‘मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय’: सोशल मीडिया ट्रेण्डमधील या पोस्ट्स वाचून हसू आवरणार नाही
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
भारतात सध्या सार्वत्रिक निवडणुकांचे वातावरण आहे. खुमासदार राजकीय चर्चांनी सोशल मीडियावर सगळी जागा व्यापून टाकलीय. या वातावरणात एखाद्या नेत्याने दिलेले स्टेटमेंट दुर्लक्षित झाले तरच नवल.
राजकीय फडावर प्रत्येक विधानांची उलटसुलट चर्चा रंगते आहे. विश्लेषण, विनोद, विरोध, समर्थन, बाहेरून पाठिंबा वगैरे सगळं काही..
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एक गमतीदार स्टेटमेंट केले. ते म्हणतात,
“घड्याळाचं बटन दाबल्यावर कमळाच्या बटनासमोर लाईट लागताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय.”
असं म्हणून शरद पवार यांनी ईव्हीएम मशीन बाबत शंका व्यक्त केली. पण या विधानाची बातमी झाल्यानंतर गप्प बसतील ते नेटकरी कसले?! लगेचच #मी_माझ्या_डोळ्यांनी_पाहिलंय हा हॅशटॅग वापरून तुफान विनोदी पोस्ट न्यूजफीडवर दिसू लागल्या.
काही पवार यांच्यावर टीका करणाऱ्या, काही त्यांचे समर्थन करणाऱ्या, तर काही यापासून पूर्ण अलिप्त.
यापैकीच काही भन्नाट पोस्ट इनमराठीच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत..
१. साहेबांना पंतप्रधान पदाची शपथ घेताना..
भारताचे पंतप्रधानपॅड ही शरद पवारांची अपुरी राहिलेली आकांक्षा. या गोष्टीवर टिप्पणी करणारी ही पोस्ट..
२. “यदा यदाशी धर्मस्य” म्हणताना..
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्याचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मागे एकदा पत्रकार परिषदेत “भगवद्गीता आम्हालाही येते” असा दावा करत एक श्लोक म्हणून दाखवला. या श्लोकाचा उच्चार चुकल्याने आव्हाड यांना नेटकऱ्यांनी ट्रॉल केले. या प्रकरणावर..
३. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेहमीच हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात भूमिका घेतात, पण त्यांचे नेते शरद पवार मात्र संभाजी भिडे यांनी स्थापन केलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या दुर्गामाता दौड या उपक्रमास उपस्थित होते.. त्याबद्दल.
४. राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे प्रचारातील पहिलेवहिले भाषण चांगलेच गाजले. भाषणे करण्याची सवय नसल्यामुळे त्यांच्याकडून या भाषणात अनेक ‘चुका-मुका’ झाल्या.. त्याबद्दल..
५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांची टक्केवारी हा राहिलेला विषय. काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरी यांनी तर शिवाजी महाराजांच्या सैन्यात तब्बल ५७ टक्के मुस्लिम होते असे जाहीर करून टाकल्याचे आठवत असेल. ही टक्केवारी हळूहळू वाढत गेली आहेत.. त्यावर शेलकी टिप्पणी करणारी ही पोस्ट..
६. याच हॅशटॅगखाली शरद पवार यांच्या एकंदर राजकीय कारकिर्दीचा सविस्तर आढावा घेणारी एक पोस्ट कालपासून प्रचंड व्हायरल होत आहे. ती अशी..
—
वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसताना मी स्वतः डोळ्याने पाहिलंय
सोनिया गांधींचा विरोध करून नंतर त्यांचीच धुणी धुताना मी स्वतः डोळ्याने पाहिलंय
राज्य भारनियमन मुक्त करण्याच्या नावाखाली
शेतकऱ्यांना वाढीव वीजबिल देताना मी डोळ्याने पाहिलंय
लवासासाठी गरीब आदिवासींच्या जमिनी हडप करताना मी डोळ्याने पाहिलंय
माझा पुतण्या सिंचन घोटाळा करत असताना मी डोळ्याने पाहिलंय
मावळात शेतकऱ्यांवर गोळीबार करताना मी स्वतः डोळ्याने पाहिलंय
मी पोसलेल्या ब्रिगेडला समाजात विष कालवताना मी स्वतः डोळ्याने पाहिलंय
माझ्या पोरीला दहा एकरात 113 कोटींची वांगी घेताना मी स्वतः डोळ्याने पाहिलंय
माझ्या प्रफुल्लला एअर इंडिया विमान खरेदीत भ्रष्टाचार करताना मी माझ्या डोळ्याने पाहिलंय
तेलगीला स्टॅम्प पेपर घोटाळा करताना अन नार्को टेस्ट मध्ये माझं नाव घेताना मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलंय
पार्थला दारू पिऊन गाड्या फोडताना मी माझ्या डोळ्याने पाहिलंय
मुंबईत झालेला तेरावा बॉम्बस्फोट मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय
दाऊदच्या माणसाला माझ्या विमानात बसून प्रवास करताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय
आणि हो घड्याळाचं बटन दाबल्यावर कमळाची लाईट लागलेली मी माझ्या डोळ्याने पाहिलंय
अक्षय बिक्कड
–
७. ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे सभेला उशीर होऊ नये म्हणून पार्थ पवार यांचा रस्त्यावरून पळत निघाल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. या व्हिडिओबाबत..
८. यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप शिवसेना युतीच्या विरोधात प्रचार सभा घेतल्या. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचे अनेक आरोप यादरम्यान झाले.
या व्यतिरिक्त अनेक कमेंट्स अशा आहेत की त्या वाचून हसू आवरत नाही..
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.