या ऐतिहासिक घटनेमुळे माधवरावांचं ‘पेशवेपद’ ब्रिटिशांना मान्य करावं लागलं होतं..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ब्रिटीश म्हणजे आपलं तेच खरं करणारे आणि कोणालाही आपल्यापुढे झुकवण्यावर विश्वास ठेवणारे म्हणून ओळखले जातात. प्रभुत्व मिळवणे आणि कायम ठेवणे ह्याकरिता ते शक्य त्या सगळ्या प्रकारे प्रयत्न करतात.
“साम दाम दंड भेद” ह्यापैकी भेद म्हणजे फोडा आणि राज्य करा हा त्यांचा आवडता फंडा.
आपल्या बाबतीतही त्यांनी हाच फंडा वापरला आणि पुढे काय झालं ते सर्वश्रुत आहेच. आपण आपलं स्वातंत्र्य परत मिळवलं. मात्र दरम्यान आपले इंग्रजांशी अनेक प्रकारचे तह झाले. त्यातले जवळपास सगळेच तह करताना ब्रिटीशांनी मनमानी केली.
मात्र त्याकाळी एक ऐतिहासिक तह असा झाला ज्यात ह्या आडमुठ्या ब्रिटिशांना सुद्धा आपलं खरं करता आल नाही. झुकावं लागलं, कसला होता हा “करार”, काय होतं त्यात. जाणून घेऊया आजच्या ह्या लेखात.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
या मराठा-ब्रिटिश तहामुळे माधवरावांचं पेशवेपद ब्रिटिशांना मान्य करावं लागलं होतं..
ही घटना आहे १७८२ सालची. गुजरात मध्ये कर्नल गॉडर्डच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश आणि मराठ्यांचं युध्द सुरु होतं.
ब्रिटिशांकडून येणारा दबाव कमी करण्यासाठी नाना फडणविसांनी हैदरअलीला कर्नाटकावर आक्रमण करायला सांगितले. त्यानुसार हैदर अली कर्नाटकावर तुटून पडला आणि त्यानंतर ब्रिटीशांची धूळधाण उडाली.
ब्रिटीश हरायला लागले. मानसिकदृष्ट्या ब्रिटीश सैनिक कमकुवत झाले, शेवटी त्यांनी मराठ्यांशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या एंडरसन नामक अधिकाऱ्याला मराठ्यांशी बोलणी करायला पाठवले.
दरम्यान त्यासाठी बोलणी करताना ब्रिटिशांनी नाना फडणविसांना जी पत्रे लिहिली त्यातून त्यांना ह्या समझोत्याची जास्त घाई होती असे दिसून येते.
बऱ्याच पत्रव्यवहार झाल्यानंतर दिनांक १७ मी १७८२ रोजी ब्रिटीश आणि मराठ्यांच्यात हा ऐतिहासिक तह झाला. हा तह ‘सालबाई तह” ह्या नावाने ओळखला जातो.
ह्या होत्या सालबाई तहाच्या प्रमुख अटी
· ह्या तहाअंतर्गत सालसेट आणि ठाणे दुर्ग इंग्रजांच्या ताब्यात जाणार होता.
· ब्रिटिशांनी राघोबांशी म्हणजेच रघुनाथ रावांशी संबंध तोडण्याचे आश्वासन दिले आणि मराठ्यांनी रघुनाथरावांना रुपये 25,000/- इतकी मासिक पेंशन देण्याचे कबूल केले.
· ब्रिटिशांनी माधवराव द्वितीय ह्यांचे पेशवेपद स्वीकार केले आणि फतेहसिंह गायकवाड ह्यांचा बडोद्याचे शासक म्हणून स्वीकार केला. बडोद्याच्या ज्या ज्या भागाचा ब्रिटिशांनी ताबा घेतला होतं तो संपूर्ण भाग त्यांनी बडोद्याचे शासक फतेहसिंह गायकवाड ह्यांना परत केला.
· ह्या तहाचा स्वीकार झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत हैदरअली ने ब्रिटीशांचा जो प्रदेश जिंकला होता तो ब्रिटिशांना परत करावा असे ठरले. ह्याशिवाय भविष्यात त्याने पेशवे किंवा कर्नाटकाच्या नवाबाच्या बाजूने ब्रीटीशांविरोधात लढाईत सामील होऊ नये अशी अट घालण्यात आली.
जर हैदरअलीने ही अट मोडली आणि ठरल्यानुसार वागला नाही तर महादजी हैदरअलीच्या विरुध्द ब्रिटीशांच्या बाजूने लढणार होते.
· ब्रिटीश कंपनीचे व्यापार विशेषाधिकार पुनर्संचयित केले गेले.
