' मोदींची मुलाखत स्क्रिप्टेड! फॅक्ट फाईंडिंग वेबसाईटचा गौप्यस्फोट! – InMarathi

मोदींची मुलाखत स्क्रिप्टेड! फॅक्ट फाईंडिंग वेबसाईटचा गौप्यस्फोट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लोकसभेच्या निवडणुकांच्या सत्राला सुरुवात झाल्यापासून भारतातील राजकारण ढवळून निघालं आहे. आता भारतातील ६ टप्पे संपले आहेत, असं असून देखील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रचाराची धार तीव्र होतांना दिसते आहे.

भारतातील प्रमुख राजकीय स्पर्धक असलेल्या भाजपा- काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी निवडणुक प्रचाराला सुरुवात झाल्यापासूनच विविध वृत्त-वाहिन्यांना मुलाखती देण्याचा धडाका लावला आहे.

भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी आणि काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, शशी थरूर, कमलनाथ हे प्रमुख नेते विविध इलेक्ट्रोनिक आणि प्रिंट मीडियाला मुलाखाती देत असतात.

 

narendra modi and rahul gandhi inmarathi
DNA India

या मुलाखतींच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर आपली मते हि नेतेमंडळी व्यक्त करतात. बऱ्याचदा जनतेतून विचारल्या जाणाऱ्या काही जटील प्रश्नांना देखील या नेत्यांना या मुलाखतीत तोंड द्यावे लागते.

आज भारतातल्या प्रमुख वृत्त वाहिन्यात ह्या निवडणूक रणसंग्रामाचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या नरेंद्र मोदींची आणि राहुल गांधींची मुलाखत घेण्यासाठी चढाओढ सुरु आहे. दोन्ही नेते देखील विविध वृत्त वाहिन्यांना मुलखती देत, मतदारांपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नात आहे.

भारताच्या पंतप्रधानपदाची एक टर्म उपभोगलेले नरेंद्र मोदीं पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या गादीवर विराजमान होण्यासाठी आतुर आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपाला पराभूत करून काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत.

या दोन्ही नेत्यांमध्ये सुरु असलेल्या जुगलबंदीकडे सबंध भारताचे लक्ष लागले आहे. या दोन्ही नेत्यांच्या मुलाखती बघणाऱ्या लोकांमुळे या मुलखती प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिन्यांचे टीआरपी गगनाला भिडले आहेत.

या मुलाखतीत हे नेते काय बोलत आहेत यावरून जनता त्यांची पारख करत आहे. त्यांनी या मुलाखतीत केलेल्या स्टेटमेंटस वर सोशल मिडिया ढवळून निघत आहेत.

या मुलखाती सर्वत्र चर्चेचा विषय बनत आहेत. राहुल गांधी यांनी नुकतीच जेष्ठ पत्रकार रविश कुमार यांना दिलेली मुलाखत अश्याच प्रकारे गाजत आहे.

 

rahul gandhi and ravish kumar inmarathi
PSU Watch

पण बऱ्याचदा ह्या मुलाखती पूर्वनियोजित केल्याप्रमाणे भासत आहेत, असा आरोप सोशल मिडियाच्या माध्यमातून केला जातो आहे. प्रामुख्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीच्या अनुषंगाने हा आरोप होताना दिसतो आहे.

भारताचे पंतप्रधान पद भूषवणाऱ्या नरेंद्र मोदींच्या मुलाखतीत प्रमुख प्रश्नांना बगल दिली जात असल्याची ओरड सर्वत्र उठत आहे.

काहींच्या मते तर पंतप्रधान मोदींची मुलखत हि आधी पाठांतर करून घेतल्याप्रमाणे होत आहे. यामुळे मुलाखतींच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

नुकतीच पंतप्रधान मोदींची न्यूज नेशन ह्य वृत्त वाहिनीला दिलेली मुलाखत हि अश्याच प्रकारे पूर्वनियोजित असल्याचा आरोप, प्रतिक सिन्हा ह्या मुक्त पत्रकाराने केला आहे.

नुसता आरोपच नाहीतर त्याने या संदर्भातले पुरावे देखील देऊ केले आहे, यामुळे नरेंद्र मोदी व भाजपा चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

 

narendra modi interview inmarathi
News State

ह्याच वाहिनीच्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या रडार व ढगाळ वातवरणावरच्या स्टेटमेंट मुळे बरेच ट्रोल झाले आहेत, हे विशेष !

तर प्रतिक सिन्हा यांच्या आरोपानुसार पंतप्रधान मोदींची न्यूज नेशन या वाहिनीला दिलेली मुलाखत हि आधीच ‘ठरल्या’ प्रमाणे घेण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीना या मुलाखती दरम्यान एक प्रश्न विचारण्यात आला होता कि त्यांनी सध्याच्या काळात काही लिहलं आहे का ?


त्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांनी नुकतीच एक कविता लिह्ल्याचे म्हटले आणि एक फाईल मागून घेतली आणि त्यांनी ती कविता म्हणून दाखवली. त्या फाईलमध्ये त्या कवितेच्या ओळी तर होत्याच.

पण त्या फाईलच्या वरच्या बाजूला नरेंद्र मोदींना मुलाखतकाराने विचारलेला प्रश्न स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आल्याचे दिसून येत आहे, जणू प्रश्न व उत्तर एकाखाली एक लिहलेले आहे आणि ते आधी ठरवून विचारण्यात आले आहेत.

प्रतीक यांनी पुढे दुसरी ट्विटकरून मुलाखती मधील त्या प्रश्नोत्तराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात हे स्पष्टपणे दिसून येत आहे.


प्रतीक यांनी तिसरी ट्विट करून मुलखती वर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी मुलाखतकार दीपक चौरसिया यांनी तोच प्रश्न विचारला जों कागदावर होता असे अधोरेखित केले आहे.

The part question that is visible in the papers held by PM @narendramodi matches word-to-word to the question asked by the anchor Deepak Chaursaia.


प्रतिक सिंन्हा ह्यांनी ३ ट्विटच्या थ्रेडच्या माध्यमातून हा खुलासा केला असून अजून देखील भारतीय जनता पक्षाकडून कुठलं हि स्पष्टीकरण ह्या प्रकरणी देण्यात आलेलं नसल्यामुळे आरोपाला धार आली आहे.

हे प्रकरण जसं बाहेर आलं आहे, तेव्हापासून सर्वत्र खळबळ उडाली आहे. काँग्रेस समर्थकांनी तर मोदींना धारेवर धरलं आहे.

काँग्रेस सोशल मिडिया सेल प्रमुख दिव्या स्पंदना ह्यांनी नरेंद्र मोदींच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.


अश्याप्रकारे नरेंद्र मोदींच्या मुलाखती मागील काही दिवसांपासून वादाच्या विषय बनल्या होत्या. त्यात ह्या वादाची अजून एक भर पडल्याने निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?