' क्रिकेटचा महासंग्राम : २०१९ क्रिकेट विश्वचषकाबद्दल पडद्यामागच्या दहा गोष्टी – InMarathi

क्रिकेटचा महासंग्राम : २०१९ क्रिकेट विश्वचषकाबद्दल पडद्यामागच्या दहा गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेली आयपीएल स्पर्धा कधी होणार हे अखेर ठरलं आहे. सप्टेंबर महिन्यात सुरु होणार असलेल्या स्पर्धेची जबरदस्त चर्चा  आहे.

टी-२० विश्वचषक मात्र लांबणीवर पडलाय. हा विश्वचषक आता पुढील वर्षी, म्हणजे २०२१मध्ये भारतात पार पडेल. भारतात विश्वचषक होणार, हे कळल्यापासून सारेच क्रिकेटप्रेमी खुश आहेत.

यानिमित्ताने पुन्हा एकदा भारतीय मंडळी आठवणीत रमली आहेत. मागील वर्षी पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकात, उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

परंतु, अनेक आठवणींचा खजिना यानिमित्ताने उघडला आहे. मागील वर्षी अनेक वर्षांनंतर, ही स्पर्धा फक्त १० देशांमध्ये खेळवण्यात आली.

क्रिकेट खेळणाऱ्या देशांतील पहिल्या ८ देशांना या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला.  आठ संघांना एक पात्रता खेळावी लागली.  त्यातून २ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले. अशाप्रकारे एकूण १० संघाच्या दरम्यान ही स्पर्धा खेळली गेली.

 

world cup inmarathi
Twitter

 

विश्वचषक स्पर्धेचे आयोजन दर चार वर्षांनी होते. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेची काही खास गोष्टी घडल्या. ज्यावर आपण आज नजर टाकणार आहोत.

१) बाराव्या विश्वचषक स्पर्धेचा यजमान इंग्लंड

ही बारावी विश्वचषक स्पर्धा होती. तिचे आयोजन इंग्लंडमध्ये झाले.

England-Cricket-Board-Logo inmarathi
FetchLogos.com

 

क्रिकेटचा शोध इंग्लंडमध्येच लागला आणि क्रिकेट हा त्यांचा अत्यंत आवडीचा खेळ आहे. मात्र, एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासाठी, अनेक वर्षं वाट पाहिली. या स्पर्धेच्या निमित्ताने, त्यांचं नाव जगज्जेतेपदावर कोरलं गेलं.

२) पाचव्यांदा यजमानपद भूषवणार इंग्लंड

इंग्लंडने पाचव्यांदा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवले. याआधी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९च्या विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये झाल्या होत्या.

 

England-Cricket-Team inmarathi
Cricket Australia

 

पहिल्या नऊ विश्वचषक स्पर्धांत कोणताही यजमान देश ही स्पर्धा जिंकू शकला नव्हता मात्र २०११मध्ये भारताने विश्वचषक जिंकून ही मालिका खंडित केली.

त्यानंतर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेला विश्वचषक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताचाच कित्ता गिरवला. इंग्लंडने २०१९च्या विश्वचषकात, या पराक्रमाची हॅट्ट्रिक साधली.

३) सर्वाधिक अंतिम सामने खेळले गेलेले मैदान “ लॉर्ड्स ”

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणारे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदान जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी फार महत्वाचे मैदान आहे.

या मैदानावर आतापर्यंत पाच विश्वचषकांचे अंतिम सामने संपन्न झाले आहेत.

 

lords cricket ground inmarathi
Danubius Hotels

 

भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वात इथेच जिंकलेल्या विश्वचषकाच्या स्मृती तर प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमस्वरूपी कोरलेल्या आहेत.

लॉर्ड्सच्या बाल्कनीत विश्वचषक घेऊन जल्लोष करणारा भारतीय संघ हा तमाम भारतीयांच्या आठवणीतला अमुल्य क्षण आहे.

हा बहुमान सर्वाधिकवेळा मिळवणारे हे एकमेव मैदान आहे. २०१९च्या विश्वचषकाचा अंतिम सामना फारच रोमहर्षक ठरला. त्यामुळे या विक्रमाला चार चांद लागले.

४) कसोटी मान्यता असलेला एखादा देश विश्वचषक न खेळण्याची पहिलीच वेळ

विश्वचषक २०१९ या स्पर्धेचा कार्यक्रम सुद्धा वेगळा होता. फक्त दहा संघ स्पर्धेत सहभागी झाले.

