' बलुटूथ हेड सेट घ्यायचाय? सादर आहे स्वस्त आणि मस्त बलुटूथ हेड सेट्सची खास लिस्ट! – InMarathi

बलुटूथ हेड सेट घ्यायचाय? सादर आहे स्वस्त आणि मस्त बलुटूथ हेड सेट्सची खास लिस्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

अरे, ते गाणं ऐकलंस का कसलं भारी म्युझिक आहे यार त्याचं”

शप्पथ कालचा एपिसोड पाहिलास जबरी ट्विस्ट आलाय बघ”

परीचयाचे संवाद. आणि ह्या संवादाच्या शेवटी ह्यातली मुलं कानात हेडफोन्स घालून फोनमध्ये रमून जातात. प्रवासात गाणी ऐकणारी असंख्य माणसं आपल्याला रोज दिसतात. आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात मनोरंजन आणि रिलॅक्स होण्याचं साधन म्हणजे आपले स्मार्टफोन्स.

जुन्या काळी ग्रामोफोन असायचे. नंतर आले रेडीओ आणि कसेटप्लेयर ज्याची जागा कालांतराने सीडी प्लेयरने घेतली, पण हे सगळं ऐकायला जागेची मर्यादा होती.

त्यावर उपाय म्हणून वोकमन बाजारात आले आणि त्यासोबत आल्या कानात लावायच्या वायरी ज्याला कानात बसतील असे स्पीकर जोडले असायचे. ह्यांनी एक काळ बराच गाजवला.

आणि आता त्यांनाही मागे टाकलंय ब्लूटूथ हेडसेटने. स्मार्ट फोनच्या संगतीने केवळ गाणी ऐकण्यासाठीच नव्हे तर फोन वर बोलणे आणि विडीओज बघणे ह्यासाठी हा प्रकार अत्यंत उपयुक्त आहे. ह्यात जोडायला लांबलचक वायर्स नसल्याने गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार सोयीचा ठरतो.

आपल्यापैकी बहुतेक लोकांकडे असले हेडसेट असतीलच. काय म्हणता ? नाहीत ? जुने झालेयत ? नवीन घ्यायचे आहेत ? मग हा आजचा लेख तुमच्यासाठीच आहे. आज पाहुया दहा नामांकित ब्रांडचे ब्लूटूथ हेडसेट.

१) सोनी

inmarathi
ww.sony.com

 

सोनी म्हणजे बस नाम ही काफी है ह्या गटात मोडणारी कंपनी. सोनीचे ब्लूटूथ हेडसेट विथ माईक विदाउट माईक, कान्सिलिंग इन इयर्सफोन पासून फोल्ड होणाऱ्या मोठ्या हेडफोन पर्यंत आठ तासांपासून ते तीस तास चालणारे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. किंमत दोन हजार ते वीस हजारांपर्यंत. वारंटी तीन महिने ते एक वर्ष.

२) जे बी एल

jbl2 inmarathi
jblsound.in

 

जे बी एल आपल्या उत्तम ऑडिओ दर्जासाठी प्रसिध्द आहे. ह्यात गळ्याभोवती लपेटता येणारे. कानात तंतोतंत बसणारे आणि मोठे हेडफोन्स हे सगळे प्रकार उपलब्ध आहेत.

किंमत अगदी पाचशे रुपयांपासून सहा हजार आणि पुढे घेऊ तसे. बेटरी आठ ते वीस तास. वारंटी एक वर्ष

३) बोस

bose bluetooth inmarathi
www.johnlewis.com

हे हेडफोन्स आपल्या एचडी दर्जासाठी प्रसिध्द आहेत. ह्यात वायर्ड नॉन वायर्ड दोन्ही प्रकार आहेत.

किंमत सहा हजारांपासून पुढे तीस हजारांपर्यंत, बेटरी पाच ते दहा तास ह्यातल्या काही मॉडेलमध्ये चार्जिंग केसची सुविधा आहे. वारंटी एक वर्ष

४) फिलिप्स

philips inmarathi
www.philips.com.au

 

फिलिप्स हा सुद्धा ऑडिओ दर्जासाठी नावाजलेला ब्रांड आहे. किंमत एक हजारापासून पुढे, ह्यातल्या बहुतेक हेडसेट वर एक वर्षाची वारंटी आहे तर काहींवर नाही.

५) स्कलकेंडी

skullcandy_inmarathi
www.bhphotovideo.com/

 

स्कलकेंडी आपल्या युनिक डिझाईन आणि स्टायलिश रंगांसाठी प्रसिध्द आहे. शिवाय ऑडीओ दर्जा उत्तम असून काही हेडसेट मध्ये तब्बल चाळीस तास चालणारी बेटरी आहे. किंमत दोन हजार ते दहा हजार. मेन्यूफेक्चर्स वारंटी एक ते दोन वर्षे.

६) टेट्रोनिक्स

tetronics-inmarathi
www.amazon.ca

 

इतर कंपन्यांशी समान अनेक वैशिष्ट्यांसह उपलब्ध असणाऱ्या ह्या हेडसेट्स मध्ये काही हेडसेट्स ला वारंटी नाहीये. किंमत पंधराशे ते दहा हजार, बेटरी सहा ते पंचवीस तास.

७) बोट

boat inmarathi
www.flipkart.com

 

हे हेडफोन्स एक्स्ट्रा बास साठी ओळखले जातात. ह्यातही सगळे प्रकार उपलब्ध आहेत. किंमत चौदाशे ते तीन हजार, बेटरी आठ तास. मेन्यूफेक्चर्स वारंटी एक वर्ष

८) सिस्का

syska-h15-inmarathi
boat inmarathi

 

साडेतीनशे पासून पुढे, बजेट कमी असणार्यांसाठी हे हेद्सेत्स उपयुक्त आहेत. ऑडीओ दर्जा चांगला असून किंमत साडेतीनशे पासून पुढे. बेटरी सात ते दहा तास. वारंटी एक वर्ष

९) Seinheisser.

inmarathi
vickershifi.com

 

अतिशय उत्तम दर्जा असलेले हो हेद्सेत्स दीड तासात चार्ज होतात. किंमत साडेसात हजारांपासून पुढे एक्केचाळीस हजारांपर्यंत असून दोन वर्षांची वारंटी देतात. बेटरी दहा ते बावीस तास चालते.

१०) Oraimo

inmarathi
google.co.in

 

किंमत पाचशे ते तीन हजार पर्यंत असणारे हे हेद्सेत्स सहा महिन्यांच्या वारंटीसह येतात. बेटरी पाच ते सहा तास.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?