतवाद्यांना एकेमेकांशी संपर्क ठेवणे सोपे जाते आणि त्यांनी केलेल्या मेसेजिंगचा पुरावा देखील पोलिसांना मिळत नाही. म्हणून व्हॉटसअपने एंड टू एंड एन्क्रिप्शनचे सेटिंग बंद करण्याची मागणी जोरात सुरु होती.

पण, व्हॉटसअपने ही अट मान्य केली नाही.

येत्या काळात या अॅपच्या माध्यमातून भरपूर पैसा वसूल केला जाऊ शकतो हे ओळखल्यानेच फेसबुकने भली मोठी किंमत देऊन व्हॉटसअपची खरेदी केली. आत्ता नसली तरी, भविष्यात नक्कीच या अॅपद्वारे चांगली कमाइ होऊ शकते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?