मागच्या काही विश्वचषक स्पर्धांमध्ये दहापेक्षा अधिक संघ सहभागी होत असत. त्यामुळे कसोटी मान्यता प्राप्त असलेले सर्व संघ प्रत्येकवेळी स्पर्धेत सहभागी असत.

 

ireland and zimbambwe inmarathi
BBC

 

मात्र यावेळी आयर्लंड आणि झिम्बाबे हे संघ विश्वचषकात सहभागी होऊ शकले नाहीत. हे दोन्ही संघ कसोटी मान्यता मिळालेले संघ आहेत.

२०१९मध्ये, ही घटना पहिल्यांदाच घडली.

कसोटी मान्यता असलेला एखादा देश सहभागी नसलेला हा पहिलाच विश्वचषक आहे.

५) कोणताही असोसिएट संघ सहभागी नसलेला पहिलाच विश्वचषक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना म्हणजेच आयसीसीचे पूर्णवेळ सभासद बारा देश आहेत. सभासद नसलेल्या जवळपास ९३ देशात क्रिकेटच्या प्रसारासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे. अशा देशांना असोसिएट देश म्हटले जाते.

 

associate countries in cricket inmarathi
ESPNcricinfo.com

 

प्रत्येक विश्वचषकात कुठला ना कुठला असोसिएट देश सहभागी होत असे. मात्र २०१९मध्ये पहिल्यांदाच स्पर्धेतील सर्व संघ, हे पूर्णवेळ सभासद होते.

६) वेस्टइंडीजचा प्रवेशफेरीतून संघर्षपूर्ण प्रवेश

वेस्टइंडीज हा एकेकाळचा सर्वात बलाढ्य संघ! १९७५ आणि १९७९चे विश्वचषक या संघाने अगदी आरामात जिंकले होते.

त्याकाळी त्यांचा संघ अपराजित होता. मात्र आता अनेक कारणांमुळे हा संघ अत्यंत कमकुवत संघ म्हणून ओळखला जातो.

 

west indies cricket team inmarathi
Hindustan Times

२०१९च्या विश्वचषकात जागतिक क्रमवारीमधील पहिल्या आठ संघाना थेट प्रवेश दिला गेला.  आणि उरलेल्या दोन जागांसाठी पात्रता फेरी खेळवण्यात आली.

त्यामुळे पहिल्यांदाच वेस्टइंडीज संघावर पात्रतास्पर्धेत खेळण्याची नामुष्की आली होती. मात्र ती स्पर्धा जिंकून त्यांनी आपला विश्वचषक प्रवेश निश्चित केला.

७) १९८३ नंतर पहिल्यांदाच झिम्बाबेचा संघ विश्वचषक खेळला नाही

झिम्बावेचा संघ हा कधीच बलवान संघ किंवा संभाव्य विजेता संघ समजला गेला नाही. मात्र हा संघ नेहमीच मोठमोठ्या संघाना मोक्याच्या क्षणी पराजित करण्याची क्षमता ठेवून होता.

 

Zimbabwe cricket team inmarathi
International Cricket Council

विश्वचषकात काहीवेळा या संघाने एखाद्या मोठ्या संघाला हरवण्याचा पराक्रम केला आहे.

मात्र १९८३ नंतर पहिल्यांदाच हा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला नाही. २०१९च्या विश्वचषकात त्यांना सहभागी होता आले नाही.

८) अकरा किलो वजनाचा विश्वचषक

२०१९ चा विश्वचषक सुद्धा वैशिष्टपूर्ण होता.

 

world cup trophy inmarathi
ICC Cricket

 

या चषकाचे वजन ११ किलो म्हणजेच साधारण २४.२५ पौंड होते. या चषकाची उंची ६५० मि.मी. एवढी होती.

९) उपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले नाहीत…

या विश्वचषक स्पर्धेत सहभागी सगळे संघ एकमेकांशी साखळी फेरीत प्रत्येकी एक सामना खेळले. साखळी फेरीच्या समाप्तीनंतर पहिल्या चार संघात उपांत्य फेरीचे सामने झाले. भारत, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता.

१०) टाय झालेला पहिलाच अंतिम सामना

या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम आठवण ठरली, ती म्हणजे बरोबरीत सुटलेला अंतिम सामना!

५० षटकांचा हा सामना तर टाय झालाच; मात्र त्यानंतर पार पडलेली सुपर ओव्हर सुद्धा टाय झाली.

सर्वाधिकवेळा चेंडू सीमापार करणाऱ्या यजमान इंग्लंड संघाला विजेता घोषित करण्यात आलं.

या अनोख्या अंतिम सामन्यामुळे, हा विश्वचषक आजवरचा सर्वाधिक चर्चेत राहिलेला विश्वचषक सुद्धा ठरला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?