' ज्वालामुखी तयार होण्याची अफलातून प्रक्रिया माणसाला थक्क करून टाकते! – InMarathi

ज्वालामुखी तयार होण्याची अफलातून प्रक्रिया माणसाला थक्क करून टाकते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“ज्वालामुखी” हा शब्द आपण साधारणपणे तीव्र नापसंती किंवा राग दाखवण्यासाठी वापरतो, एक्स्ट्रीम ह्या अर्थाने, या व्यतिरिक्त ज्वालामुखीशी आपला संबंध आलाय तो शाळेच्या पुस्तकात किंवा विज्ञानाच्या प्रयोगात ज्यात आपण ज्वालामुखी कसा कार्य करतो ह्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलेलं असेल.

मध्यंतरी व्हाट्सअँपवर असल्याच एका ज्वालामुखीचे विडीओ प्रचंड वायरल झालेले, त्यातल्या दृश्यांवरून साधारण ज्वालामुखीच्या स्वरुपाचा अक्राळविक्राळ रूपाचा अंदाज येतो. आज आपण ह्याच ज्वालामुखीबद्दल जरा तपशीलात जाणून घेऊ.

ज्वालामुखी म्हणजे प्रत्यक्षात पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडलेली भेग असते, ज्यातून लाव्हारस बाहेर पडतो.

हा लाव्हारस कैक हजारो वर्षांपासून सातत्याने बाहेर पडत असल्याने त्याचे शंकूच्या आकारात थरावर थर साचून त्याला प्रचंड अशा पर्वतांचे स्वरूप प्राप्त होते.

 

volcano-inmarathi03

 

ज्वालामुखी पृथ्वीच्या अंतर्भागात निर्माण झालेल्या नैसर्गिक दबाव आणि तापमाणामुळे पृथ्वीच्या पोकळीत होणारा एक भूगर्भीय स्फोट होय.

पृथ्वीवरच्या या ज्वालामुखीतून उष्ण ज्वाला, ज्वालाग्राही राख आणि वायू बाहेर पडतात. यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाला “मॅग्मा” सुद्धा संबोधले जाते.

एकदा हा तप्त द्रव बाहेर पडला की, थंड होऊन त्याचा रंग बदलतो आणि उद्रेकाच्या आजूबाजूला पसरून टणक बनतो. ही प्रक्रिया लाखो वर्षांपासून चालत आली आहे.

ज्वालामुखी बहुतेक वेळा टेक्टोनिक प्लेट्सच्या अभिसरण किंवा विचलनामुळे तयार होतात. उदाहरणार्थ मिड-ओशन रीडजेसमध्ये, जिथे टेक्टोनिक प्लेट्स सबडक्शन झोन पासून दूरवर पसरलेले आहेत. जेथे एक टेक्टोनिक प्लेट दुसऱ्या टेक्टोनिक प्लेटच्या खाली पृथ्वीच्या आत शिरते.

इतर आयलँड आर्क आणि हॉटस्पॉट्स सारख्या टेक्टोनिक प्लेट्सच्या जवळ किंवा मध्यभागी येतात तर काही इतर महाद्वीपांवर बनतात, जसे कॉन्टिनेंटल रिफ्ट्समध्ये बनले आहेत.

ज्वालामुखीची रचना

पृथ्वीचा पृष्ठभाग टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या दगडाच्या प्रचंड प्रमाणातल्या तुकड्यांपासून बनलेला आहे. ह्या टेक्टोनिक प्लेट्स पझलच्या तुकड्यांसारख्या असतात ज्या सतत एकमेकांशी झगडत असतात जिथे ह्या प्लेट्स एकमेकींच्या संपर्कात येतात तिथे ज्वालामुखी तयार होतो.

 

volcano-inmarathi08

 

ह्या दोन प्लेट्स मध्ये होणाऱ्या सततच्या घर्षणामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग वितळतो, ह्या घर्षणाने तयार होणाऱ्या प्रचंड तापमानामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागातून “मॅग्मा” बाहेर पडतो.

आता हा वितळलेला हॉट रॉक किंवा मॅग्मा मोठा दाब निर्माण करतात आणि प्लेट्सचा थर फोडून बाहेर येतो. एकदा का हा मॅग्मा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आला की त्याला लाव्हा म्हणतात.

ज्वालामुखीचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. एक सक्रीय ज्वालामुखी दुसरा निष्क्रिय ज्वालामुखी आणि तिसरा नामशेष ज्वालामुखी. यापैकी सक्रीय ज्वालामुखी म्हणजे ज्यात सतत उद्रेक होत असतात आणि अखंडपणे लाव्हारस बाहेर फेकला जातो.

जगभरातील अंदाजे १५०० ज्वालामुखी सक्रिय मानले जातात आणि त्यापैकी ९०% रिंग ऑफ फायरमध्ये आढळतात, जे पॅसिफिक महासागरावरील समुद्रात वर्तुळाकार पसरले आहेत.

