' आयपीएलने या खेळाडुला अवघ्या सतराव्या वर्षी करोडपती बनवलं – InMarathi

आयपीएलने या खेळाडुला अवघ्या सतराव्या वर्षी करोडपती बनवलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आयपीएलमध्ये RCB Vs SRH च्या सामन्यात दोन रेकॉर्ड झाले, पहिला हा की, आयपीएल च्या इतिहासात पहिल्यांदाच सलामी बेट्समेन्स नी शतक पूर्ण केले आणि दुसरा हा की, ह्याच सामन्यात वयाच्या सोळाव्या वर्षी आय पी एल सामना खेळणारा सर्वात तरुण बनला प्रयास रे बर्मन.

दुसऱ्या रेकॉर्ड वर लोकांच फारसं लक्ष नसलं तरी हा दुसरा रेकॉर्ड जरा खास आहे. हा सर्वात लहान ठरलेला खेळाडू प्रयास बर्मन सध्या सामने खेळण्यासोबातच सीबीएसई बोर्डाची परीक्षा देतोय.

प्रयास कॉमर्स शाखेचा विद्यार्थी आहे आणि ह्या सामन्याचे काही दिवसांपूर्वीच त्याने अर्थशास्त्राचा पेपर दिला. प्रयास कलकत्त्याच्या कल्याणी स्कूल चा विद्यार्थी आहे.

आरसिबीचा पुढचा सामना २ एप्रिल ला झाला आणि दुसर्याच दिवशी प्रयास Entrepreneurship ची परीक्षा दिली. तो कालकत्त्यातच होता नंतर ५ ला कालकत्त्यातच त्याच्या टीमची मॅच झाली.

 

prayas inmarathi
news18.com

 

प्रयास आपली स्वप्न आणि आपले शिक्षण दिनही खूप व्यवस्थित सांभाळतो आहे. त्याचे वडील सांगतात की आधी तो थोडा गोंधळलेला होता परंतु आता त्याला दोन्हीचा ताळमेळ बसवायला जमतंय.

आपली पहिल्या सामन्यातील खेळाबद्दल तो थोडा निराश होता कारण त्याला विश्वास होता कि तो ह्यापेक्षाही चांगला खेळू शकतो.

पण तो दिवस कदाचित SRH चाच होता. ह्या कसोटीच्या काळात त्याची टीम सुद्धा त्याला पाठींबा देते होती.

प्रयास ने RCB Vs SRH च्या सामन्यातून क्रिकेटविश्वात पदार्पण केले खरे, परंतु इथे त्याचा खेळ विशेष रंगला नाही.

त्याने ४ ओवर मध्ये विना विकेट ५६ रन केले. एव्हाना त्याच्या डेब्युची बातमी इंटरनेट आणि बातम्यांमध्ये आली होती, हे समजल्यावर त्याच्या नातेवाईकांनीही त्याचे फोनवर अभिनंदन केले.

प्रयास ला आरसीबी ने आपल्या संघासाठी तब्बल 1.5 कोटी रुपये देऊन खरेदी केले आहे. त्याचं कारण म्हणजे प्रयासचा खेळ.

 

barman inmarathi
crickbuzz.com

 

प्रयासने ह्यापूर्वी ए-लिस्ट च्या ९ मैच मध्ये ११ विकेट घेतल्या आहेत. शिवाय तो ४ टी-२० सामने सुद्धा खेळला आहे ज्यात त्याने ४ विकेट घेतल्या होत्या.

प्रयास बंगाल साठी खेळतो आणि डोमेस्टिक क्रिकेट सामन्यातला त्याचा उत्तम खेळ पाहूनच ह्यावर्षीच्या आयपीएलच्या ऑक्शन मध्ये त्याचं नाव आलं होतं. आरसीबी ने प्रयाससाठी तब्बल १.५ कोटी रुपये मोजले आहेत.

वयाच्या सोळाव्या वर्षी बरेचदा तरुण ह्या विचारात असतात की पुढे काय करायचं, कशात करियर करायचं ते. मात्र प्रयास ह्याला अपवाद आहे.

त्याला त्याचा मार्ग सापडला आणि त्यासाठी तो जीवापाड मेहनत सुद्धा घेतो आहे. खेळ आणि अभ्यासात नित ताळमेळ बसवतो आहे.

सरावादरम्यान विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि कोच गैरी कर्स्टन जाहिररीत्या प्रयासला प्रोत्साहित करतायत. कारण नक्कीच त्यांना प्रयास आणि पवन नेगी ह्या जोडगोळीत पुढे जाण्याची क्षमता दिसली आहे.

विराट कोहली ने सामन्याच्या अगदी थोडावेळ आधी प्रयासला आपल्या कारकिर्दीबद्दल सांगितलं आणि त्याची हिम्मत वाढवली.

 

rey barman inmarathi
India.com

 

पुढे रॉयल चैलेंजर्स बैंगलोरच्या ह्या स्पिनरने इतिहास रचला जेव्हा रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम मध्ये सनराइजर्स हैदराबादच्या विरोधात तो मैदानात उतरला.

१६ वर्षे आणि १५७ दिवस ह्या वयात प्रयास आयपीएल सामन्यातून आपल्या खेळाची सुरुवात करणारा पहिला सगळ्यात कमी वयाचा क्रिकेटर बनला.

जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतो ह्याचे उत्तम उदाहरण प्रयास रे बर्मनने आजच्या युवावर्गासमोर ठेवले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?