' ‘पिनकोड’ चे ६ आकडे हव्या त्या location पर्यंत अचूक पोचण्यासाठी कशी मदत करतात? वाचा – InMarathi

‘पिनकोड’ चे ६ आकडे हव्या त्या location पर्यंत अचूक पोचण्यासाठी कशी मदत करतात? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जग कितीही पुढे गेलं किंवा टेक्नॉलॉजी कितीही प्रगत झाली तरीही काही गोष्टी ह्या तशाच राहतात आणि त्यांचं महत्व कधीच कमी होत नाही, किंबहुना त्या गोष्टींशिवाय दैनंदिन व्यवहार सुद्धा ठप्प पडू शकतात!

आज तुम्ही कोणत्याही बँकेचा फॉर्म भरताना भले तो ऑनलाईन असो वा ऑफलाईन, आणि केवळ बँकेतलाच नव्हे तर कोणत्याही फॉर्म वर आपली माहिती लिहिताना आपल्या नाव आणि पत्त्याबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट नमूद करणं अनिवार्य असतं!

ती गोष्ट म्हणजे पिन कोड… होय आज इतकं तंत्रज्ञान पुढे गेलं आहे तरी तुमचा पिन कोड नसेल तर सगळंच व्यर्थ आहे!

 

pin codes inmarathi

 

ऑनलाईन शॉपिंग असो वा राहत्या घराच्या पत्त्याचा पुरावा, सगळीकडेच तुम्हाला तुमचं नाव, पत्ता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पिनकोड नमूद करणं गरजेचं असतं! 

पिन म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर होय.

१५ ऑगस्ट १९७२ पासून पिनकोड भारतामध्ये अस्तित्वात आले. हा तो काळ होता जेव्हा संवादाचे मुख्य माध्यम हे पत्रव्यवहार होते. हा पत्रव्यवहार अधिक सुलभ व्हावा म्हणून ही पिनकोडची संकल्पना अस्तित्वात आली.

पत्रावर पिनकोड लिहिला असल्याकारणाने पत्र योग्य जागी पोचलं जातं, ही गोष्ट तुम्हाला देखील माहिती आहे.

परंतु तुम्हाला या पिनकोड मागचं लॉजिक माहिती आहे का? हे पिनकोड कसे ठरवले गेले हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहित, तर आज जाणून घ्या.

 

pincode-logic-marathipizza01

 

पिनकोडचा पहिला क्रमांक विभाग कोणता आहे ते दर्शवतो

उत्तर- १ आणि २
पश्चिम- २ आणि ४
दक्षिण- ५ आणि ६
पूर्व- ७ आणि ८
आर्मी- ९

 

एकूण ९ पिन क्षेत्रे आहेत ज्यापैकी ८ क्रमांक भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी वापरली जातात तर ९ हा क्रमांक सैन्यासाठी स्वतंत्ररित्या वापरला जातो.

 

pincode-logic-marathipizza02

 

पिनकोडचा दुसरा क्रमांक राज्याचा उपविभाग किंवा पोस्टल क्षेत्र दर्शवतो. म्हणजेच पिनकोडचे पहिले दोन क्रमांक खालील क्षेत्रे दर्शवतात.

 

pincode-logic-marathipizza03

पिनकोडचा तिसरा क्रमांक जिल्हा कोणता आहे ते दर्शवतो. म्हणजेच पिनकोडचे पहिले तीन क्रमांक जिल्हा दर्शवतात.

पिनकोडचे शेवटचे तीन क्रमांक त्या जिल्हातील विभाग किंवा पोस्ट ऑफिसचे स्थान दर्शवतात जेथे पत्र पोचवायचे आहे.

इथे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  मालवणचे उदाहरण घेऊया.

मालवणचा पिनकोड आहे – ४१६६०६

यामधील ४ हा क्रमांक पश्चिम विभाग दर्शवतो. पहिले दोन क्रमांक म्हणजे ४१ हा क्रमांक हे क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे असे दर्शवते. पहिले तीन क्रमांक म्हणजे ४१६ हा क्रमांक हे क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे असे दर्शवतो.

आणि उरलेले शेवटचे तीन क्रमांक अर्थात ६०६ हा क्रमांक मालवण पोस्ट ऑफिसमध्ये पत्र पोचवायचे आहे असे दर्शवतो.

 

decode pin code inmarathi

 

अश्या प्रकारे पिनकोडच्या माध्यामातून जगभरातून कुठूनही पाठवलेलं टपाल बरोबर पत्त्यावर येऊन पोहचते. पोस्टल यंत्रणेत पिनकोडला यामुळेच इतकं महत्वं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?