दुसरा निष्क्रिय ज्वालामुखी म्हणजे जरी यात सतत उद्रेक होत नसले तरी तसे होण्याची शक्यता मात्र नाकारली जाऊ शकत नाही.

हे सुप्तावस्थेत असतात. कधीही उद्रेक होऊ शकतो. हे धोकादायक असतात. बिग आयलंड मध्ये असे पाच ज्वालामुखी आहेत.

 

mount-bromo-indonesia-volcano-inmarathi

 

तिसरा प्रकार म्हणजे नामशेष ज्वालामुखी, ह्या प्रकारात ज्वालामुखीत वर्षानुवर्ष लाव्हारसाचा उद्रेक झालेला नसल्याने तसे होण्याची शक्यताही नाही असे मानून त्याला मृत समजले जाते. ईरानचे कोह सुल्तान आणि देवबंद हे शांत ज्वालामुखी आहेत.

हॉटस्पॉट म्हणजे काय?

बहुतेक ज्वालामुखी पाण्यात रिंग ऑफ फायरमध्ये बनले असले तरी त्यातले काही जमिनीवरही तयार झालेले आहेत. हे जमिनीवरचे ज्वालामुखी टेक्टोनिक प्लेटच्या सीमेपासून दूर असतात अशा ज्वालामुखीला हॉटस्पॉट्स म्हणून ओळखले जातात.

हे बाहेर येणाऱ्या“मॅग्मा” च्या इतरत्र घुसखोरीमुळे तयार होतात ज्याला  मेन्टल प्लम्स म्हणतात.

होटस्पॉट्स हे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली मॅग्मा चेंबर्समुळे तयार होणारे स्थिर क्षेत्र होय. जेव्हा मेंटल प्लम मुळे ह्या हॉटस्पॉटवर ज्वालामुखी तयार होतात तेव्हा ह्या महाद्वीपाच्या प्लेटच्या हरकतींमुळे नवीन ज्वालामुखी तयार होतात त्यातल्या प्लेट्सच्या घर्षणाने आणखी ज्वालामुखी तयार होतात आणि ही साखळी अशीच चालत राहते. हवाईयन बेटांचा जन्म असाच झाला आहे.

ज्वालामुखीची संरचना 

ज्वालामुखीची संरचना साधारण अशा प्रकारची असते,

१. मॅग्मा चेंबर्स- म्हणजे पृथ्वीच्या गर्भात जिथे हा तप्त द्रव साठवला जातो तो भाग.

२. पृथ्वीचे कवच – हा तो भाग ज्याच्या तुकड्यांपासून पृथ्वीचे आवरण बनलेले आहे.

 

volcano-inmarathi06

 

३. बासाल्टिक लाव्हाची लेयर्स – हा थर टेक्टोनिक प्लेट्स च्या घर्षणातून बाहेर पडलेल्या लाव्हा पासून तयार झालेली असते.

४. ज्वालामुखीची राख – ही राख म्हणजे लाव्हा बाहेर आल्यानंतर थंड झाल्यावर जे उरते तो भाग होय.

५. सेंट्रल व्हेंट – हि वेन्ट म्हणजे ती भेग, ज्यातून हा मॅग्मा म्हणजेच लावारास उफाळून पृथ्वीच्या पृष्ठ्भागावर येतो.

६. अॅश प्लम – म्हणजे या प्रक्रियेत निर्माण झालेला एक प्रकारचा धूर होय ज्यात राखेचे सूक्ष्म कण वातावरणात अवतीभवती विखुरले जातात.

आता बघूया ज्वालामुखीबाद्दलची काही रंजक माहिती.

केवळ एका पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये जवळपास ९०% सक्रिय ज्वालामुखी सामावलेले आहेत.

बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, चंद्र आणि काही आंतरिक ग्रहांचे पृष्ठभाग पृथ्वीप्रमाणेच बेसाल्टिक खडकापासून तयार झालेलं आहे.

 

barren island volcano marathipizza

 

पृथ्वीच्या पहिल्या १६ किमी (१०मैल) च्या ९५% पेक्षा जास्तीचा पृष्ठभाग हा ज्वालामुखीच्या लाव्हा रसापासून अग्नी खडक तयार झाले आणि अग्नी खडकापासून तयार झालेल्या खडकला बेसाल्ट असेही म्हटले जाते.

इटलीमधील एटना पर्वतावरील ज्वालामुखीचा उद्रेक ३५०० वर्षांहून अधिक काळापासून सातत्याने सुरूच आहे. ह्या उद्रेकाचा पहिला स्फोट इ.स.पू. १५०० मध्ये झाला होता.

हवाईमध्ये किलाउ वोलकॅनो हा सर्वात लहान शिल्ड ज्वालामुखी आहे ज्याचा उद्रेक वर्ष १९८३ पासून सतत चालूच आहे. हवाईयन बेट हे पॅसिफिक प्लेटच्या मध्यभागी असणाऱ्या एका हॉटस्पॉटवर वसलेले आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?