ह्या तहावर हस्टिंग्ज ह्यांनी जून, १७८२ रोजी सह्या केल्या आणि तहाला मान्यता दिली.
मात्र दरम्यान नाना फडणवीस आणि महादजी ह्यांच्यात मतभेद झाले. कारण तिकडे नाना फडणवीसांचा खास मित्र आणि ब्रिटीशांचा कट्टर विरोधक असणारा हैदरअली अजूनही ब्रिटीशांविरुध्द लढतच होता.
हैदरअली मैदानात लढत असताना ब्रिटीशांशीअशा प्रकारचा तह करणे हे एकप्रकारे हैदरअलीचा विश्वासघात करण्यासारखे होते.
दरम्यान ७ डिसेंबर,१७८२ रोजी हैदरअलीचा मृत्यू झाला आणि नाना फडणवीसांनी २० डिसेंबर १७८२ रोजी सदर तहावर स्वाक्षरी केली.
ब्रिटिशांना सालबाई तहाची घाई का होती.
इतिहासकार स्मिथ ह्यांच्या मते सालबाई चा हा तह ब्रिटीशांसाठी चांगलाच फायद्याचा ठरला. कारण त्यामुळे भारतात इंग्रजांचे वर्चस्व स्थापित होण्यासाठी मदत झाली.
ब्रिटिशांनी मराठ्यांशी तह केला आणि म्हैसूर ला मराठ्यांपासून तोडून टाकले. त्यामुळे म्हैसूर चा शासक हैदर अली मराठ्यांच्या मदतीला मुकला. दरम्यान हैदरअलीचा मृत्यू झाला आणि त्याने सुरु केलेले ब्रिटीशांविरोधी युध्द, त्याचा मुलगा टिपू ह्याने पुढे सुरु ठेवले.
परंतु त्यात टिपूला मराठ्यांची कसलीही मदत झाली नाही. त्यामुळे ब्रिटिशांना टिपूला संपवणे सोपे झाले आणि त्यांनी मोठ्या सहजतेने म्हैसूर साम्राज्यावर ताबा मिळविला.
आता म्हैसूर ब्रिटीशांच्या ताब्यात होते. मराठ्यांना मदत करणारा हैदर अली जिवंत नव्हता आता ब्रिटिशांनी पुन्हा मराठ्यांना संपवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
ह्या युद्धादरम्यान ब्रिटिशांना संपूर्ण कल्पना आलेली होती की, मराठ्यांच्यात आपसात मतभेद आहेत. त्यांच्यात आपसात फूट पडलेली आहे.
म्हणूनच त्यांनी एकत्र येऊन ब्रिटिशांविरोधात लढण्याची शक्यता फार कमी होती, म्हणजे मराठ्यांना हरवणं बऱ्याचअंशी सोप झालेलं होतं. मात्र तसं काही झालं नाही.
पुढे २० वर्षे ब्रिटीश आणि मराठे ह्यांच्यात कुठलाही भडका उडाला नाही. शांती कायम राहिली.
मात्र ह्याचं कारण हा तह नसून काहीतरी वेगळंच होतं. त्यावेळी ब्रिटीश उत्तर भारतातील समस्यांमध्ये अडकून पडले होते आणि त्यामुळे त्यांना माराथांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळच मिळाला नाही.
ब्रिटिशांनी ह्या तहाअंतर्गत जे मिळवलं होतं त्यातलं सालसेट वगळता त्यांना सगळं पुरंदर तहाच्या अंतर्गत मराठ्यांना परत द्यावं लागलं. ह्या तहामुळे पेशव्यांचे स्थान आणखी बळकट झाले आणि महादजींचे (शिंदे) महत्व इतके वाढले की त्यांनी हळूहळू म्हैसूरवर प्रभुत्व मिळवले.
ब्रिटिशांनी शाहआलम च्या बाबतीत कसलाही हस्तक्षेप न करण्याचे आश्वासन दिले आणि त्याचा परिणाम म्हणून, शाहआलम वर महादजी शिंदे ह्यांचा प्रभाव इतका वाढला की, शाहआलमने महादजींना मुगल साम्राज्याचे वकील म्हणून नेमून टाकले.
अशाप्रकारे ह्या तहामुळे ब्रिटिशांना काहीही फायदा न होतं नुकसानच झाले आणि मराठ्यांचे वर्चस्व वाढले आणि मराठ्यांची स्थिती आणखीनच मजबूत झाली. पुढे वीस तहाअंतर्गत शांती कायम राहिली.
१८०२ साली ब्रिटीश आणि मराठ्यांत दुसरे युद्ध झाले त्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीतर्फे हा तह रद्द केला गेला होता.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.