भूतदया म्हणून भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताय, एका गंभीर प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करताय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याची भावना वेळोवेळी व्यक्त केली जात असते.
अनेकदा हि भटकी कुत्री एकटी किंवा टोळीने लोकांवर हल्ला करत असतात. ह्या हल्ल्याच्या तावडीत अबालवृद्ध सापडतात आणि गंभीर जखमी होतात.

प्रामुख्याने लहान मुलं अशा हल्ल्यांना बळी पडतात. अनेक लहान मुलांनी ह्या दुर्दैवी हल्ल्यात जीव गमावल्याच्या घटना देखील ताज्या आहेत. नुकतीच ग्वाल्हेर येथील घटना ताज्या स्वरुपाची आहे.
भारतातील प्रमुख शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. कुत्र्याचा चावा हा विषारी असतो.
कुत्र्याच्या चाव्याने रेबीज हा आजार होतो, ज्याच्यावर वेळेत उपचार केले गेले नाहीत, तर त्याचा सरळ परिणाम व्यक्तीचा मानसिक आरोग्यावर होत असतो.

सरकारी इस्पितळात यासाठी मोफत अथवा माफक दरात उपचार उपलब्ध असतो. मागील काही वर्षात श्वान दंशाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
ह्याच भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर पुण्याच्या रहिवासी असलेल्या प्राजक्ता कानेगावकर यांनी फेसबुक पोस्ट लिहली असून त्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधून घेतले आहे, त्यांच्या पोस्टला चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता
=====
आपल्या घरातल्या राहिलेल्या पोळ्या भाकरी ब्रेड घेऊन हे लोक सोसायटीच्या बाहेर येतात. लगेच कुत्र्यांचं एक टोळकं जमा होतं. सुरक्षित अंतर ठेवून हातभर लांबूनच कुत्र्यांच्या दिशेने पोळीचे तुकडे भिरकावणं चालतं.
हे झालं की मग हात पुसून घरी जाताना यांच्या मुखकमलावर मुक्या प्राण्यांवर दया दाखवली वगैरे समाधान निथळून वहात असतं.
याहीपेक्षा वरची कडी असे एक काका मला माहित आहेत. ते फिरायला येताना गाडीवर येतात. गाडी टेकडीच्या पायथ्याशी लावतात.
–
हे ही वाचा – कुत्रे तुमच्या गाडीच्या मागे लागतात ते इजा करण्यासाठी नव्हे! मग कशासाठी? वाचा…
–
टेकडीवर फिरुन आले की गाडीला किक मारायच्या आधी खिशातून दोन पारलेजीचे पाच रुपयेवाले पुडे काढतात. गाडीला किक मारतात आणि बिस्किटं टाकत टाकत जातात.

ते पुढे आणि त्यांच्या गाडीच्या मागे पळणारी कुत्र्यांची टोळी असं अनुपम दृश्य असतं ते. मला ते बघून रथामागे पळणाऱ्या गरीब लोकांवर खैरात करत जाणाऱ्या माजोरड्या राजाची हटकून आठवण येते.
एक गोष्ट आधीच सांगायला हवी होती मी, ती म्हणजे माझं कुत्रा या प्रकारावर विलक्षण प्रेम आहे.
माझ्याकडे नऊ दहा वर्षं घरात कुत्रा होता. त्याच्यासारखं जीव आणि माया लावत नाही कुणी आपल्याला. त्यामुळे मला प्राण्यांची दया वगैरे नाही, पथ्थरदिल आहे मी अशा निष्कर्षाला येण्याआधी थोडं थांबा!
या अशा खायला घालण्यातून तुम्ही त्या मुक्या प्राण्यांच्या अपेक्षा वाढवताय. त्याला असा सिलेक्टिव्ह जीव लावता येत नाही. त्याच रस्त्यावरुन जाताना केवळ हातात पिशवी आहे म्हणून कुत्र्यांनी पाठलाग केलेला आहे अशी उदाहरणं आहेत.
हे ती कुठून शिकतात? विचार करा घरातलं लहान मूल ज्याला पटकन आपण जारे दुकानातून काही घेऊन ये म्हणून सांगतो, फिरायला जाणारी वयस्कर माणसं ही सगळी या हल्ल्यांना व्हलनरेबल आहेत.

मॉर्निंग रनर्सना तर हा त्रास कायमचा आहे. विद्यापीठ – खडकी लुपवर इतक्यातच दोन तरी रनर्सना अशी भटकी कुत्री चावली आहेत. इंजेक्शन आणि ट्रीटमेंट सोपस्कारासकट जवळपास पाच ते आठ हजाराचा फटक बसला आहे. हा त्रास सगळ्या एरियात आहे.
यावर असाही एक युक्तिवाद केला जातो की मला घरी यायला उशीर होतो. मग रात्री कुत्री मागे लागतात. त्यामुळे त्यांना खायला घालून त्यांच्याशी ओळख ठेवावी लागते.
फार पटण्यासारखं कारण नाहीये हे. ते जनावर आहे कारण. ते त्याच्या इन्स्टिंक्ट्स प्रमाणेच वागणार, तुम्ही ओळख वाढवा न वाढवा त्याच्याशी.
पुणे महानगरपालिकेकडे कुत्र्यांच्या त्रासासाठी अत्यंत अपुरी यंत्रणा आहे. माझ्याच मैत्रिणीची पोटरी जवळपास फाडली होती कुत्र्याने. तक्रार केल्यानंतर नोंदवून घेतली पण कुणीही कारवाईला आलं नाही. पकडून नेलं तरी कुत्र्याला न्यूटर करुन परत आणून सोडतात.
त्यामुळे त्यांची पैदास जरी होत नसली तरी मूळ प्रश्न राहतोच. डॉग सेंटर्सच्या क्षमतेवर सुद्धा मर्यादा आहेत. मुळात इतक्या प्रमाणावर कुत्र्यांना सामावून घेणारी सेंटर्सच नाहीत.
त्यामुळे या त्रासावर किंवा समस्येवर आपणच काही आळा घातला तर घालू शकतो. यावर सगळ्यांनी मिळून विचार करण्याची गरज आहे.

