' या बहाद्दराने थेट फेसबुक आणि गुगलला लावलाय तब्बल ८४० कोटी रुपयांचा चुना! – InMarathi

या बहाद्दराने थेट फेसबुक आणि गुगलला लावलाय तब्बल ८४० कोटी रुपयांचा चुना!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

कलियुग जसे जसे पुढे जातेय तसे तसे आळशी पण धूर्त लोक जगाला फसवण्याचे नवे नवे मार्ग शोधून काढत आहेत. नवे तंत्र आले रे आले की त्या तंत्राचा वापर चांगल्या गोष्टींसाठी न करता लोकांना फसवण्यासाठी करणारे अनेक महाभाग आहेत.

आपल्या हुशारीचा वापर हे लोक दुसऱ्याची फसवणूक करण्यासाठी वापरतात.

ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण तर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लोक नव्यानव्या क्लृप्त्या वापरून लाखो रुपयांचा गंडा घालण्यात एक्सपर्ट झाले आहेत म्हणूनच बँका दिवसेंदिवस ऑनलाईन व्यवहार अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

वेब पोर्टल्स सुरक्षित करण्यासाठी भरपूर कष्ट घेतले जात आहेत. असे असले तरी हे धूर्त लोक कुठले ना कुठले बीळ शोधून त्यातून पैसे लांबवण्याचा मार्ग शोधून काढतातच.

 

wanna-cry-marathipizza
actionfraud.police.uk

आता ह्या बहाद्दराने तर थेट फेसबुक आणि गुगललाच ८४० रुपयांचा गंडा घातला आहे. ह्या लबाड माणसाने चक्क गुगल आणि फेसबुकला ८४० कोटी मागितले आणि ह्या दोन्हींनी हसत हसत हे पैसे बँकेत ट्रान्सफर सुद्धा करून टाकले.

Lihuani नावाचा एक छोटासा देश युरोप खण्डात वसलेला आहे. ह्या देशाचा रहिवाशी असलेल्या Evaldas Rimasauskas ह्या महाधूर्त माणसाने गुगल आणि फेसबुकला आर्थिक गंडा घातल्याची कामगिरी केली आहे.

हा माणूस काही हॅकर वगैरे नाही. त्याने गुगल आणि फेसबुक हॅक वगैरे करून त्यांच्या अकाउंटमधून पैसे उडवले वगैरे नाहीत. तर सरळसरळ त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले आणि ह्या कंपन्यांनी ते सरळ देऊन सुद्धा टाकले.

सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे भरपूर प्लॅनिंग, भरपूर विचारविनिमय वगैरे ह्या प्लॅन साठी केला गेलेला नाही. जास्त डोकं न लढवता सरळसोट केलेला हा प्लॅन होता.

 

evaldas_rimasauskas_inmarathi
Indiatimes.com

Evaldas ने २०१३ ते २०१५ मध्ये दोन्ही कंपन्यांना सामानाच्या पैश्यांविषयी विचारणा करत अनेक बिलं पाठवली.

पण गंमत म्हणजे ह्या दोन्ही कंपन्यांनी Evaldas कडून कुठलेही सामान मागवले किंवा विकत घेतलेले नव्हते. तरीही त्याचा हा प्लॅन यशस्वी झाला कारण त्याने ह्याची चांगलीच पूर्वतयारी केली होती.

त्याने हा व्यवहार खरंच घडला हे दाखवण्यासाठी एक खोटे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तयार केले आणि ह्या दोन्ही कंपन्यांबरोबर ऑफिशियल कॉर्पोरेट कम्युनिकेशन केले.

त्याने एक Quanta Computer Inc नावाची एक खोटी कंप्यूटर हार्डवेअर कंपनी असल्याचे रजिस्ट्रेशन केले.

ह्या नावाची एक कंपनी खरंच अस्तित्वात आहे पण ती तायवानमध्ये आहे. त्याने करून घेतलेली कागदपत्रे अगदी खरी आणि अस्सल वाटत होती. म्हणूनच ह्या दोन्ही बड्या कंपन्यांनी ह्या कागदपत्रांवर विश्वास ठेवला आणि त्याबद्दल चौकशी केली नाही.

 

google-facebook-inmarathi
Sociable.com

त्याने जी बिलं पाठवली, त्याबद्दल अजिबात शहानिशा न करता त्याच्या बँक अकाउंटला ह्या दोन्हीही कंपन्यांनी सरळसरळ पैसे जमा करून टाकले.

ह्या माणसाचे बँक अकाउंट हे सायप्रस, लिथुआनिया, हंगेरी, स्लोव्हाकिया व लातविया ह्या ठिकाणच्या विविध बँकांत होते.

हे सगळे घडल्यानंतर अनेक दिवसांनी गुगलला Evaldas ने केलेल्या फसवणुकीबद्दल समजले आणि तेव्हा त्यांना कळले की ह्या माणसाने गुगलला किती मोठा गंडा घातला आहे.

पोलिसांनी त्याच्याबद्दल शोधून काढले आणि २०१७ साली त्याला पकडून न्यूयॉर्कला आणण्यात आले आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली. Evaldas वर आज अमेरिकेत मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्हयाबरोबरच इतरही अनेक गुन्ह्यांबद्दल केसेस सुरू आहेत.

त्याने ही अशी फसवणूक करून मिळवलेले पैसे परत करण्याचे मान्य केले आहे. सध्या त्याला ३० वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा मिळाली आहे आणि तो ही शिक्षा भोगत आहे.

पन्नास वर्षीय Evaldas व त्याचे काही साथीदार ह्यांनी मिळून हा फसवणुकीचा गोरखधंदा केला.

 

theft inmarathi
Eyerys.com

Evaldas ने जी खोटी बिलं पाठवली होती त्यावर गुगलने ह्याच्या अकाउंटमध्ये २०१३ साली २३ मिलियन डॉलर्स ट्रान्सफर केले तर फेसबुकने ९८ मिलियन डॉलर्स ह्या माणसाच्या अकांउटला ट्रान्सफर केले.

त्यानंतर काही काळाने हा माणूस फ्रॉड आहे हे लक्षात आल्यावर पटापट पावले उचलण्यात आली आणि आता Evaldas त्याचे संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवतो आहे.

चक्क गुगल आणि फेसबुकसारख्या मोठमोठ्या कंपन्यांना गंडा घालणारा हा माणूस किती धूर्त असू शकेल ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?