हे सगळं सविस्तर लिहायचं कारण असं की तुम्ही घरची पोळी भाकरी खायला घालून फार काही भूतदया दाखवताय अशातला काही भाग नाहीये. उलट तुम्ही त्याला आयत्या अन्नाची सवय लावताय.
इतकंच प्रेम आणि कणव असेल तर त्या मुक्या जीवाची संपूर्ण जबाबदारी घ्या. अर्धवट सोयीस्कर माणुसकीने ना तुम्हाला पुण्य मिळतंय ना त्या जीवाचं कल्याण होतंय.
एक खरा घडलेला किस्सा सांगण्यासारखा आहे. गाडीवरून जाणाऱ्या एका माणसावर एका कुत्र्याने हल्ला केला. त्या माणसाने जीवाच्या आकांताने त्या कुत्र्याला लाथ मारली.
समोरुन खिशात बिस्किटं घेऊन येणारा माणूस जोरात ओरडला, “अहो मुकं जनावर आहे ते. त्याला लाथ काय मारताय?” गाडीवाला गाडीवरुन खाली उतरला.
त्याने कुत्र्याचे दात लागलेला पाय दाखवला आणि विचारलं, “मला चावल्यावर मी काय करणं अपेक्षित आहे? तुमच्यासारखं बिस्किटं खिशात घेऊन फिरु का आता?”
यानंतरचे लडिवाळ संवाद सांगण्यासारखे नाहीत पण मला वाटतं मुद्दा कळला असावा.
प्राजक्ता यांच्या पोस्टवर अनेक लोकांनी आपल्याबरोबर घडलेले प्रसंग देखील कमेंट रुपात शेयर केले आहेत, सोबतच अनेकांनी काही उपाय योजना देखील सुचवल्या आहेत.त्यातल्या निवडक प्रतिक्रिया आपण बघू ..
अमित देशपांडे यांची प्रतिक्रिया ..

अंजोर ए. पी यांची प्रतिक्रिया ….

अश्विनी मयेकर यांची प्रतिक्रीय ..

कांचन निलेश भावे यांनी आपल्या प्रतिक्रियेत एका एका मन हेलावून टाकणाऱ्या घटनेचा उल्लेख केला आहे , जी ह्या समस्येचा जळजळीत परिणाम दाखवते आहे.

===
अश्याप्रकारे प्राजक्ता यांनी पोस्टमध्ये भटके कुत्रे, श्वानप्रेमी आणि पिडीत सामन्य नागरिक यांच्यातील गुंतागुंतीच्या संघर्षाची उकल केली. सोबतच ह्या पोस्टच्या माध्यमातून प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटींवर देखील बोट ठेवलं आहे.

आज भटक्या कुत्र्यांच्या गंभीर बनत चाललेल्या समस्येवर योग्य ती उपाययोजना होण्याची गरज निर्माण झाली आहे. मुळात प्रशासन स्तरावर नाहीच तर नागरिकांमध्ये योग्य ती जागृती निर्माण करण्याची गरज प्राजक्ता यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे या महत्वपूर्ण विषयावर विचार होणे गरजेचे झाले आहे.
तुम्हाला काय वाटतं ? कमेंट्स जरूर टाका…
===
हे ही वाचा – ह्या कुत्र्यांपासून जरा ‘बचके’ रहना : अत्यंत धोकादायक कुत्र्यांच्या १० जाती
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

भटक्या कुत्र्यांना खायला घालू नका. व उरलेले अन्न कचरा कोंडाळ्यात टाकू नका. एका भागातील कुत्री दुसर्याच्या हद्दीत जात नाहीत. उदा सदाशिव पेठेतील कुत्री सारस बागेत जात नाहीत. त्यामूळे तुम्ही आपल्या भागातील कुत्र्यांना आयते अन्न घालत राहिला तर त्यांची संख्या कधीही कमी होत नाही. हॉटेल मधील शिल्लक अन्न व खाद्य गाड्यामधील शिल्लक अन्नाचे भाग बंद कंटेनर मधून गांडूळ खतासाठी वापरल्यास कुत्र्यांचा त्रास एक दोन वर्षात कमी होईल. हा प्रयोग चेन्ंनई मध्ये यशस्वीपणे राबवण्यात आला आहे.
मग
Ajun pan apan maansanchach vichar kartoy jya maansane Prithvi sampvat aanli ahe. Wah
MI tuzya ya Matashi misahmatnahi Karnpratek manusha Sajjan aaheka konchoraahe Kon doctor konnirbudhi aahe
Kahi kutre Tikhat astat Kahi Sandhya astat he gale tyanchya gunbaddal zhale aata aapan khane bad all bolu tumhiemanta tyanaaayat khaychi savvy lavta Mag Tumche kade tyanchya yogya rojgar aaheka sangatumhi rahyla prashn thayli hiskawnachya tyanakhanejogevastu tumchya habit assist ka Khanarkaybhajyachideath ka pad had bhetli tar bhetli kutra haimani aahe Rahayla prashn dayavan hibachis tumchya shahart SASE pakdtil ka Undra pakdtilpot bharne Sathi Kat
Kari Lokana aavdat khyayla dene tumhibolta retro yenasathi biscuits taking maitrikartat Kathi Karin paha Tumhikiti sprayed y’all tumchya gharaparynt sodtil